Home / विदर्भ / गडचिरोली / *संत जीवनदास महाराज...

विदर्भ    |    गडचिरोली

*संत जीवनदास महाराज यांची पुण्यतिथि महोत्सव साजरी*

*संत जीवनदास महाराज यांची पुण्यतिथि महोत्सव साजरी*

*संत जीवनदास महाराज यांची पुण्यतिथि महोत्सव साजरी*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

 

   गडचिरोली:-श्री संत जीवनदास महाराज आभारे यांची 26 पुण्यतिथी व गुरुमाऊली पार्वताबाई जीवनदास महाराज  यांची १० वी पुण्यतिथी महोत्सव जीवनदास महाराज देवस्थान श्रीक्षेत्र मार्कंडादेव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.या निमित्ताने 16 फेब्रुवारी रोजी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर ह भ प आत्माराम महाराज मंगर ,  टिचुकले ताई टेकेपार, जीवनदास महाराज किनेकार, देवराव महाराज खाडीलकर, भेंडाळा ,आरमोरी महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यवतमाळ जिल्ह्यातील उकणी या गावातील भजन मंडळी, जय पेरसापेन भजन मंडळ मार्कंडादेव, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ उमरी, तिरमलनाथ गुरुदेव सेवा मंडळ हरंबा ,गुरुदेव सेवा मंडळ शंकरपूर सावरहेटी या भजन मंडळींनी आपापली भजने सादर करून संत जीवनदास महाराज यांच्या प्रती आपली श्रद्धा व भक्ती    अर्पण केली. १७ फेब्रुवारी रोजी श्रीसंत जीवनदास महाराज यांचा पालखी सोहळा दिंड्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मलघडे परिवार नागपूर यांचे वतीने दहीहंडी व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवशीय कार्यक्रमाला विदर्भातील गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातून भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता.हा पुण्यतिथी सोहळा संपन्न करण्यासाठी संत जीवनदास महाराज ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम जीवनदास आभारे, उपाध्यक्ष विनोद खोबे ,सचिव गुणेश्वर आरीकर, कोषाध्यक्ष शेषराव येलेकर सहसचिव मधुकर मलगडे सदस्य जगन्नाथ गहूकर, प्रकाश आभारे, रत्नमाला आभारे कांताबाई बट्टे, आत्माराम मंगर, गोविंद वासेकर, कृषी आभारे,  धुडसे ,गजानन आभारे, सेवकराम बोरकुटे, प्रदीप नरड, प्रदीप चोपरकर, यांनी जातीने उपस्थित राहून पुण्यतिथी सोहळा यशस्वी केला यावेळी ट्रस्ट चे हिशोबनिस पद्माकर भुडे नागपूर ,दादाजी चुधरी सहित मार्कंडा परिसरातील सेवकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...