Home / विदर्भ / अमरावती / अमरावती ते कोलंबिया...

विदर्भ    |    अमरावती

अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी ।। चहा विक्रेत्याच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास, उच्च शिक्षणासाठी उंच भरारी

अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी ।। चहा विक्रेत्याच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास, उच्च शिक्षणासाठी उंच भरारी

प्रेरणादायी : अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी  मनामध्ये शिकण्याची जिद्द असेल तर घरची आर्थिक परिस्थिती आड येत नाही, हे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाने सिद्ध करून दाखविले आहे. चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने झोपडीत अभ्यास करून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला आहे. तो शिक्षणासोबतच फावल्या वेळात नोकरी करणार असल्याने त्याला दरमहा दीड लाख पगार मिळेल. विकासच्या या भरारीमुळे त्याचे आई-वडील आणि मित्रमंडळी भारावून गेले आहेत.

विकासचे वडील कृष्णा तातड हे येथील दयासागर रुग्णालयाजवळ चहाची टपरी चालवतात, तर आई रेखा यांनी घरीच छोटेसे दुकान टाकून उदरनिर्वाहाचे साधन मिळविते. त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी कशीबशी तरतूद करीत गेले. जेथे दहावीनंतर शाळा सोडून दोन-चार पैसे हाती येण्यासाठी कष्टाची वाट धरली जाते, त्या परिसरात राहूनही विकासने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.

केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून बी.कॉम. झाल्यानंतर मुंबईच्या टीआयएसएस मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याच दरम्यान त्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, असा निर्धार केला. मात्र, या शिक्षणासाठी त्याला सव्वा कोटी रुपये खर्च येत होता.

तीनदा नाकारला व्हिसा महाराष्ट्र सरकारची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती विकासला मंजूर झाली. मात्र, व्हिसा काढताना या शिष्यवृत्तीशिवाय खात्यात किती पैसे आहेत, अशी विचारणा झाली. खात्यात पैसे नसल्याने बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे तब्बल तीनवेळ व्हिसा नाकारला गेला. n अखेर चौथ्यांदा समाजातील काही नागरिकांनी त्याला ३० ते ४० लाख रुपयांची मदत केली आणि व्हिसाची प्रक्रिया पुढे सरकली. भविष्यात देशातील जातीव्यवस्था कमी व्हावी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील भेदाभेद नष्ट करायचे आहे. लहान-मोठ्या शाळांमध्ये प्रचलित अभ्यासक्रमांऐवजी बदलत्या काळानुसार शिक्षण प्रणालीसाठी संशोधन करण्याचा मानस आहे.

- विकास तातड, अमरावती.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...