चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील सर्वात मोठं गांव असलेल्या नेरी येथे दि.१२/२/२०२२ ला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाचे अनावरण तथा क्रातिज्योती सावित्रीबाई फुले १९१ वी जयंती महोत्सव समारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले नगर नेरी येथे कोविड 19 च्या सर्व निर्देशांचे पालन करुन संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रामचंद्र सालेकर राज्यउपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र यांनी महापुरुषांचे स्मारक हे शोभेची वस्तु न राहता त्यांचे समाज उत्थानाचे कार्य व त्यांचा विचाराचा वारसा भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहावा. महामानवांना जातीत बंदिस्त न करता त्यांची स्मारकं समाज जागृतीचे केंद्र बणावे. आपल्या सर्व माहामानवांनी शोषक वर्णव्यवस्था जातीव्यवस्था उखडून फेकण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अखील मानवता उद्धारासाठी कार्य केले असून त्यांना जातीत बंदिस्त करुन ठेवणे म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची प्रतारणा करुन त्यांचा आपण एकप्रकारे अपमान करत असल्याचे म्हटले. भावी पिढीने त्यांचे हे कार्य जरी पाहिले नसले तरी त्यांच्या कार्याचा व संघर्षाचा खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहचवने, त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करणे हे प्रत्येक जबाबदार नागरीकाचे आद्य कर्तव्य असून आपल्या मुलांना विध्वसंक प्रवृतीपासून वाचविण्यासाठी सदैव दक्ष राहण्याचे आव्हाण त्यांनी केले. आपल्या एक तासाच्या व्याख्यानामध्ये त्यांनी प्रतिगामी विध्वंसक प्रवृत्ती प्राचीन काळापासून तर वर्तमान काळात कशाप्रकारे सक्रीय आहे, त्यांनी आपले शारिरीक मानसिक तथा आर्थिक शोषण करण्यासाठी वर्णव्यवस्था जातीव्यवस्था धार्मिक जातीय द्वेश उचनिचता अंधश्रद्धा कर्मकांड भ्रामक साहित्ये या अमानवीय शस्त्राचा तथा कुटनितीचा कसा वापर केला व या शोषणातून आपल्याला मुक्त करण्यासाठी या महामानवांनी या शोषक व्यवस्थेशी कसा संघर्ष करुन लढा दिला हे सोदाहरण स्पष्ट केले. वैभवशाली भारत व प्रत्येक भारतीयांची प्रगती महापुरुषांचे कार्य, विचार व प्रेरणाच घडवून आणू शकते असा ठाम विश्वास व्यक्त करुन महात्मा फुले यांनी सांगीतलेला सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघ शिवधर्माच्या माध्यमातून प्रयत्नरत असून त्यांच्या या कार्याचा वसा पुढे चालवत असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी सहारे माजी सरपंच नेरी, उद्धघाटक संजयजी डोंगरे माजी अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक चंद्रपूर, सहउद्घाटक विजयजी कडूकर सामाजिक कार्यकर्ता, कार्यक्रमाचे प्रमुख सुत्रधार आयोजक तथा मार्गदर्शक प्रभाकरराव लोथे अध्यक्ष माळी समाज नेरी, रेखाताई पिसे सरपंच ग्रा.पं.नेरी,सौ.राजुरवाडे मॕडम समतादल डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे,राजीव पळवेकर उपाध्यक्ष माळी समाज नेरी, ज्ञानेश्वर नागदेवते सेवानिवृत शिक्षक, धोंगडे सर, पांडूरंग मेश्राम सर,सौ.अर्चनाताई डोंगरे प्राचर्य सरस्वती कन्या विद्यालय नेरी, ललिताताई कडूकर सदस्या ग्रा.स.नेरी, यांचे मार्गदर्शन झाले.
दोन दिवशीय कार्यक्रमात प्रश्नमंजुषा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ सहारे यांनी केले, सुत्रसंचालन सुमित लांजेकर यांनी तर आभार नितेश कामडी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा ज्योतीराव फुले माळी समाज नेरीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.