Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / 5 ऑक्टोबर ला मारेगावात...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

5 ऑक्टोबर ला मारेगावात पिवळं वादळ धडकणार, धनगर समाज करणार एकदिवसीय धरणे आंदोलन

5 ऑक्टोबर ला मारेगावात पिवळं वादळ धडकणार, धनगर समाज करणार एकदिवसीय धरणे आंदोलन
ads images

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करीता धनगर समाज आक्रमक

मारेगाव:धनगर समाजाचा  संविधानाच्या अनुसुचित जमातीच्या सूचीमध्ये १९५६ पासून  ३६ व्या क्रमांकावर समावेश असूनही आज पर्यंत शासनकर्त्या जमातीने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.  अनेक वर्षापासून घटनादत्त न्याय हक्क  मागण्यासाठी धनगर समाजआंदोलणे, मोर्चे व उपोषण करीत आला आहेत. विविध सरकारणे धनगर समाजाला आश्वस्त करून अनुसुचित जमातिच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे फक्त तोंडी  सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाकर्त्या सरकारने आजपर्यंत धनगर समाजाच्या  एस टी आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात केली नाही. महाराष्ट्रात धनगर समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे.समाज असंघटित असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने धनगर समाजाचा फक्त  मतदानासाठी फायदा करून घेतला. 

हि गोष्ट आज समाजाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज उपोषणे, रास्ता रोको आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलने करित आहे. एस टी  आरक्षणाची अंमलबजावणी हि एवढी समाजाची रास्त मागणी असताना हे निगरगट्ठ सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करित नाही. देशात सर्व राज्यांमध्ये धनगर समाज विखुरलेला आहे. अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू केलेले आहेत. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे कि, जे धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेऊन राहिलं आहे. त्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकिय दृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहेत. धनगर समाजातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणात तसेच विविध स्पर्धा परीक्षेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते फक्त आणि फक्त धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले नाही म्हणून. रानावनात राहणाऱ्या या गरीब समाजाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने सर्वात जास्त फसविले आहे. त्यामुळे धनगर समाजाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आहे. जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी 5 ऑक्टोबर ला मारेगाव येथील तहसील कार्यालय समोर  या एक दिवसीय धरणे आंदोलनात  उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज आरक्षण कृती समिती मारेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

मारेगावतील बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून...