वीर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र घराघरात जाउ द्या
वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाट्यप्रयोगाचा पोभुंर्णा येथे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/ पोंभुर्णा:- वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा आहे. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचावे हाच उद्देश्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित नाटकामागे आहे. नाटकाच्या रुपाने वीर बिरसा मुंडा हे घराघरापर्यंत तर पोहोचतील परंतु त्यांची शूरता आणि वीरता यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेच्या माध्यमातून सर्वांनी सकारात्मक शक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाटकाप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम,प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, आदिवासी मोर्चाचे प्रकाश गेडाम, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, चंद्रपूर भाजपा आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष धनराज कोवे, उपविभागीय अधिकारी ढवळे, गटविकास अधिकारी मरसकोल्हे, तहसीलदार कनवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते