Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / वडकी ठाणेदाराची जनावर...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

वडकी ठाणेदाराची जनावर तस्करीवर धडक कार्यवाही: ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

वडकी ठाणेदाराची जनावर तस्करीवर धडक कार्यवाही: ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

वडकी ठाणेदाराची जनावर तस्करीवर धडक कार्यवाही: ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

 

         वडकी पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार विजय महाले यांना दि.  १०/०८/२०२३ रोजी वडनेर कडून आदीलाबादकडे कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून अवैध जनावरे तस्करी करणाऱ्या कंटेनरला अडविले असता सदर वाहन भरधाव पुढे गेला त्याचा पाठलाग करून काही अंतरावर कंटेनरला पकडून ४७ म्हैस जातीच्या रेड्यांची सुटका करून ३४ लाख ४० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला.

          .. मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाहन क्रमांक एच आर ३८ ए बी ३२३२ या कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीच्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती वडकी स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांना मिळाली त्या आधारे ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या सह राष्ट्रीय महामार्गावरील वडकी येथील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहन यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर भरधाव वेगाने समोर निघून गेला असता वडकी पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर अवैध जनावरांची वाहतूक करणारा कंटेनर पकडला. त्याची पाहणी केली असता सदर कंटेनर वाहनामध्ये ४७ नग म्हैस जातीचे रेडे प्रत्येकी किंमत वीस हजार प्रमाणे नऊ लाख चाळीस हजार रुपये व कंटेनर किंमत २५ लाख असा एकूण ३४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष घटनास्थळावरून जप्त करण्यात आला व यातील दोन इसमां विरुद्ध पोलीस स्टेशन वडकीला गुन्हा दाखल करणे सुरू होते.

          सदर प्रकरणाची कार्यवाही पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले सोबत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस हवालदार निलेश वाढई विलास जाधव एनपीसी अंकुश पाटोळे सचिन नेवारे चालक विनोद नागरगोजे यांनी पार पाडली. अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वडकी पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विजय महाले यांची सतत धडक कारवाई सुरू आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...