Home / विदर्भ / अमरावती / तणावाच्या स्थितीत बंधूभावाचा...

विदर्भ    |    अमरावती

तणावाच्या स्थितीत बंधूभावाचा झरा, अमरावतीत हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिमांकडून खडा पहारा

तणावाच्या स्थितीत बंधूभावाचा झरा, अमरावतीत हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिमांकडून खडा पहारा

तणावाच्या स्थितीत बंधूभावाचा झरा, अमरावतीत हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिमांकडून खडा पहारा

अमरावती: अमरावतीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. हिंदू-मुस्लीम वाद अशी किनार या तणावामागे आहे. मात्र सगळीकडे वातावरण दूषित झालेले असताना अमरावतीमध्ये मुस्लीम बहुल परिसरात बंधुत्वाचा झरा अजूनही वाहत आहे. येथे हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधवांकडून केली जात आहे. तणावाच्या स्थितीत बंधूभावाचा झरा, अमरावतीत हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिमांकडून खडा पहारा.

त्रिपुरामधील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही शहरांमध्ये अमटले. यामध्ये अमरावती शहर तुलनेने जास्त होरपळले. या शहरात जमावाने मोठी तोडफोड केली. तसेच काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अमरावतीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. हिंदू-मुस्लीम वाद अशी किनार या तणावामागे आहे. मात्र सगळीकडे वातावरण दूषित झालेले असताना अमरावतीमध्ये मुस्लीम बहुल परिसरात बंधुत्वाचा झरा अजूनही वाहत आहे. येथे हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधवांकडून केली जात आहे.

मंदिराच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधव सरसावले अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम बहुल परिसरात असलेल्या हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम करत आहेत. हिंदू-मुस्लीम एकतेचा चांगला संदेश दिला जात आहे. अमरावतीच्या इतवारी हा मुस्लीम बहुल परिसर आहे. मात्र त्याच परिसरात हिंदू धर्मियांचं शिव मंदिर आहे. हे मंदिर अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे. या हिंसाचाराला हिंदू-मुस्लीमचा रंग देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मंदिराला कोणी काही करू नये, म्हणून मुस्लीम बांधव सरसावले आहेत. या मंदिराचे मुस्लिमांकडून रक्षण करण्यात येत आहे.

भावना दुखावता कामा नये म्हणून सुरक्षा “सगळ्यांच्या भावना मंदिर, मशीद, गुरुद्वारासोबत जुळलेल्या असतात. त्या भावना दुखावता कामा नये, म्हणून आम्ही परिसरातील मंदिराची सुरक्षा करत आहोत,” अशी भावना येथील मुस्लीम बांधवांनी व्यक्त केलीय.

अमरावतीचा हिंसाचार म्हणजे पूर्वनियोजित कट- यशोमती ठाकूर दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेला आता पाच दिवस झाले आहेत. सध्या अमरावतीमध्ये संचारबंदी सुरू आहे. मात्र ही परिस्थिती आता पूर्वपदावर आणण्याची गरज व्यक्त केली जातेय. यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहे आणि हा हिंसाचार कसा घडला याविषयीची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलीय. अमरावतीमध्ये आम्ही शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदू-मुस्लीम सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावत आहोत. अमरावतीमध्ये जे घडलं तो एक कट होता. कट रचला गेला होता. ऍक्शनला रीऍक्शन देण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला आहे. ज्यांनी घडवलं तेच आरोप करत सुटले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. ब्रॉड बँड सेवा आज किंवा उद्यापर्यंत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात. 24 July, 2024

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा,...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत. 24 July, 2024

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* 23 July, 2024

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू*

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-राजुरा येथील...

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा. 23 July, 2024

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस- तालूक्यात, शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार च्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे 23 July, 2024

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

वणी :मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री...

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी. 23 July, 2024

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी.

वणी:- वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पूर्वी थांबवावी याकरिता मनसे वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी आज दिनांक...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...