Home / क्राईम / प्रबोधनकार ठाकरे यांच्या...

क्राईम

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

तरुणांनी शिक्षित होऊन समाज आणि देशहितासाठी कार्य करावे. प्रबोधनकार नयन मडावी

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने प्रबोधनकारांच्या विचाराला व ईतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर 'लोकप्रबोधन दिन' म्हणुन साजरा करण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आव्हान केले.

त्या निमित्याने मुकूटबन येथे बुधवारी ( दि. 21) रात्री प्रसिद्ध विनोदी प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक नयन मडावी यांच्या संगीतमय विनोदी प्रबोधनाचा कार्यक्रम संभाजी ब्रिगेड व शिवसेना झरी यांच्या वतीने मुकूटबनात पार पडला.

प्रबोधनकर नयन मडावी यांनी संगीताच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश दिला. संविधानातून मिळालेले अधिकार स्पष्ट करा. जातिभेद, विषमता दूर करून बंधुता आणि मानवतेने जगण्याचा संदेशही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेण्याबाबत त्यांनी सांगितले. तरुणांनी शिक्षित होऊन समाज आणि देशहितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुकुटबन येथील आदर्श हायस्कुल शाळेच्या पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती.

   यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक संतोष माहुरे विधानसभा अध्यक्ष शिवसेना, अध्यक्ष चंद्रकांत घुगुल, तालुकाध्यक्ष शिवसेना, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल टोंगे विधानसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, केतन ठाकरे तालुकाअध्यक्ष मराठा सेवा संघ, आशिष झाडे तालुकाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड, संदीप विच्चू  उपसभापती कृ.उ.बा.स. मुकुटबन, निलेश बेलेकर युवासेना, दत्ता दोहे संभाजी ब्रिगेड, मीनाताई आरमुरवार सरपंच मुकुटबन, अशोक पानघाटे, देव येवले, नितेश ठाकरे, संदीप आसूटकर, राजू आसुटकार, विनोद उप्परवार, बाळूभाऊ बरशेट्टीवार, सचिन टोंगे, राजू लोडे, सीताराम पिंगे, राहुल राजूरकर, गजभिये सर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वडके सर, प्रस्तावना शुभम राऊत, तर आभार प्रदर्शन पथाडे सर यांनी पार पाडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय पानघाटे, प्रतीक राजूरकर, सुरेश निब्रड, संदीप धोटे, रोहित चव्हाण, अनिकेत टोंगे,  विनोद गद्दमवार, प्रशिक बरडे, अनिकेत बांदूरकर, राहुल राजूरकर, शंकर झाडे, अशोक पानघाटे, सुरज सोनकर, संदीप येवले, सुमित क्षीरसागर, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, शुभम राऊत, राजू झाडे, छंदक तेलंग, राहुल चव्हाण, राहूल बत्तावर, सचिन दाणे, संतोष लेडांगे यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

क्राईमतील बातम्या

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...

दिवंगत कर्मचाऱ्याला पुजाराकडून मारहाण...

हर्षपाल खाडे (पांढरकवडा): केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे कर्मचारी अपंग प्रकाश बिजाराम करलुके वय 48 वर्षे याला...