Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *शेतकऱ्यांच्या विविध...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा*    *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा*

 

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

मुल:-शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसून नासधूस करणाऱ्या वन्य प्राण्यांनी मुल तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले. तसेच मानव वन्यजीव संघर्षातून तालुक्यासह परिसरात अनेकांचे बळी गेले. मात्र वनविभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तर वनमंत्रांच्या स्थानिक मतदारसंघातील गंभीर प्रश्नांना घेऊन आज काँग्रेसने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर हजारोंच्या  उपस्थितीत जनाक्रोश मोर्चा काढत वनविभाग व सरकारचा निषेध नोंदविला.चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून सर्वदूर परिचित आहे. सध्या शेती हंगाम हा अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या शेतात हिरवे सोने म्हणजेच धान पीक उभे आहे. मात्र मुल तालुक्याला वन परिसर लागून असल्याने वनातील वन्य प्राणी यात मोठ्या प्रमाणात रान डुक्करांनी शेतात घुसून प्रचंड प्रमाणात हौदोस शेतपिकांचे नुकसान केले आहे. अशा गंभीर परिस्थितीत आधीच कर्जबाजारीमुळे त्रस्त असलेल्या बळीराजाला आता जीव देण्याची पाळी आली आहे. तर वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ यात झालेली नासधूस याचे वनविभागा मार्फत पंचनामे केले जाते मात्र नुकसान भरपाई म्हणून केवळ तोकडे व अत्यल्प मदत देऊन वन प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. सोबतच शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर यांचेवर वन्य प्राण्यांनी चढविलेल्या हल्ल्यात अनेकांचा नाहक बळी गेला. व अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. वनमंत्राच्या स्थानिक मतदार संघातील मुल तालुक्यात सुरू असलेल्या या गंभीर घटनांकडे मात्र वन विभागासह वनमंत्री देखील असंवेदनशीलतेचा कळस गाठला असल्याचा आरोप करीत आज काँग्रेसने राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा मुल तालुका काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढला.या मोर्चाला संबोधित करताना राज्याचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, देशात धर्मांधता पसरवून, जाती जाती मध्ये भांडणे लावून अराजकता माजविल्या जात आहे. अच्छे दिनाचे खोटे वादे करून महागाई वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जात आहे. भाजप नेत्यांच्या कंपन्या व दुकानदारी चालविण्यासाठी खाजगीकरणातून कंत्राटी भरती करून युवकांचे भविष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या अश्या निर्दयी व भ्रष्ट सरकारला जाग आणण्यासाठी आता संघर्षाचा मार्ग पत्करावा लागणार असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पायउतार केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या जीवांना पैशाच्या तराजूत तोळता शेतीचे उध्वस्त करणाऱ्या व मनुष्याच्या जीवावर उठणाऱ्या  वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने स्वतः करावा अन्यथा धुडगूज घालणाऱ्या व हल्ले चढवणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रत्येक शेतकऱ्याला अधिकृत परवानगी देऊन शस्त्र वाटप करावे. तसेच वनविभागाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. असा सज्जड इशारा देत विरोधी पक्ष नेते वरील टीवारांनी वनविभाग व सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.यानंतर तहसीलदार मुल यांना लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार , शिवा राव,माजी महिला आघाडी जिल्ह्याध्यक्ष चित्रा डांगे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमिज शेख व मुल तालुका काँग्रेस चे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर व महिला उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात. 24 July, 2024

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा,...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत. 24 July, 2024

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* 23 July, 2024

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू*

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-राजुरा येथील...

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा. 23 July, 2024

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस- तालूक्यात, शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार च्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे 23 July, 2024

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

वणी :मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री...

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी. 23 July, 2024

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी.

वणी:- वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पूर्वी थांबवावी याकरिता मनसे वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी आज दिनांक...

मूलतील बातम्या

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश...

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर...

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मुल:-क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय...