Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *आ. सुभाष धोटे यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या जंगोदेवी देवस्थान येथे गेल्या वीस दिवसापासून यात्रेसाठी हजारो भाविक महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व अन्य राज्यातून या ठिकाणी अनवाणी पायाने दिंडीच्या रूपात वाजत गाजत चालत येत असतात तर काहीजण वाहनाने येतात. या ठिकाणी माता कंकाली देवी व माता जंगोदेवी गेल्या हजारो वर्षांपासून जागृत देवस्थान असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी व स्थानिक भाविक देतात. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या देवींचे दर्शन घेऊन आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभाग घेतला. स्थानिक नागरिक, भाविकांशी संवाद साधून येथे उपलब्ध सेवा, सुविधांचा आढावा घेतला. या ठिकाणी आ. सुभाष धोटेंच्या पुढाकाराने जंगो देवी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाल्यावरील ब्रिज, २७ सोलर इलेक्ट्रिक पॅनल, विद्युत सप्लाई व पिण्याच्या पाण्याची सोय हे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतले. त्यामुळे या परिसराचा कायापालट झाल्याचे व अजून उर्वरित इतर कामे करणार असल्याची प्रतिक्रिया आ. धोटे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जीवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाऊ निमजे, कैलास राठोड, सभापती  सुग्रीव गोतावडे, सिताराम कोडापे, श्यामराव कोटनाके, जंगू येडमे, भोजू पाटील आत्राम, चंदू वेटी सर, दिवाकर वेटी, गोविंदराव कुंमरे, भाऊराव पाटील चव्हाण, डॉ. अंकुश गोतावळे, शामराव गेडाम, विलास पवार, अशपाक शेख, सुनील शेळके, दत्तात्रे तोगरे, भानुदास जाधव, उत्तम कराळे, नारायण वाघमारे, लहुजी गोतावळे, विजय राठोड, कैलास कुंडगीर, अनंता बावळे, रामदास रणवीर, मोतीराम उदे, सित्रू मडावी, कोटणाके बाजीराव, लका रामभाऊ चव्हाण, मारुती मोरे, गोविंद ठोंबरे, हरिचंद्र जाधव, रोशन मरापे यासह असंख्य कार्यकर्ते, भाविक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेचे प्रास्ताविक सिताराम पाटील कोडापे यांनी केले तर आभार चंदू वेटी सर यांनी मानले.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक*

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...