Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना (उध्दव बाळासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाव्दारे हळदी-कुंकवाचा अनोखा उपक्रम* *बरोज मो. येथे महिलांच्या आंदोलन मंडपातच हळदी-कुंक कार्यक्रम घेत उपोषणाला पाठींबा*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाव्दारे हळदी-कुंकवाचा अनोखा उपक्रम*    *बरोज मो. येथे महिलांच्या आंदोलन मंडपातच हळदी-कुंक कार्यक्रम घेत उपोषणाला पाठींबा*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाव्दारे हळदी-कुंकवाचा अनोखा उपक्रम*

 

*बरोज मो. येथे महिलांच्या आंदोलन मंडपातच हळदी-कुंक कार्यक्रम घेत उपोषणाला पाठींबा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-तालुक्यातील बरांज मो. येथे कनार्टक एम्टा कोल माईन्स कोळसा खाणी विरोधात आपल्या मागण्या घेवून पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटनाव्दारे उपोषणाला बसलेल्या महिलांसोबतच उपोषण मंडपातच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा महिला आघाडी यांनी  उपोषणकर्त्या महिलांना हळद-कुंकु व वाण वाटप करुन एकप्रकारे उपोषणाला पाठींबा देत अनोखा उपक्रम राबवीला.बरांज मो. येथे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटनाच्या महिला मागील दोन महिण्यापासुन आपल्या मागण्याकरीता कर्नाटक एम्टा कोल माईन्स विरोधात आमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 75-वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तसेच भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात उपोषणाला पाठींबा जाहीर केलेला असून पाठपुराव सुरु आहे. तसे निवेदनसुध्दा जिल्हाधिकारी, तहसीलदार, खाण प्रबंधक यांना दिले असून मागण्याची दखल घेत समस्या न सोडविल्यास खाण बंद शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा सुध्दा देण्यात आलेला आहे.कोंढा-घोडपेठ जिल्हा परीषद क्षेत्रातील भद्रावती तालुक्यातील बरांज मो. येथे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटनाव्दारे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्या महिलांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्हा महिला संघटीक नर्मदा बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट देवून चर्चा केली व यांच्या उपोषणाला पाठींबा जाहीर करीत उपोषणकर्त्या महिलासोबत काल (दि 7) ला उपोषण स्थळी मंडपाच हळद-कुंकु व वाण वाटपाचा कार्यक्रम राबवीण्यात आला.

याप्रसंगी हळद-कुंकु, वाण वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांनी केले व युवतीसेना अधिकारी प्रतिभा मांडवकर यांनी  संचालन केले तसेच आभार प्रदर्शन जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर यांनी केले. याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक, महिला आघाडी तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...