Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील सरपंचासह चार सदस्य झाले अपात्र

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील सरपंचासह चार सदस्य झाले अपात्र

गृहकराचा भरणा न करणे भोवले : ग्रामस्थांना करासाठी नोटीस पाठविणे पडले महाग

राळेगाव : गावातील ग्रामस्थांनी गृहकराचा भरणा केला नाही म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या, असा आदेश देणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत:च कराचा भरणा केला नाही, ही बाब दक्ष ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचाविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका दाखल केली. १० मे २०२२ रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल याचिकेवर सुनावणीनंतर बुधवारी निकाल लागला. सरपंचासह चार सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले.

मागणी करून चौघांनी गृहकराचा भरणा केला नाही

■ ग्रामपंचायतीकडून गृहकराचा भरणा करण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या. गावातील सर्व मालमत्ताधारकांना या नोटीस प्राप्त झाल्या. स्वतः ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सदस्य असणाऱ्यांनी गृहकर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ अ नुसार याचिका दाखल करण्यात आली.

■ अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीत ग्रामसेवक खैरी यांच्याकडे अहवाल मागितला. त्यामध्ये संबंधित सरपंच व सदस्य यांनी गृहकराचा भरणा केला नसल्याचे पुढे आले. त्यावरून अपर जिल्हाधिकारी यांनी १६ ऑक्टोबर रोजी सरपंचासह चार सदस्यांना अपात्र ठरविल्याचा आदेश दिला.

ग्रामपंचायत सरपंच किरण तृशांत महाजन, पुष्पा गजानन इंगोले, उमेश अंबादास भारशंकर, मारोती बाबाराव दडांजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. खैरी येथील ग्रामस्थ गणेश चिडे यांनी अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे या चार सदस्यांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली. या प्रकरणात अॅड. जयंत ठाकरे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ती ग्राह्य मानत त्यांना अपात्र घोषित केले.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...