Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / बोगस रासायनीक खते विकनाऱ्यां...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

बोगस रासायनीक खते विकनाऱ्यां पतिला वाचवन्यासाठी पत्नीचे शेतकऱ्यांवर बोगस आरोप...

बोगस रासायनीक खते विकनाऱ्यां पतिला वाचवन्यासाठी  पत्नीचे शेतकऱ्यांवर बोगस आरोप...

मंगेश दिलीप तिखट (प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शेतकरी कमलाकर ठाकरे व अन्य असंख्य शेतकरी यांनी दत्तकृषी केंद्राचे संचालक राजु ऊर्फ प्रदिप मनिराम वैद्य (दत्त कृषी केंद्र शंकरपुर ) यांच्या विरोधात बोगस रासायनिक खते विक्री करुन आर्थीक नुकसान करुन फसवनुक केल्याची तक्रार कृषी विभागाकडे दाखल केली होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महेशभाऊ हजारे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व चंद्रपूर पोलिस अधिक्षक साहेब यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे चौकशी करन्याची विनंती करण्यात आली होती, त्यानंतर या प्रकरणाची जिल्हा कृषी विभाग चंद्रपुर मार्फत शासकिय लँब अमरावती येथे रासायनिक खतांचे नमुने पाठवले असता रासायनिक घटकांचा अभाव अढळल्याने रासायनिक खते बोगस असल्याचे सिद्ध झाले.

त्यामुळे पोलीस स्टेशन शंकरपुर येथे कृषि संचालकावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास सुरु आहे. या कृषी केंद्राच्या बोगस रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले असून प्रती शेतकरी अंदाजे लाखो रुपये नुकसानित गेला आहे,परंतु कुठलीही नुकसान भरपाई या पिढीत शेतकऱ्यांना दत्तकृषी केंद्राकडुन मिळाली नसुन, ऊलट तक्रारकर्ते शेतकरी कमलाकर ठाकरे यांच्यावर दबाव टाकत मानसीक त्रास देऊन समाजामध्ये पत-प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न दत्तकृषी केंद्राचे संचालक राजु वैद्य व त्यांच्या पत्नी सौ.स्वाती राजु वैद्य यांच्याकडुन सुरु झाला आहे.

काही दिवसापुर्वी सौ.स्वाती वैद्य यांनी पोलीस स्टेशन शंकरपुर येथे  तक्रारकर्ते कमलाकर ठाकरे यांच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊन स्वताच्या पतिला वाचवन्यासाठी कायद्याचा गैरवापर केला जात आहे.

तक्रारकर्ते कमलाकर ठाकरे व ईतर शेतकरी भयभित झाले असुन भविष्यात कटकारस्थान करुन खोटे आरोप या वैद्य कुटुंबाकडुन केले जाऊ शकतात अशी भिती तक्रारकर्ते शेतकऱ्यांना वाटत असल्याचे प्रहारचे महेशभाऊ हजारे यांना सांगीतले..

तेव्हा तात्काळ प्रहारचे महेशभाऊ हजारे यांनी आपले सहकारी अशिद मेश्राम प्रहारसेवक चिमुर व अँड.विनोद मुंजेवार यांना घेऊन शंकरपुर येथे गेले व सर्व शेतकऱ्यांना सांगीतले की, प्रहार जनशक्ती पक्ष तुमच्या सोबत खंबीरपणे ऊभा आहे व शंकरपुर येथील पोलीस चौकी येथे लेखीतक्रार दिली.

काल दि.24/01/2022 रोजी मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस आधिक्षक चंद्रपुर यांना लेखीनिवेदनाद्वारे या प्रकरनात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली व सुडभावनेतुन वैद्य कुटुंबाकडुन यापुढे कुठलीही आर्थीक, शारिरीक, व जिवितहाणी होऊ नये म्हणुन या संबधीत प्रकरनाची चौकशी करावी अशी मागनी प्रहारने केली.

दुर्दैवाने चुकिची घटना घडली व तक्रारकर्ते शेतकऱ्यांना काही त्रास झाला तर संबधीत प्रशाषण याला जबाबदार असेल असा ईशारा महेशभाऊ हजारे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

सोबत कमलाकर ठाकरे जवराबोळी, चंदु गजघाटे - जवराबोळी, सुरेश  भिवनकर- शंकरपूर, पवन गजघाटे- जवराबोळी, ज्ञानेश्वर अग्रवाल- हिवरा, नकुल  राऊत- जवराबोळी, सर्जेराव  ठाकरे- जवराबोळी, आशिष  ठाकरे- जवराबोळी, किशोर  चौधरी- चिचाळा, राहुल  ठाकरे- जवराबोळी, योगेश माळवे-जवराबोळी, नारायण राऊत-जवराबोळी सर्व शेतकरी ऊपस्थीत होते

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

चिमूरतील बातम्या

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...