Home / क्राईम / कोंढेसरी मंदिरात गुप्तधन...

क्राईम

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न करणार आठ जणांच्या टोळीतील सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन जण फरार झाले. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, या प्रकरणाचे धागे-दोरे शोधून काढण्यासाठी चौकशीला सुरुवात केली आहे. येथील काही शेतकऱ्यांनी रात्री मंदिरात पाळत ठेवून या टोळीला गजाआड करण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस सूत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात नागरी येथे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर प्राचीन कोंडेसरी मंदिर आहे. मंदिर परिसरात मागील तीन महिन्यांपासून काहींच्‍या संशयित हालचाली असलेल्या नागरिकांचे या परिसरात येणे जाणे सुरू आहे. गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने मंदिराच्या आतील आणि बाहेर परिसराची त्यांच्याकडून पाहणी होत असल्याचे काही शेतकऱ्यांना आढळून आले होते.

आठ दिवसापूर्वी ही या ठिकाणी गुप्तधनासाठी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला होता. गुरुवार, शनिवार, पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाली होती. शेतकऱ्यांनी या टोळीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. 6 जानेवारीला 2022 ला या ठिकाणी स्थानिक काही नागरिकांच्या सहकाऱ्याने यवतमाळ जिल्ह्यातील गुप्तधन शोधणारी टोळी येणार असल्याची खात्री झाली होती.

शेतकरी घोलर हे चार सहकाऱ्यांना घेऊन रात्रीच्या सुमारास पाळत ठेवली. आठ वाजताच्या सुमारास मारुती कारने मांत्रिकासह आठ जणांचा ताफा मंदिर परिसरात येऊन धडकला. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागाची पाहणी केल्यानंतर आतील परिसरात सर्वप्रथम पूजा पाठाचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. खड्डा खोदकाम सुरू असतानाच बंडू विठ्ठल घोलर यांनी, सहकार्‍यांसह त्यांना अटकाव केला. मात्र टोळीतील व्यक्ती जास्त असल्याने त्यांनी उलट यांना मारहाण केली. मात्र समयसूचकतेणे या चारही व्यक्तींनी गावातील अन्य नागरिकांना कोंढेसरी मंदिरात गुप्तधन काढणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यासाठी सतर्क केले होते. अर्धा तासाच्या कालावधीनंतर नागरी गावातील नागरिकांचा ताफा त्याठिकाणी धडकला आणि टोळीतील आठ पैकी सहा जणांना साहित्यासह पकडले. दोन जण पसार झाले.

पाेलीस उपनिरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रात्री घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत त्या टोळीला पकडून नागरी गावाच्या दिशेने पकडून आणत असताना पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये या घटनेचा मुख्य सूत्रधार संदीप रामटेके (वय ३५, रा. पाटेपुरा वार्ड (यवतमाळ), देवराव गजभिये (वय ५०, अंबिकानगर (यवतमाळ), भारत पिसे (वय 55, रा. वाघनख (चंद्रपूर), सुरेश सावंतकर (वय 36, ताळीनगर (यवतमाळ), इरफान रहीम शेख ( वय 25, रा. यवतमाळ ), पिंटू पिसे (वय 32, रा. नागरी चंद्रपूर) अशी अटक केल्‍यांची नावे आहेत. संशयित आरोपींकडून कारसह खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आलेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

दिवंगत कर्मचाऱ्याला पुजाराकडून मारहाण...

हर्षपाल खाडे (पांढरकवडा): केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे कर्मचारी अपंग प्रकाश बिजाराम करलुके वय 48 वर्षे याला...