Home / यवतमाळ-जिल्हा / चंद्रपूर-वणी-आर्णी...

यवतमाळ-जिल्हा

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल,मा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांनी केले अतिशय अश्लील वक्तव्य, काँग्रेस आक्रमक

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे वादग्रस्त विधान करणाऱ्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजप लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात कॉग्रेस पक्षाने अतिशय आक्रमक भूमिका घेऊन मुंगटीवार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा नाना पटोले यांनी सांगितले. तसेच घुग्गूस शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, ज्येष्ठ नेते जयंता जोगी,ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नेते दिलीप पिटटलवार,आप नेते अमित बोरकर,ज्येष्ठ नेते बाबा कुरेशी,मुन्ना भाई लोहानी,तिरुपती महाकाली,महिला नेत्या यास्मिन सैय्यद,पदमा त्रिवेणी,दुर्गा पाटील,सुजाता सोनटक्के,संध्या मंडल,शिल्पा गोहिल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मुंगटीवार यांनी अतिशय घाणेरडे आणि अश्लील वक्तव्य करून स्वतःची प्रतिमा मलिन केल्याचे दिसून येते.सदर प्रचार सभेत देशाचे पंतप्रधान मा मोदी ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांनी अश्लील वक्तव्य करून कांग्रेस ला दिवचण्याचे प्रयत्न केले. एकीकडे मुनगंटीवार हे स्वतःला विकास पुरुष म्हणून मिरवतात आणि दुसरीकडे मात्र असे असांस्कृतीक आणि अश्लील वक्तव्य करतात त्यामुळे मतदार कमालीचे नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे.ज्या व्यक्तीची वैचारिक पातळी एवढी खाली घसरलेली आहे तो काय या मतदार संघाचं नेतृत्व करेल अशी टीका इंडिया आघाडीने केली आहे.संविधान आणि देश वाचविण्यासाठी,हुकूमशाही विरुद्ध लोकशाही ची लढाई लढण्यासाठी इंडिया आघाडीला मतदारांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी विरोधकांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...

निमाकॉन यवतमाळ-२०२४ जल्लोषात संपन्न

यवतमाळ:नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे रविवार , दि. १७ मार्च २०२४ रोजी स्थानिक सर विश्वेश्वरैय्या...