Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *मुलला देशातील सर्वोत्तम...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !*    *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !*

 

नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

मुल, दि.२४ :-चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेषत: मुलच्या विकासात अडसर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आपण हे सर्व प्रयत्न हाणुन पाडले आहे. सत्तेत असो अथवा नसो मुलचा विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुल येथील सुभाष प्राथमिक शाळेसमोरील भव्य प्रांगणावर आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अविनाश जगताप,भाजपा महामंत्री नामदेव डाहुले,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,अमोल चुदरी, गजानन वलकेवार,लोकनाथ नर्मलवार,प्रशांत बोबाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुलमध्ये व्यापक प्रमाणावर परिवर्तन होत आहे. मध्यंतरीच्या काळात सत्ता नसल्याने सर्व विकास कामे थांबविण्याचा प्रयत्न विरोधकांनी करून पाहिला. परंतु सत्ता नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी आपण घेतलेल्या आक्रमक पवित्र्यापुढे विरोधकांचे काहीही चालले नाही. दोन वर्षाच्या काळात अनेक कामे बंद पाडण्याचा सपाटा लावण्यात आला होता. मात्र आता जनेतेचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे मुल तालुक्याला देशातील सर्वोत्तम तालुका करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

देशात काही पक्ष जातीधर्माच्या नावावर विष पेरण्याचे काम करीत आहेत. हिंदू-मुस्लिम असा भेद करू पहात आहेत. अफजल खानला एका विशिष्ट धर्माचा असल्यामुळे कुणाचाही विरोध नसून त्या प्रवृत्तीला विरोध आहे. देशात विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्याचे काम करीत आहेत. मात्र काही शक्ती आणि काँग्रेस पक्षाकडून मोदीजी यांचा विरोध सातत्याने करीत आहेत. अशा शक्तींना आणि पक्षांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

सैनिकी शाळा, मूलचे बस स्थानक, एसएनडीटी विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, बांबू प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक वाचनालय अशा विविध माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख बदलत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव पोहोचले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराला व नव्या संसद भवनाला लावण्यात आलेले काष्ठ चंद्रपुरातील असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की विकासाचा हाच धडाका कायम ठेवायचा आहे. सर्वांची साथ असली तर विकास अधिक वेगाने शक्य होईल असे ना.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी, कार्यक्रमाला संजय येनगंट्टीवार,कवडू कोल्हे,संजय भास्करवार,विपीन भालेराव,अविनाश वरगंटीवार,सतीश आक्कूलवार,गुरु भंडारे,आकाश मारकवार,जितू टिंगूसाठे,आकाश कोल्हे उपास्थित पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मूलतील बातम्या

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश...

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व...

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मुल:-क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय...