Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / धनगर समाजाच्या अनुसूचित...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी तसेच समाजाची दिशाभूल करण्याचे षडयंत्र शासनाने बंद करावे

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी तसेच समाजाची दिशाभूल करण्याचे षडयंत्र शासनाने बंद करावे
ads images

तहसीलदार,तहसील कार्यालय मारेगाव मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मारेगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाचे निवेदन

मारेगाव: महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची  अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी तसेच सतत शासनाकडून समाजाची दिशाभूल करण्यासाठी जे षडयंत्र रचल्या जात आहे ते बंद करण्यासाठी राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी चौंडी येथे धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले होते. पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना शासन निर्णयाद्वारे अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले त्या चार राज्याचा सदर समिती भेट देवुन, अभ्यास करून महाराष्ट्रात धनगरांना शासन निर्णय काढुन एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याचे अभिवचन दिले होते. परंतु शासनाने दिलेला पन्नास दिवसाचा अवधी संपुन वरिलप्रमाणे शासनाने दिलेला शेद फिरविल्याने व सदर अवधीत काहीही प्रयत्न केल्याचे दिसत नसल्याने धनगर समाजात शासनानं महाराष्ट्रातील धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचे निदर्शनास येते. तेव्हा धनगरांचा विश्वासघात

करणाऱ्या या शासनाचा निषेध करण्यात येत असुन ताबडतोब महाराष्ट्र राज्यात धनगरांना अनुसुचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा राज्यात धनगर समाज यापुढे तिव्र आंदोलन  करण्याचे मनःस्थितीत असुन त्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदारराहील तेव्हा शासनाने या बाबीची दखल घेवुन त्वरीत अंमलबजावणी करावी अशा न्यायदत्त मागणीसाठी मारेगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय, मारेगाव यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मारेगाव चे तालुकाध्यक्ष आशिष साबरे सर, धनगर समाज संघर्ष समिती मारेगावचे तालुकाध्यक्ष अतुल बोबडे, माणिक पांगुळ, संजय काळे, प्रवीण लोंढे सर, संजय लोंढे सर, अरविंद वखनोर, पवन आसकर, मंगेश साबरे, बंडूजी उराडे, महेंद्र बोधे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

मारेगावतील बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून...