*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
वणी: गेल्या 24 तासात जिल्ह्यात 35 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 201 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1238 व बाहेर जिल्ह्यात 29 अशी एकूण 1267 झाली आहे. त्यातील 43 रूग्ण रूग्णालयात तर 1224 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 458 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 35 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 423 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78581 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 75517 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1797 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 35 रूग्णांमध्ये 16 महिला व 19 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील तीन, दारव्हा चार, नेर दोन, पुसद चार, राळेगाव एक व यवतमाळ येथील 21 रूगणांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 25 हजार 638 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 47 हजार 57 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.52 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 7.64 आहे तर मृत्यूदर 2.29 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1723 बेड उपलब्ध :
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 43 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1723 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 43 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 744 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...