Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *शेतकरी शेती तज्ञ मात्र...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*शेतकरी शेती तज्ञ मात्र परिस्थितीने शेतकरी हतबल ?* *हवामान बदल आधारीत शेतीची गरज कृषी अधिक्षक*

*शेतकरी शेती तज्ञ  मात्र परिस्थितीने शेतकरी हतबल ?*    *हवामान बदल आधारीत शेतीची गरज  कृषी अधिक्षक*

*शेतकरी शेती तज्ञ  मात्र परिस्थितीने शेतकरी हतबल ?*

 

*हवामान बदल आधारीत शेतीची गरज  कृषी अधिक्षक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 वरोरा:- वैनगंगा व्हॅली  शेतकरी उत्पादक महासंघ द्वारा आयोजित गहू ,  हरभरा या रब्बी पिकास पर्याय शेतकरी संवाद सभा व तज्ञांचे मार्गदर्शन वरोरा या ठिकाणी कांचनी जिनींग परीसरातआयोजित करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे संचालक सय्यद आबिद अली हे होते.  यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी जमीनी मध्ये रासायनिक खते व कीडनाशके यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत असल्याने पिकावर विविध आजारांमुळे उत्पादनावर  परिणाम होत असून उत्पादन सातत्याने घटत आहे. बदलत्या हवामानाबरोबर हवामानातीलबद्दल व जमिनीतील पोषक तत्व कमी होत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाचा फटका सहन करावा लागतो . यावर्षी सोयाबीन पिकावर येलो मॉझक हा एकच आजार नसून 72 प्रकारच्या विविध आजाराने पिकावर परिणाम झाला आहे. शेतीला लागवड केलेल्या खर्च देखील पदरात शेतकऱ्याचा पडला नाही .  या परिस्थितीवर  मात करण्यासाठी व जमिनीतील उत्पादन फेरपालट करण्याकरिता गहू , चण्याऐवजी जवस , मोहरी व चिया इत्यादी कमी खर्चाचे पिके लागवड करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे .यावेळी प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर  यांनी शेतकऱ्यांनी एफपीओच्या माध्यमातून नवनवीन संशोधन झालेल्या पीक लागवडीकडे लक्ष देण्याची गरज आहे .शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर यामुळे जमिनीवर विपरीत परिणाम होऊन  उत्पादन व विविध रोगाने शेतीमध्ये नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसतोआहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व पीक पद्धतीमध्ये फेरपालट करून कमी कालावधीत येणारे उत्पादन व सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे  मत व्यक्त केले  यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा सुशांत लवटे ,  प्रशांत चासकर  विजय काळे  यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी आबिद अली यांनी शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल यावर आधारित शेती करण्याची गरज असून भविष्याचा वेध लक्षात घेता बांबू ऊस लागवड हे पिके वाढत्या तपमान प्रदूषण व पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी फायद्याचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे व लागवडीसाठी पुढाकार घेण्याची गरज विशद केली. यावेळी वैनगंगा व्हॅलीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी एकच पिकलागवड करून धोका पत्करण्यापेक्षा नवनवीन पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये बदल करणे ही काळाची गरज आहे गेल्या दोन-चार वर्षात सोयाबीन पिकावर होत असलेली संक्रात व चना पिकांमध्ये मर रोगाची लागण ही शेतकऱ्यांना संकटात टाकणारी बाब आहे . रब्बी मध्ये वन्य प्राण्यांचा वाढलेला प्रकोप हा शेतकऱ्यांसाठी चिंतनाचा प्रश्न असून वन्यप्राणी व जनावरांपासून नुकसान न होणाऱ्या पिकाची लागवड करणे गरजेचे झाले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी यावेळेस तेलबियाची वाढती मागणी  लक्षात घेता जवस ,  करडी अशा पिकाची लागवड करावी असेआव्हान केले यावेळी कृषकोन्नती आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनीचे  बंडू डाखरे यांनी प्रस्ताविकात कंपनीच्या विविध योजना व शेतकरी  सभासदांच्या विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली . यावेळी महासंघाचे संचालक यशवंत सायरे , दिलीप फुलबांधे , सतिश बावने  गणेश वाभिटकर राजेश केळझरकर व सीईओ बालाजी धोबे , डोंगरकर साहेब, बघेल साहेब यांचेसह मोठ्याप्रमाणात शेतकरी सभासद उपस्थित होते . यावेळी चिया लागवड केलेल्या संदीप खुटेमाटे यांनी या लागवडीचे तंत्र व अनुभव विषद केले.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...