Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

 

✍️राजू गोरे शिरपूर

 

वरोरा:-नजीक परसोडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती ब्राह्मदास मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख वक्ते मराठा सेवा संघ प्रणित डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र सालेकर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चौखे, किशोर नगराळे यांचे मार्गदर्शन झाले याप्रसंगी रामचंद्र सालेकर यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली सालेकर त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी नसून शोषित,पिढीत,शेतकरी,शेतमजूर, महिला तथा सर्व भारतीयांचे कैवारी होते.शोषित वंचित ओबीसीं महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीयांपर्यंत  पोहचू नये म्हणून दलितांचे कैवारी संबोधने हे एक षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. ते आधुनिक भारताचे शिल्पकार असून प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे कार्य अथांग सागरा प्रमाणे आहे. शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक बौद्धिक साहित्यिक पत्रकारिता ..इ.सर्व क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार विश्वातलं एकमेव व्यक्तिमत्व विश्वाचं आठव आश्चर्य म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय.असे सांगून बाबासाहेबांचे शेती,शेतकरी,मजूर,महिला,ओबीसी,आदिवासी,सं विधान.. आदी वर आपल्या एक तासाच्या व्याख्यानात संक्षिप्त परंतु मार्मिक विवेचन रामचंद्र सालेकर यांनी केले. याप्रसंगी सुधाकर चौखे सरांनी ओवी द्वारा काव्यरूपात बाबासाहेबांची तथा महानायीकांच्या कार्याची महती विषद केली, किशोर नगराळे यांनी समाजाच्या उत्तथांणासाठी  बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला.त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मप्रकाश मानकर यांनी केले तर आभार धनराज रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अमित गजभिये सर यांनी पार पाडले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी स्वयंदीप बहुउद्देशीय बौद्ध मंडळ व रमाई महिला मंडळ तथा समस्त परसोडा वासीयांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वरोरातील बातम्या

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन*

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-सार्वजनिक आरोग्य...