Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *नवसाला पावलेल्या उखर्डा...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*नवसाला पावलेल्या उखर्डा ते नागरी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे* *पाहणी करायला आलेले बांधकाम अभियंता झोपेत आहेत काय? विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा सवाल* *कामाचा दर्जा उत्तम ठेवावा अन्यथा काम बंद पाडणार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अभिजित कुडे यांचा इशारा*

*नवसाला पावलेल्या उखर्डा ते नागरी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे*    *पाहणी करायला आलेले बांधकाम अभियंता झोपेत आहेत काय? विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा सवाल*    *कामाचा दर्जा उत्तम ठेवावा अन्यथा काम बंद पाडणार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अभिजित कुडे यांचा इशारा*

*नवसाला पावलेल्या उखर्डा ते नागरी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे*

 

*पाहणी करायला आलेले बांधकाम अभियंता झोपेत आहेत काय? विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा सवाल*

 

कामाचा दर्जा उत्तम ठेवावा अन्यथा काम बंद पाडणार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अभिजित कुडे यांचा इशारा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:-  तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवासेना अभिजित कुडे यांच्या नेतृत्वात अनेकदा आंदोलने करण्यात आली. यात प्रामुख्याने भजन आंदोलन, झाडे लावा आंदोलन,  झोपा काढा आंदोलन,  निषेध आंदोलन,  नामकरण आंदोलन अशी होती. याचे फलीत बांधकाम विभागाला उशीरा का नको पण जाग आली व  उखर्डा ते नागरी रत्याचे बांधकाम सुरु करण्यात आले.सतत पाठपुरावा केल्यावर खुप दिवसांच्या प्र्रतिक्षेनंतर या 3 किलोमीटर रस्त्याचे नुकतेच काम सुरू झाले. आता चांगला रस्ता मिळेल या आशेवर गावकऱ्यांनमध्ये आनंद बघायला मिळाला. परंतु पाहणी केली असता रस्त्याचे काम हे एकदम निकृष्ठ दर्जाचे दिसून येत आहे. कुठे गिट्टी व्यवस्थीत नाही, डांबराचा पत्ता नाही, वरुन थातुरमातुर लिपापोती करुन नवरीचे मेकअप केल्यासारखे रस्ता सुंदर दाखविण्याचे प्रयत्न बांधकाम विभाग व ठेकेदार करीत आहेत. रस्त्याचे काम पुर्ण होण्याआधीच ठोकळ गिट्टी बाहेर वर निघालेली आढळून येत आहे.आता नागरीकही रस्त्याचे काम बघुन हैराण झालेले आहे. डांबर कुणी खाल्ल काय?  गिट्टी कुणाच्या घश्यात गेली असेल? कोण आपले घर भरताय, ठेकेदार की बांधकाम विभाग असे अनेक प्रश्न गावकऱ्याना पडलाय. पाहणी करायला आलेले अधिकारी  झोपेत होते काय? असा सवाल विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी उपस्थिती केला आहे.उपविभागीय बांधकाम अभियंता काम बघून गेले पाहणी करून गेले त्यांना त्रुटी दिसल्या नाही काय? असा सवाल अभिजित कुडे यांनी केला आहे. कामात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ठ निदर्शनास येत आहे. खुप आंदोलने, पाठपुरावा व संघर्ष नंतर काम मंजूर झाले पण काम निकृष्ठ दर्जाहीन होत असेल तर शांत बसणार नाही. तात्काळ कामाचा दर्जा सुधारुन करावा, डांबर प्रमाणात टाकून रस्ता शासकिय नियमास धरुन दर्जेदार रस्ता तयार करावे, बांधकाम अभियंता यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदारास तशा सूचना कराव्या, अन्यथा काम बंद पाडू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे तसेच तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिक आक्रमक भूमिका घेतील असा निर्वानीचा इशारा युवासैनिक अभिजित कुडे यांनी दिलेला आहे.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...