Home / यवतमाळ-जिल्हा / अनुभविय...! पिढी घडवण्याचा...

यवतमाळ-जिल्हा

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'...
ads images

प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे यशस्वी आयोजन

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे वर्ष. दरवर्षी तीन ते चार बॅचेस घेतल्या जातात. 21 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत पहिली बॅच घेण्यात आली. आत्ताच्या उन्हाळी शिबिराचा विचार केला तर काहीतरी हाय फाय डोळ्यासमोर येत, पण त्यातून काही शिकायला मिळतं का? मुलांमधल्या कलागुणांची क्षमतेची चिंगारी पेटवायचं, स्पार्क देण्याचं ‌ काम डॉ. अविनाश सावजी (M.B.B.S) स्वतः सातत्याने करत आहेत. या सात दिवसीय निवासी शिबिरात मुलं फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट शिवाय असतात. दारोदारी पुस्तक विकणे फळ विकणे, रस्त्यावरील विक्रेत्यांच्या मुलाखती घेणे, या गोष्टीतून मुलांची कष्टाची परिभाषा बदलली. श्री प्रशांत पवार (समर्थ फाउंडेशन) यांनी मुलांना सात दिवस मित्रां सारखे वागवले आणि उत्तम असे मार्गदर्शन केले. डोंगरावर चढणं, झाडावर चढणं, पडून उठून परत चढणं यातून मुलं खूप काही शिकली. आयुष्याची चौकट मोडून अलीकडे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी मुलं शिकली, डायरी लेखन, पुस्तक वाचन अशा अनेक गोष्टी करायला प्रेरित केले. वृद्धाश्रमात वृद्धांच्या सहवासात चार गोष्टी शिकायला मिळाल्या बिना तेलाचं, साखरेचे जेवण खाणं आणि बनवणं शिकले. डॉ. राजश्री मोहोड (सीईओ प्रयास अमरावती) यांनी देखील सात दिवस मुलांना प्रोत्साहन दिले व नवनवीन गोष्टी शिकवल्या. टीम वर्क, मेहनत अशा विविध गोष्टींची शिकवण मुलांना या शिबिरातून मिळते. डॉ. अविनाश सावजी(संस्थापक अध्यक्ष प्रयास संस्था, अमरावती) यांनी मुलांना सन 2044 च्या दृष्टिकोनाचे विचार करायला लावले, याने मुलांना कमी वयात आयुष्याची स्पष्टता आली. 2044 मध्ये मुलं काय बनतील त्यांचा आयुष्याचा गोल काय असेल हे त्यांनी ठरवून 2044 मध्ये आपली नेमप्लेट बनवली. पुढील बॅचेस 5 मे, 19 मे, 2 जून या तारखांना घेण्यात येतील. या शिबिराला महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असतो आणि आजवर डॉ. अविनाश सावजींच्या हाताखाली हजारो मुलं घडले आहेत असा वयक्तिक अनुभव एक शिबिरार्थी कु. याज्ञिका नेवे यवतमाळ यांनी सांगितला.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...

निमाकॉन यवतमाळ-२०२४ जल्लोषात संपन्न

यवतमाळ:नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे रविवार , दि. १७ मार्च २०२४ रोजी स्थानिक सर विश्वेश्वरैय्या...