Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / यवतमाळ-जिल्हा / पुसद / *ना. उद्धव साहेब काळजी...

यवतमाळ-जिल्हा    |    पुसद

*ना. उद्धव साहेब काळजी करू नका शिवसेना जोमाने उभारी घेईल

*ना. उद्धव साहेब काळजी करू नका शिवसेना जोमाने उभारी घेईल
ads images

 

*✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद-9421774372*

 

===============================

 

गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेला हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पण पेरणीपाण्याच्या दिवसात सुद्धा तमाम जनता महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाच्या चर्चेत गडुन गेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले. आणि ते वर्षातून निघून गेले. परंतु अख्खा महाराष्ट्र गहिवरला ते फक्त तीन मुख्यमंत्रयासाठी, प्रथम महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळेस, दुसरी वेळ होती जलनायक  सुधाकरराव नाईक साहेब यांनी वर्षा बंगल्या सोडण्याची आणि मा. उद्धव साहेब ही तिसरी वेळ आहे की आपण वर्षा बंगला सोडण्याची. आपण निरगस चेहऱ्याने जेव्हा बाहेर पडलांत. ते  इलेक्ट्रॉनिक मिडीयावरील दृश्य पाहून महाराष्ट्रातील  बारा कोटी जनता पैकी अर्धीअधिक जनता अक्षरशः  गहिवरली. प्रत्येक घरातल्या एकाच्यातरी डोळ्यात  अश्रु तरळले. वर्षावरचीआपली दोन लेकरे आणि धर्मपत्नी घेऊन बाहेर पडताना चे दृश्य पाहून अनेकांना प्रंचड वेदना झाल्या. अनेकांचे डोळे पाणावले.  वर्षा ते मातोश्री हा नऊ किलोमीटरच्या   दुतर्फा रस्त्यावर प्रचंड शिवसैनीकांनी आक्रोश करत आपल्याला धीर दिला. उद्धव साहेब स्वतःला सांभाळा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.अशी आर्त हाक दिली. आपण वरळी चौकात उतरून लोकांच्या भावना समजून घेतल्या.लोकांना हात उंचावून केलेला अभिवादन अंत्यत भावुक होता. अक्का महाराष्ट्र  हे दृश्य पाहून एक वेगळयाच भावनिक वातावरणात गेलं. वर्षा ते मातोश्री हा हाय स्पीड गाडीसाठी केवळ काही मिनिंटाचा रस्ता असतानासुद्धा आपल्या आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या प्रेमापोटी अभूतपूर्व लोकांनी रस्त्यावर हजेरी लावून आपल्या गाडीवर पुष्पांचा वर्षाव करून ओल्या डोळ्यांनी आपल्याला धीर दिला हीच खरी शिवसेनेची ताकद समजावी लागेल. भारतातील कोणत्याही मुख्यमंत्र्यावर एवढी अमाप प्रेम करणारी जनता शोधुनही सापडणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या जीवाला जीव देणारी जनता असल्याचे त्यादिवशी दिसून आले. उद्धवसाहेब आम्ही तुम्हाला काही ओळखत नाही.शिवसैनिक ही नाही. पण संविधान प्रेमी आहो.  श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहोत.  या महाराष्ट्रावर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे उपकार आहेत. त्या उपकाराच्या प्रेमापोटी आम्ही तुम्हाला मानतो. महानायक वसंतराव नाईकसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फार  ऋणानुबंध होते .आपण जी महाराष्ट्राला भावनिक साद दिली. त्यामध्ये आपण कबुलच केलात की मला प्रशासन माहित नाही. मला प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ शरद पवार साहेबांमुळे मी मुख्यमंत्री झालो. हे आपण कबूल करून टाकलं. यावरून  आपली निस्वार्थी भावना  आणि  निरमळ मन असल्याचे दिसून आले. आपण मुख्यमंत्रीच्या काळामध्ये काय चुका केल्या? नाही केल्या? हा भाग वेगळा आहे. पण निश्‍चितपणे हा महाराष्ट्र कोरोना ग्रस्त झाला असताना आपण दाखवलेली ती खबरदारी ज्या वेगाने पूर्ण प्रशासन व्यवस्थितपणे हाताळून आपण महाराष्ट्राला सांभाळलं. हे  कदापिही विसरून चालता येणार .आपल्या बिमारपणामुळे  आपली हळूहळू प्रशासनावरची पकड  सैल होत आहे. असं चित्र उभं झालं. ते कदाचित खोटेही असेल. परंतु त्यानंतर मात्र मंत्री, आमदार, खासदार यांना सुद्धा आपल्या भेटी होत नव्हत्या. त्यामुळे एक प्रचंड नाराजीचा सुरू महाराष्ट्रामध्ये पसरवण्यासाठी विरोधी गटाकडून आणि आपल्याच गटातून प्रचार सुरू झाला. असे आज ऐकीवात आहे. आणि हळूहळू आपल्या विरोधातील वातावरण तयार होत गेलं. पण मी याठिकाणी विश्वासाने सांगतो. की , राजकारणाचे कुठलेही डावपेच आपल्या मनामध्ये नाही. कपटनीती नाही .प्रेमळ स्वभाव ,संयमी वृत्ती आणि प्रामाणिकपणा ,तब्येत खालावलेली असताना सुद्धा आपण हा महाराष्ट्र एका उंचीवर नेण्याचं आघाडी सरकार सोबत केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होतं .अशी तमाम जनता आज सांगत आहे. विरोधी गटाकडून आणि सीडी,एडीचा धाक दाखवत असल्यामुळे प्रॉपर्टीवाले तर जाऊ द्या!   एडीला साधा बीडी पिणाराही  घाबरला. आणि  महाराष्ट्रामध्ये वेगळेच वातावरण तयार झालं. सुरुवातीला राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्या सरकारला  हार खावी लागली. त्यानंतर  विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये सुद्धा त्यांची सरशी झाली. याच संधीचा फायदा घेऊन आणि इतरही काही कारणे असू शकतात? या सर्वांचा एकत्र  मेळ आल्यामुळे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी चाळीस आमदार सह शिवसेनेतच बंड पुकारलं आणि ते  बंड आज सुरू आहे.अखा महाराष्ट्र टिव्ही वर चार दिवसापासून बघतो आहे. आमची भोळीभाबडी जनता आजही  त्यांचा विश्वास बसत नाही की  इतके मोठे आमदार उद्धव साहेबांच्या परवानगीशिवाय कसे काय जातात? यामध्ये आपलाच हात आहे की काय? असे बिचारे व्हाट्सअप आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर पोस्ट टाकत फिरत आहे. हे अंत्यत चुकीचे आहे.असे वाटते. शिवसेना पाठीमागून वार कधीही करत नाही  असे मा.संजय राऊत साहेब सांगतात ते खरेही आहे. मां.संजय राऊत साहेबा सारखा निष्ठवंत शिवसैनिक आपल्या सोबत आहे. असो ! परंतु उद्धव साहेब आज जरी शिवसेना पक्ष बंडोबाचा ठरतोय. तरीही  हे काही शिवसेनेला नवीन नाही. आतापर्यंत पाच वेळा शिवसेनेत फूट पडली असून चार घटना या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत झालेल्या आहे .तरीही शिवसेना जोमाने उभारी घेऊन पुढे आलेली आहे. सर्वात प्रथम शिवसेना फुटली सन 1991 मध्ये त्यावेळेस शिवसेनेचे तडफदार नेते छगन भुजबळ साहेबांनी 9 आमदारासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला .परंतु 1995 च्या निवडणुकीत भुजबळ साहेब पराभूत झाले. हा इतिहास आहे.  मुंबईतील आगरी समाजाचे सेनेचे त्याकाळचे शक्तिशाली नेते गणेश नाईक यांनी 1999 मध्ये पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा पराभव झाला. हा शुद्धा इतिहास आहे. त्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी 11 समर्थक आमदारांसह जुलै 2005  साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु  शिवसेनेवर काही फरक पडला नाही. सन 2005 मध्ये आपल्याच घरातले आपले बंधू राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आमदार बाळा नांदगावकर व इतर काही समर्थकांची त्यांना साथ मिळाली. एकेकाळी 13 आमदार निवडून आणणाऱ्या या पक्षाचा आता एकच आमदार आहे . आणि आज 2022 मध्ये राजकीय महत्वकांक्षा, डावलले जाण्याचे दुःख, पक्षप्रमुख व आपल्या नाराजी यातून एकनाथ शिंदे यांनी 21 जून 2022 रोजी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. आता ते काय करतात. याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष असताना मात्र प्रेस मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडियाचे अवलोकन जर केले तर कोणालाही कुठेही जाऊ द्या आम्ही मात्र मातोश्री सोबतच आहोत अशीच साद खेडा खेड्यात गावागावात आपले कट्टर शिवसैनिक घालत असतानाचे चित्र दिसत आहे. चाळीस आमदार म्हणजे पक्ष नव्हे?  महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेपैकी जवळपास तीन-साडेतीन कोटी हे सेनेचा मतदार असू शकतात. (कदाचित जास्त ही अशु शकतात) ती जनता आजही आपल्या बाजूने असल्याचे स्पष्ट चित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया ,सोशल मीडिया आणि प्रेस मीडियातून दिसत आहे. मा. उद्धव साहेब शिवसेना ही संघर्षातुन पुढे आलेली एक सामाजिक संघटना असून  जेंव्हा जेंव्हा  या शिवसेनेवर संकट आली. तेव्हा तेव्हा हि शिवसेना मजबूत झाल्याचा इतिहास महाराष्ट्राने बघितला  आहे. शिवसेनेत बंड होण्याची ही काही पहीली वेळ नाही.कोण कुठे जातो, कशासाठी जातो ,त्याचा काय उद्देश आहे. हे सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता जाणून असून आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न, प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारांचा प्रश्न, नॉन क्रिमीलेअर,, ऊसतोड कामगारांचा प्रश्न ,,विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न, असे हजारो प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर असताना आणि नुकत्याच पेरण्या सुरु झालेल्या असताना महाराष्ट्रावर ही चिंताजनक स्थिती निर्माण व्हावी. हे काही तमाम जनतेला पटलेले नाही. कोण कुठे चुकला ,पक्षांतर्गत काय नाराजी होती ,आघाडी सरकार हे व्यवस्थित चालते किंवा नाही असे अनेक प्रश्न घेऊन कदाचित आपल्या  सोबत संवाद साधता आला असता तर निश्चितच तोडगा निघाला असता. असे जनतेला वाटत आहे. परंतु शेतकऱ्याच्या पेरणीच्या हंगामामध्ये महाराष्ट्रात अशी  राजकीय परिस्थिती निर्माण करणे  हीच खरी मोठी शोकांतिका आहे.  शहराच्या पान टपरीवर, चौकाचौकात जर आपण गेलो आणि तिथल्या चर्चा ऐकल्या तर लोक  एकमेकांना प्रश्र करतात ऑटो चालवणारे,  वडापाव  विकणारे, कुठलाही राजकीय  पाठिंबा नसणारे  आणि सामान्य कार्यकत्याला  लोकांना शिवसेनेने  मुख्यमंत्री, खासदार ,मंत्री, आमदार,नगरसेवक पद  देऊन सर्वांचा सन्मान केला. आमच्या समाजात एक मन आहे. ( हांगतेन मंगाळो मळगो) त्याप्रमाणे एवढ्या साऱ्या गोष्टी शिवसेनेने दिल्यानंतरही हे लोक शिवसेनेच्या विरोधात का बंड करतात हाच तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे?  आपण महाराष्ट्राला भावनिक साद घातली. काल सगळया अधिकाऱ्यांसोबत आपण बोललात. जिल्हाप्रमुख ,तालुकाप्रमुख आणि सगळ्याच शिवसैनिकांना आपण शिवसेना भवन  दादर येथून आँनलाईन  साद घातल्याचे कळले. यावरून आपल्या मनाची स्थिती तमाम महाराष्ट्राला कळून चुकली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून वर्षा बंगल्यातून आपण बाहेर पडतानाचे जे दृश्य  टिव्ही वर  वारंवार दाखवत आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला शिवसेना मजबूत होत आहे. कोणत्याही शिवसैनिकाला विचारलं तर आम्ही ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्या सोबत नसून आम्ही मातोश्री सोबत आहोत. ही प्रेमळ भावना ते व्यक्त करतात. *आज एका सलुन मध्ये गेलो होतो. या  राजकीय भुंकपावर तो प्रंचड चिडला. आणि म्हणाला आज बाळासाहेब ठाकरे असते तर?* आजही मातोश्रीवरचे प्रेम कमी झालेले नाही. हेच प्रेम शिवसेनेला नक्कीच उभारी देईल. मातोश्री वरचा प्रेम कमी करण्याचे अनेक प्रयत्न या  महाराष्ट्रांनी बघितले आहे.  पण मातोश्री वरचा प्रेम आणि बाळासाहेब  ठाकरे विषयी असलेले अतूट नातं. कट्टर शिवसैनिकच  नाही. तर  तमाम महाराष्ट्रातील  जनतेमध्ये घट्ट झालेला आहे. आज प्रत्येकाला प्रश्न पडतो की आज बाळासाहेब ठाकरे असते तर ?  कदाचित त्यांची हिंमत झाली नसती तो त्यांचा करारी बाणा, प्रचंड ऊर्जाशक्ती असलेलं ते एक फार मोठं  उर्जाकेंद्र होते. त्याची आठवण आज तमाम महाराष्ट्राला होताना दिसत आहे. सध्या मातोश्रीवर भेटण्याची गर्दी वाढत आहे. कारण निष्ठावंत माणसे कोणती हे ओळखण्यात कदाचित थोडीफार चूक झाली ही  असेल ? बाळासाहेबांच्या वेळी पक्षप्रमुखांचा जो धाक होता. तो संपलेला जरी असला तरी भविष्यात उद्धव ठाकरे आणि  निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र घेऊन  शिवसेना  वाढविणे ही काळाची गरज ठरेल. आणि ती वाढणार. कारण साहेब  शेवटी ठाकरे घराण्यावर निष्ठावंतांची निष्ठा कायम राहते. रक्त पाण्यापेक्षा घट्ट असते या इंग्रजीतील म्हणी प्रमाणे ही बाब सत्य ठरते. महत्त्वाची बाब अशी की इतकं सगळं घडेपर्यंत महाराष्ट्रातील गृहखात्याला त्यांचा वास येऊ नये, आमदार एकत्र येतात, सुरतला जातात या सगळ्या बाबीकडे डोळेझाक का केली गेली . हे मात्र कोडेच आहे. समोरासमोर बोला मुख्यमंत्री व पक्षप्रमुख सोडतो असे भावनिक आव्हान आपण केले आहे. पण राजकारणात भावनेपेक्षा कर्तव्याचा राजयोग जास्त महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातील जे विचारवंत आहेत. अभ्यासक आहे. राजकीय विश्लेषक आहे .अशा लोकांनी सरकारच्या चुका शोधून जनतेसमोर मांडत आहे. आणि हे सरकार कोसळणार असे सांगत आहे. ते कदाचित सरकार कोसळेल? मध्यावधी ही होवु शकते. त्यांचे म्हणणे सत्य असेल.पण . उद्धव साहेब आपली तब्येत सांभाळा. तमाम जनता तुमच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये असताना आपण या युतीतून बाहेर गेलो पाहिजे. असे त्यांचे बयान असताना ते कशाच्या आधारे शिवसेनेमध्ये बंड करत आहे. हे मात्र समजू शकलेले नाही. केवळ पद, प्रतिष्ठा, आणि पैसा या गोष्टीसाठी हे जर हे बंड असेल तर हे बंड लवकरच शमणार म्हणजे शमणार ? आपली भविष्यात भेट घेण्याचा माझा मानस आहे. बघुया केव्हा भेट होते ते?

जय महाराष्ट्र!????????

 

*✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद*

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

पुसद तील बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान

यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता...

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...

*विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी. !*

भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...