Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / महसूल प्रशासनाने व...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

महसूल प्रशासनाने व के पी सी एल कंपनीने एकमेकांकडे जबाबदारी न ढकलता तात्काळ निर्णय घ्या अन्यथा कंपणीलाच सिल लावा. -- विनोद खोब्रागडे

महसूल प्रशासनाने व के पी सी एल कंपनीने एकमेकांकडे जबाबदारी न ढकलता तात्काळ निर्णय घ्या अन्यथा कंपणीलाच सिल लावा. -- विनोद खोब्रागडे

महसूल प्रशासनाने व के पी सी एल कंपनीने एकमेकांकडे जबाबदारी न ढकलता तात्काळ निर्णय घ्या अन्यथा कंपणीलाच सिल लावा. -- विनोद खोब्रागडे

 

 

रिपोर्टर✍️  भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : न्याय व हक्कासाठी, वाघाच्या दहशती खाली,वादळ वारा मध्येही, कोळशाच्या २५० फुट खोल खड्ड्यात रात्रभर, बरांज मोकासा येथील १० महीलांनी काढली रात्र.

मागील ५० तासापासुन कोळशाच्या २५० फुट खड्ड्यातच. महिलांचे आत्मदहन आंदोलन सुरू आहे.

तर दुसरीकडे ६० दिवसांपासून महिलांचे उपोषण सुरू आहे.

महसूल प्रशासनाने व KPCL कंपनीने एकमेकांकडे जबाबदारी न ढकलता तात्काळ निर्णय घेऊन आंदोलन खत्म करावे

अन्यथा जमीन महसूल कलम १८०नुसार KPCL कंपनीलाच सिल लावावे, कंपनी बंद करावे, तसेही ती बोगस कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे.

तलाठी विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक यांचे रोखठोक मत.

न्याय,व हक्कासाठी बरांज मोकासा ग्रामवासी यांच्या १५ वर्षांपासून, एम्टा कंपनी व आता KPCL कंपनी विरुद्ध संघर्ष सुरू आहे.

आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही,हे KPCL कंपनी, जिल्हा प्रशासन , पोलिस प्रशासन यांनी लक्षात घ्यावे

माननीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली, तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती/व ओबीसी आयोग नवी दिल्ली यांना KPCL कंपनी, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन विरुद्ध गंभीर तक्रारी तलाठी विनोद खोब्रागडे व बरांज मोकासा महीला मंडळ पुरुष मंडळी यांनी केली आहे.

तलाठी विनोद खोब्रागडे यांनीच या पुर्वी एम्टा कंपनी व KPCL कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश भद्रावती न्यायालयातुन पोलिस प्रशासनाला दिले असतानाही, पोलिस प्रशासन, एम्टा कंपनी वर फौजदारी कारवाई केली आहे. मात्र KPCL कंपनीवर अजुनपर्यंत FIR दाखल का करत नाही? न्याय व हक्कासाठी मागील,६० दिवसांपासून महिलांचे उपोषण सुरू आहे,तर ५० तासापासुन बरांज मोकासा पुनर्वसन महिला मंडळाच्या १० महीला, कोळशाच्या २००फुट खोल खड्ड्यात आत्मदहनासाठी खाली उतरल्या असतांनाही, वाघाच्या दहशतीच्या ठिकाणी वादळ वारा मध्ये रात्र काढली आहे तरी शासन,महसूल प्रशासन, झोपले आहे काय?

यांना जनाची नाही तर मनाची  थोडी वाटायला पाहिजे?

KPCL कंपनीवर गुन्हे दाखल करन्याचे अधिकार आम्हाला नाही, पोलीसांना आहे,असे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालय कसे काय लिहुन मला देतात KPCL कंपनीने बरांज मोकासा येथील एक इंच जमीन भुसंपादन केली नाही,व तसा पुरावा नाही, प्रत्यक्ष ताबा सुध्दा घेतलेला नाही,व महसूल अधिकारी यांनी ताबा दिला नाही,मग कोळशाचे उत्खनन कसे काय करत आहे.

KPCL कंपनीच्या नावाने दोन दिवसांत बोगस फेरफार महसूल अधिकारी यांनी नोटीस न देता कसे काय केले?

दिनांक ०६/०२/२०२० ला फेरफार घेतात,व नोटीस देतात आणि दिनांक ०८/०२/२०२० ला फेरफार प्रमानीत करतात, नोटीस दिल्यानंतर आक्षेप घेन्यासाठी १५दिवसाचा कालावधी असतो,हे महसूल अधिकारी यांना समजत नाही काय?

माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब भद्रावती यांच्या न्यायालयातुन सन २०१५ मध्येच तलाठी विनोद खोब्रागडे यांनी एम्टा कंपनी व KPCL कंपनी व अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करन्याचे आदेश केले आहेत, तेव्हा पोलिस प्रशासन भद्रावती यांनी चोर KPCL कंपनीवर गुन्हे दाखल करून,काम बंद का केले नाही,?

दिनांक १२/०१/२०२४ रोजी विनोद खोब्रागडे सह ३३५ बरांज ग्रामवासी यांनी गंभीर रिपोर्ट KPCL कंपनी व अधिकारी विरुद्ध माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर व शासन, प्रशासन, यांना देऊनही आजपर्यंत कंपनी वर कारवाई का केली नाही? असे एक ना अनेक रोखठोक सवाल प्रशासनाला तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केले आहे.

आधी चोर KPCL  कंपनी व भ्रष्ट अधिकारी यांच्या वर फौजदारी कारवाई करावी,

न्याय व हक्कासाठी, संविधानीक मार्गाने संघर्ष करीत असलेल्या  महिलांना मदत करावी

आधी चोर KPCL कंपनीवर,व महसूल अधिकारी वर अट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे व कंपनीचे काम न्याय व हक्क मिळेपर्यंत बंद करावे

KPCL हि कंपनी आहे,सरकार नाही, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी बरांज मोकासा गावकऱ्यांना व,जनतेला मुर्ख बनवु नका

महाराष्ट्र शासन परिपत्रकाप्रमाने आधी बरांज मोकासा गावाचे पुनर्वसन व पुनर्स्थापना करा, योग्य मोबदला द्या, मगच KPCL कंपनीने काम करावे. जनहितार्थ जारी ,देशहितासाठी,समाजहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी

नागरिकांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.क.नुसार १ते ११ कर्तव्य दिली आहे, यांचे पालन करावे. असे विनोद खोब्रागडे तलाठी तथा जबाबदार व जागृत नागरिक, कायद्याचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर.यांनी पत्रकार षरिषदमध्ये सांगितले आहे.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...