Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / तीन वर्षांपासून नाली...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

तीन वर्षांपासून नाली सफाई नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.!

तीन वर्षांपासून नाली सफाई नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.!

ब्रम्हपुरी नगर परिषदेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथील ज्ञानेश्वर नगर नागरिकांनी वारंवार नगरपरिषद ब्रम्हपुरी येथे निवेदने देऊन सुद्धा गेल्या तीन वर्षापासून नालीचा उपसा न केल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आलेला असून नगरपरिषद प्रशासनावर सर्व स्तरातून अकार्यक्षम असल्याचा ठप्पा लागत आहे.

ज्ञानेश्वर नगर येथील वडसा रोड लगत असलेली नाली मागील तीन वर्षांपासून उपसा करण्यात आलेली नसून सदर नालीला बाजार चौका लगत असलेल्या तलावाचे दुषित पाणी वारंवार सोडण्यात येते तसेच पावसाचे पाणी नालीचा उपसा न केल्यामुळे शेजारी असलेल्या खाली भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहत असल्यामुळे डम्प झालेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे ब्रह्मपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत नालीचा उपसा करण्यात यावा असा विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आले.या अगोदर सुद्धा निवेदनकर्त्यांनी मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांना वारंवार विनंती अर्ज केलेले आहे मात्र त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना नगरपरिषद स्तरावरून करण्यात आलेली नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात साप , विंचू सारखे किडे विषारी प्राणी रस्त्यावर , घरात प्रवेश करतात त्यांचा येथील आजूबाजूला राहात असलेल्या नागरिकांना नेहमी धोका असतो . असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाच्या सुरुवातीला शहरातील सर्व नाल्या गटारे साफ करणे ही नगर परिषदेची जवाबदारी असते. मात्र दर वर्षीच्या तुलनेत नाली उपसा करणाऱ्या कामगारांची संख्या ५० वरून कमी करत ३० कामगार सध्यास्थितीत नाली उपसा करतात त्यामुळे जे ५० कामगारांना नाली उपसणे शक्य नव्हते ते ३० कामगार कसे काय करणार हा सर्वसामान्य नागरिकांना समजण्यासारखा विषय आहे. ब्रह्मपुरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळे शहरात विकास कामातही वाढ झालेली असून नालीचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा दीडपट झालेली आहे.आणि त्यामुळे पुर्वी असलेल्या ५० कामगाराच्या तुलनेने ८० ते ९० कामगाराची गरज असताना ५० कामगारांवरून अवघे ३० कामगार कामावर ठेवल्याने शहरांमध्ये अस्वच्छतेचा पसार माजलेला आहे आणि असे असताना सुद्धा राजकीय पाठबळाच्या जोरावर वरच्या पातळीवर स्वच्छ सुंदर ब्रम्हपुरीचा बागुलबुवा करुन शहराला स्वच्छतेचा नामांकन प्राप्त करून घेतल्या जातो याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरामध्ये विकास कामे करायची असून स्वच्छतेचे काम असो पाण्याच्या संबंधित काम असो किंवा विजेच्या संबंधित काम असो ही सर्व कामे शहरातील नागरिकांनी दिलेल्या कराच्या पैशामधून केली जातात आणि त्यामुळे शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ही नगरपरिषदेची जवाबदारी आहे मात्र येथील प्रशासनाला शहरातील नागरिकांच्या समस्यांची काही लेने देणे नसून फक्त कर वसुली करीता व्याजाच्या टक्क्याने टक्का जोडून कर वसुली केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाबाबत फार मोठा आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...