Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / *शौचालयाच्या पाण्यावरून...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या  पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या  पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

चिमूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर आंबोली येथील एका इसमाने ४८ वर्षे महिलेचा काठीने मारहाण करून खून केला असून मुलाला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली. शारदा दयाराम वाघ असे मृतक महिलेचे नाव आहे तर मोहन दयाराम वाघ असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे.

आंबोली येथील आबादी प्लॉट बसस्थानक परिसरात राहत असलेली विधवा महिला शारदा दयाराम वाघ, मुलगा मोहन हे दोघेही आपल्या घरी झोपडी उभारण्यासाठी खड्डे खोदत असताना बाजस राहत असलेले गोपीचंद संपत शिवरकर (३०) या आरोपीने लपत छपत येऊन शारदा दयाराम वाघ हिच्या डोक्यावर बैलबंडीला लावण्यात येणाऱ्या उभारीने वार केला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलगा धावला असता, त्यालाही जखमी केले. मुलाने त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला. घराच्या जागेचा व शौचालयाच्या सांडपाण्यामुळे आरोपीचा व शारदा वाघ यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वाद होता. त्यांच्यात नेहमीच भांडण होत होते. शुक्रवारी झोपडी उभारण्याचे निमित्त झाले अन् आरोपीने शारदा दयाराम वाघ यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास शंकरपूर पोलिस करीत आहेत

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

चिमूरतील बातम्या

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...