Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सुधीर भाऊ मुनगंटीवार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचा माकप कडून निषेध.

सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचा माकप कडून निषेध.

महिला व बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे उद्गार मागे घ्या - माकपची मागणी.

वणी :- दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेच्या मंचावरून चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करणारे उद्गार काढून बहिण भावाच्या व महिलांच्या पवित्र नात्याला अपमानित केले आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचा  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करीत असून, बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे उद्गार मागे घ्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

 सध्या देशामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या सभा होताना आपण पाहतो आहे. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन केवळ मताचा जोगवा मागण्याकरिता अशा रीतीने अगदी खाल्याची पातळी गाठून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. त्या महाराष्ट्रात बहीण भाऊ आणि महिलांना कलंकित करणारे असे उद्गार सांस्कृतिक मंत्री यांनी जाहीरपणे करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. १९८४ मध्ये घडलेल्या दंगलीचे समर्थन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत नाही. परंतु त्या दंगलीचा आधार घेऊन मतदारांना व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, सामाजिक स्वास्थ बिघडवणे अपेक्षित नाही. या विधानाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंडन करीत असून असे विधान करणे म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याला अपमानित करणे असेच होय.

प्रतिष्ठे पायी होणाऱ्या गुन्ह्या विरुद्ध कायदा करण्याची मागणी लावून धरली असताना असा कायदा करण्यासाठी भाजप सरकारने नकार दिला आहे. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या गुन्ह्याच्या विरुद्ध आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध कडक कारवाई  करण्याचा कायदा करण्यासाठी भाजपच्या सरकारने कोणतेही सौजन्य दाखविलेले नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर महिला सक्षमीकरणाच्या बाता करीत आहे. "आधी कायदा करा आणि नंतर बोला" हीच भूमिका माकप ची राहिलेली आहे.

   बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या बद्दल  मुनगंटीवार यांनी काढलेल्या त्या उद्गाराचा निषेध करण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहे. असे कॉंम्रेड कुमार मोहरम पुरी, ऍड. काँ. दिलीप परचाके, कॉं.मनोज काळे कॉं.नंदू बोबडे कॉं. गजानन ताकसांडे, यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले असून, या पत्रकार परिषदेला  कॉंम्रेड कुमार मोहरमपुरी,ॲड.कॉंम्रेड दिलीप परचाके, कॉं. मनोज काळे, कॉं. नंदू बोबडे, गजानन ताकसांडे,ॲड.विप्लव तेलतुंबडे व अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वणीतील बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...