Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्या पाचही महान स्त्रीयांची संयुक्त जयंती साजरी

स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्या पाचही महान स्त्रीयांची संयुक्त जयंती साजरी

प्रत्येक विहारात अभ्यासिका तयार करा - अविनाश मेश्राम, ठाणेदार, मुल

 

भद्रावती : जयभीम महिला संघटन, भद्रावती यांनी दि.१२ फेब्रुवारी ला डॉ. आंबेडकर चौक, भद्रावती येथे त्यागमुर्ती माता रमाई, पहिल्या मुस्लिम शिक्षीका फातिमा शेख, स्वराज्य जननी माँ जिजाऊ, स्त्री मुक्तीच्या अग्रणी माता सावित्रीबाई फुले आणि राणी अहिल्याबाई होळकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कविता मडावी, सामाजिक कार्यकर्त्या, प्रमुख अतिथी नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, मार्गदर्शक म्हणून अविनाश मेश्राम, ठाणेदार, पोलीस ठाणे, मुल आणि प्रा. संजय बोधे यांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरवात अश्विनी डांस ग्रुप, डिफेन्स यांच्या कडून सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, जिजाऊ, फातिमा शेख आणि अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर नृत्य, गायनाच्या सुंदर सादरीकरणातून मानवंदना देऊन करण्यात आली. तर रेणुका साने ग्रुप कडून स्वागत गीताणे कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी, नयोमी साटम यांनी महीलांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध, अवैध धंदे यावर आवाज उठवा, यात मी तुमच्या नेहमी सोबत आहे असे आश्वासन दिले.

 

समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन मुलचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांचा जयभीम महिला संघटन कडून शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येक बौद्ध विहारात अभ्यासिका तयार करा. ज्यातून मुले अभ्यास करून मोठे अधिकारी बनतील, नाहीच बनले तर त्यांची बुद्धी समाज उपयोगी कामात येईल असे वक्तव्य अविनाश मेश्राम यांनी बौद्ध समाजबांधवांना कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. अविनाश मेश्राम यांनी सुंदर कवितेतून रमाई आंबेडकर यांचा अखेरच्या घटकेची कहानी, बाबासाहेब आंबेडकर सोबतचे क्षण अतिशय सुंदर आणि हळव्या मनाने मांडले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता मडावी यांनी महिलांवर होणारे अत्याचार, महिलांचे आरक्षण आणि सध्याचे लोकतंत्र यावर प्रखरपणे आपले मत मांडले. सध्याच्या राजकारणात महिलांचे स्थान यावर बोलतांना सरकारवर ताशेरे ओढले. महिला सक्षमीकरणासाठी अनेक विषयावर त्यांनी आपले विचार अतिशय निर्भिडपणे उपस्थित जनतेसमोर मांडले.

 

कार्यक्रमाला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती. भद्रावती झालेला हा पहिला संयुक्त जयंती कार्यक्रम होता. तो जयभीम महिला संघटन ने अतिशय सुंदर पणे पार पाडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांसाठी मसालेभाताची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण जयभीम महिला संघटन भद्रावती ने खुप मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...