Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / #-> *सकारात्मक दृष्टिकोन,...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

#-> *सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मानवी मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे व्यक्तिमत्व विकासाचे आधारस्तंभ आहेत-* *मा. पंकज वंजारे*

#-> *सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मानवी मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे व्यक्तिमत्व विकासाचे आधारस्तंभ आहेत-*       *मा. पंकज वंजारे*

भारतीय वार्ता :

---------------^-----------

व्यक्तिमत्व घडविणारे ब्रेन प्रोग्रामिंग कुटुंब, शाळा, शेजारी, वाचन, अनुभव आणि सामाजिकरणातून होत असते. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मानवी मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी सतत प्रयत्न केल्यास निश्चित एक विकसित पिढी देशात निर्माण होईल, त्यासाठी संतांचा आणि समाजसुधारकांचा सामाजिक, वैज्ञानिक विचार समजून घेऊन, आचरणात आणणे गरजेचे आहे.  असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या  युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक मा. पंकज वंजारे यांनी व्यक्त केले.  

 *या कार्यशाळेत त्यांनी आपण कसे घडतो, संवाद कौशल्य, अभ्यासाचे तंत्र, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यक्तिमत्व घडवीणारे ब्रेन प्रोग्रामिंग,आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन,संतांचे आणि समाज सुधारकांचे  सामाजिक विचार, मोबाईलच्या अतिरिक्त वापराचे धोके,आणि उपाय यासह विविध विषयांवर अत्यंत प्रभावी पद्धतीने विविध उदाहरणांसहित सखोल मार्गदर्शन केले.*

>  *ब्रम्हपुरी  येथे 3 व 4 डिसेंबर 2022 ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ब्रम्हपुरी आणि प्रेरणा फाउंडेशन ब्रम्हपुरी यांच्याद्वारे  झाडे मिटिंग हॉल येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न झाली .*

  3 डिसेंबरला कार्यशाळेचे उदघाटन ॲड. गोविंदराव भेंडारकर अध्यक्ष अभा अंनिस जिल्हा चंद्रपूर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी जीवनात अशा कार्यशाळांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे मत मांडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक मान. प्रेमलाल धोटे,भाऊराव राऊत संयोजक प्रेरणा फाऊंडेशन,डॉ मनीषा बनवाडे उपाध्यक्ष अभा अंनिस ब्रम्हपुरी हे उपस्थित होते .  *या कार्यशाळेत ब्रम्हपुरीतील आणि विविध गावातील 125 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.*

*कार्यक्रमाचे संचलन प्रा बालाजी दमकोंडवार यांनी केले.*

 

04 डिसेंबरला कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ खिजेंद्र गेडाम अध्यक्ष अभा अंनिस शाखा ब्रम्हपुरी, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मौलिक मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश(मोंटू) पिलारे, प्रा. विजय मुडे, प्रा. बालाजी दमकोंडवार, संघटक अभा अंनिस ब्रम्हपुरी, कु प्रियंका दिघोरे युवा संघटक ब्रम्हपुरी हे उपस्थित होते.

 *याप्रसंगी कार्यशालेबद्दल सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कु. सुहानी कामडी हिने केले आणि आभार प्रदर्शन वैभव तलमले यांनी केले.*

 

 *कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अभा अंनिस ब्रम्हपुरीचे संघटक बालाजी दमकोंडवार/प्रेरणा फाउंडेशनचे संयोजक भाऊराव राऊत,मुनिराज कुथे,/रक्तवीर सेनाचे अध्यक्ष निहाल ढोरे/ तसेच वैभव तलमले,निहाल ढोरे,स्वप्नील राऊत,रंजित तोंडरे,महेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.*

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...