Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी तालुक्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी तालुक्यात मुदतीनंतरही वाळू घाटातून अवैध उपसा व वाहतूक सुरू.

ब्रम्हपुरी तालुक्यात मुदतीनंतरही वाळू घाटातून अवैध उपसा व वाहतूक सुरू.

 रवि चामलवार (ब्रम्हपुरी प्रतिनिधी):-  ब्रम्हपुरी तालुक्यात वाळू उत्खनणं व वाहतूक कालावधी संपलेली असतांना राजकारणाशी संबंधित सत्ताधारी, विरोधक व काही नेते व कार्यकर्ते तस्करीत सहभागी वाळूची तस्करी अविरत करीत असून यातून अनेक वाळू तस्कर गब्बर झालेत व सबकुछ मॅनेज है ची भाषा वापरीत आहेत. वाळू घाटावरून वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी वाळू तस्करांनी योग्यवेळ ठरविल्या असून या सर्व प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , व सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आर्थिक हितातून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण ? असा प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात अनेक वाळू घाट असून ६ रेती घाटांचे लिलाव झालेले होते तर बरेच वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही.जिल्हाधिकारी यांनी वाळू घाटाचा लिलाव करतांना बरेच अटी शर्ती, त्यामधे वाळू घाटातील वाळू उपसा करतांना लांबी, रुंदी, खोली तसेच विशिष्ट जागेचे क्षेत्रफळ ठरवून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वाहनाने वाहतूक करताना वाळू वाहतूक परवाना ( रॉयल्टी ,) घेणे, वाहनावर बंधन कारक ताडपत्री झाकणे, असतो सूर्योदय नंतर सूर्यास्त होण्याआधीच व नदीपात्रातून वाळू , रात्री वाहतूक न करणे व उपसा केलेली रेती योग्य परवान्यासह अकृषक जागेतच साठवून ठेवणे अशी बरीच मोठी नियमावली आहे.  

मुख्यतः लिलाव झालेल्या वाळू घाटाची वाळू उपसण्याची कलावधी संपली आहे.मात्र यानंतरही या वाळू घाटांवरून सर्रासपणे दिवस रात्र वाळूची वाहतूक व उपसा सर्व नियम धाब्यावर ठेवून सुरू आहे. रॉयल्टी ५ हजारात घ्यावी लागते व तालुक्या मध्ये एक ट्रॅक्टर वाळूचे दर २ हजार रुपये सुरू आहे तरी सुद्धा ट्रॅक्टर मालक वाळू २ हजारात कसे काय देतात या मागिल गणित काय हे  समजण्या पलीकडील कोडे असून महसूल अधिकारी कर्मचारी यांनाच याचे उत्तर विचारणे उचित ठरेल.

 

ब्रम्हपुरी तालुक्यात बऱ्याच घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या वाळू घाटावरून वाळूची तस्करी  जाेमात सुरू असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी केवळ नाममात्र कारवाई करून ( कोटा रेट ) मोकळे होण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाळू तस्करांना मोकळे रान असल्याने.वाळू तस्करांवर कारवाईस पुढाकार घेणार कोण..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेती तस्करीत राजकारणाशी संबंधित सत्ताधारी व विरोधक काही नेते व कार्यकर्ते तस्करीत सहभागी असल्याची चर्चा  सुरू असून जाणीव पूर्वक प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाळूची तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या काही मोजक्या कर्तव्य दक्ष कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच कारवाई न करण्यास दबाव टाकतात. त्यामुळे त्यांना सुद्धा पर्याय नसतो. मात्र एखाद्याने कारवाई केली असता त्याची बदली केली जात आहे. अशी घटना तालुक्यात घडली असून लोकांनीं त्याचा विरोध केला आहे अशी माहिती आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...