Home / यवतमाळ-जिल्हा / बळीराजाचा न्याय समाजापुढे...

यवतमाळ-जिल्हा

बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे - प्रा. तोष्णा मोकडे

बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे - प्रा. तोष्णा मोकडे
ads images

सत्यशोधक महिला व अध्यापक विचार मंच ,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन ,ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने केले महोत्सवाचे आयोजन 

यवतमाळ: समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण, त्यांचा खरा इतिहास समाजापुढे यावा म्हणून सत्यशोधक महिला व अध्यापक विचार मंच ,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन ,ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने दिनांक 5  नोव्हेंबर 2021रोजी आयोजित ज्योती सावित्री विहार महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ मोहा फाटा ,धामणगाव रोड यवतमाळ येथे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. तोष्णा मोकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळीराजाचा संघर्ष हा सूर आणि असुरांचा होता, वामनाने कपटाने बळीचा अंत केला .परंतु त्यांना बळीराजा संपवता आला नाही .ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली .मान्य नम्रता खडसे यांनी बळीराजा आणि आजच्या शेतकऱ्याची झालेली आर्थिक पिळवणूक या बाबत संदर्भ देऊन मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ.ज्ञानेश्वर गोरे म्हणाले ,आपल्या शिक्षणातून जर बळीराजाच्या इतिहासाची चिकित्सा सुशिक्षित समाजाला करता येत नसेल, तर ते शिक्षण तुम्हाला गुलाम बनवते. त्यामुळे आपण आपल्या विचारांच्या संकल्पना वृद्धिंगत केल्या पाहिजे .आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे दृष्टी घेऊन आपण आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून .मान्य विकास दरणे ,विद्या खर्चे,विलास काळे, ज्योती खेडकर .हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नीता दरणे,माधुरी फेंडर , अनिता गोरे , कमलताई खंडारे ,माया गोरे , प्रमिला पारधी , अपर्णा लोखंडे ,रेखा कोवे , शुभांगी मालखेडे , सेजल फेंडर, भावना गुल्हाने, रिता ठवकर , दीपा काळे , रेखा मगर, शोभना कोटंबे , लता सोनटक्के, प्रा. सुनंदा वालदे, सुधा वाघमारे, मृणाली दहीकर , यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सुनिता काळे यांनी केले , तर आभार कल्याणी मादेशवार यांनी मानले.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...