Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / ✍️. *मातृत्वाचे महाकाव्य...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

✍️. *मातृत्वाचे महाकाव्य - रमाई*

     ✍️.   *मातृत्वाचे महाकाव्य - रमाई*

संकलन : ना. पां. जाधव

            मो. ८७९३८३९४८८

 

                   

 

    करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य, महासूर्याची सावली आणि कोट्यवधीची माऊली,

    दीनदुबळ्यांची आई म्हणजे रमाई

    कोकणातील दाभोळ बंदराजवळील वणंद या गावी भिकाजी धुत्रे आणि रुक्मिणीच्या पोटी ७‌ फेब्रुवारी १८९८ रोजी एका कन्यारत्नाचा जन्म झाला.  तो जन्म म्हणजे एका कारुण्यमूर्तीचा, सहनशीलतेचा, परोपकाराचा, सामंजस्याचा आणि कठोर परिश्रमाचा जन्म होता, असे म्हणणे वावगे ठरू नये.

    बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली रमा.  बालपणापासूनच जिच्यावर कष्टाचा डोंगर उपसण्याची पाळी आली ती रमा.  जाणतेपण येण्याअगोदरच कष्टाची कदर करणारी रमा खरेच बालपण हरवलेली होती. वयाच्या नवव्या वर्षी एका अशा व्यक्तीशी लग्न झाले की, ज्यांनी स्वतःसाठी आयुष्य जगलेच नाही.  जगले ते फक्त समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी.  माणसांची पारख असलेले रामजी बाबा यांनी रमा नावाच्या निष्पाप, निरागस, कष्टाळू आणि चुणचुणीत मुलीला आपल्या भिवासाठी पत्नी म्हणून केलेली निवड अत्यंत सार्थ ठरली.  रमाला शिकलेला पती मिळाला, चांगले सोयरे आणि घर मिळाले म्हणून ती कृतकृत्य होऊन आपल्या घराच्या उत्कर्षासाठी अपार कष्ट उपसू लागली.  १९०७ साली भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले, तेव्हा रमाईला आकाश ठेंगणे झाले होते.  रमाईमुळे बाबासाहेब इतके प्रचंड शिक्षण घेऊ शकले आणि हिमालयाप्रमाणे समाजासाठी काम करू शकले.  कारण रमाई ही बाबासाहेबांची खरी प्रेरणा होती.  

    ती पुढे कोट्यवधी असाह्य, दीनदुबळ्यांची माता झाली.  ती अत्यंत स्वाभिमानाने भरलेली आणि भारलेली होती.  बाबासाहेबांप्रमाणेच समाजावरही जिवापाड प्रेम करणारी, खऱ्या अर्थाने मातेप्रमाणे प्रेम करणारी माता, म्हणजे रमाई होय.

    बालपणीच माता-पित्यांच्या निधनामुळे पोरकी झालेल्या रमावर अनेक आघात होत होते.  त्यामध्येच २ फेब्रुवारी १९१३ मध्ये रमाईवर आणखी एक मोठा आघात झाला.  तो म्हणजे सुभेदार रामजी बाबा निवर्तले.  त्यानंतर रामजी बाबांना मिळणारी पेन्शन ही आपोआपच बंद झाली.  त्यामुळे आर्थिक स्त्रोत बंद झाले.  परंतु परिस्थितीपुढे हात न टेकता, ती सर्व आव्हाने स्वीकारत रमाई अविरत कष्ट करीत होती.  प्राप्त परिस्थितीशी झगडणे हा रमाईचा स्थायीभाव होता.  संसार चालविताना कोणती गोष्ट करावी लागत नाही?  काबाडकष्टसुद्धा रमाईला पतीच्या इभ्रतीला जपून करावे लागत असे.  आपल्या कामामुळे साहेबांना कमीपणा वाटेल असे, शेण गोळा करणे, गोवऱ्या थापणे, विकणे वगैरे काम ती संध्याकाळी करीत असे. रमाईचे जीवन अतिशय कष्टाने, दुःखाने, दारिद्र्याने, यातनेने आणि उपासमारीने भरलेले होते.  तिच्या जीवनामध्ये सुखाला जागाच नव्हती.  जागा होती ती फक्त कष्ट, त्याग, प्रामाणिकपणा, परोपकार इत्यादींना होती.

    रमाईच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली.  रमाई गरोदर असतानाच बाबासाहेब विलायतेला पुढील शिक्षणासाठी गेले होते.  थोड्याच दिवसात त्यांना पुत्र झाला.  त्याचे नाव गंगाधर ठेवले.  गंगाधर एकदा खूपच आजारी पडला.  बाबासाहेब दरमहा आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून कसे तरी

पन्नास रुपये रमाईला पाठवित असत.  त्यामुळे तिकडे बाबासाहेबांचेही जेवणाचे हाल होत असत व इकडे रमाईच्या संसारालाही ते पुरत नसत.  तरीही काटकसरीने अत्यंत कसोटीने तिकडे बाबासाहेबांचा अभ्यास चालला होता आणि रमाईचा व‌ कुटुंबाचा जीवनव्यापनाचा संसार चालला होता.  गंगाधरसाठी आता पैसे कुणाकडून घ्यायचे हा प्रश्न पडला होता.  म्हणून धैर्य करून बाबासाहेबांनाच रमाने पत्र लिहिले व थोडीफार पैशाची मागणी केली.  बाबासाहेबांनी थोडीफार पैशाची व्यवस्था केली.  याच काळात काही कार्यकर्ते मदत गोळा करून रमाईला देण्यासाठी आले.  परंतु स्वाभिमानी रमाईने त्यांना स्पष्ट आणि विनम्रपणे नकार दिला.  गंगाधर जास्तच आजारी पडल्यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला.  बाबासाहेब त्याच्याजवळ नव्हते.  आपल्या बाळाचे त्यांना तोंडही पासता आले नाही.  त्याचे कौतुक करता आले नाही.  याचे बाबासाहेबांना प्रचंड दुःख झाले.  आपल्यावर कोणतेही संकट आले तरीही आपण स्वाभिमानानेच राहिले पाहिजे.  आपल्या घराण्याची इज्जत ठेवली पाहिजे.  अशा बाण्याने राहणारी रमाई होती.  कार्यकर्त्यांची मदत स्वीकारून रमाई आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवू शकली असती, पण त्यांनी तसे केले नाही.  या त्यागाला आपण काय म्हणावे?

    त्यांचा तिसरा मुलगा राजरत्न याच्या बाबतीतही तसेच झाले.  राजरत्नला एका दिवशी ताप आला.  औषध उपचार चालू होता.  त्याचे रूपांतर निमोनियामध्ये झाले.  बाबासाहेब हायकोर्टात प्रॅक्टिस करीत होते.  नुकतीच वकीली चालू केल्यामुळे त्यांना पुरेसे पैसे मिळत नव्हते.  राजरत्नला डबल निमोनिया झाला.  त्याची प्रकृती ढासळली आणि क्रूर काळाने राजरत्नला हिरावून नेले.  त्याच्या अंत्यविधीची सामग्री आणण्यासाठीसुद्धा बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते.  या असंख्य वेदना काळीज पिळवटून टाकणाऱ्या होत्या.  दोघाही पती-पत्नींना पुत्र वियोग झाला होता.  बाबासाहेब म्हणाले, 'राजरत्न गेल्याने आमच्या आयुष्याचे सहारा वाळवंट झाले आहे.

    पुढे १९३२ साली बाबासाहेब इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी जाणार होते.  रमाईची तब्येत खूपच बिघडली होती.  काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.  त्यावेळेला बळवंत वराळे भेटण्यासाठी आले होते.  बाबासाहेब चिंतेत असताना विचारले की, 'बाबासाहेब काय झाले?'  त्यावेळेला त्यांनी सांगितले की, रमाई आजारी आहे.  तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हवा पाणी बदलायला डॉक्टरने सांगितले आहे.  बळवंत वराळे म्हणाले, 'साहेब, मी त्यांना धारवाडला घेऊन जाऊ का?' त्यावेळेला बाबासाहेबांनी होकार दिला आणि रमाईबरोबर सर्वच लोक निपाणीला गेले.  तिथला एक प्रसंग. वसतिगृहाला त्या महिन्यामध्ये ग्रॅंट मिळाली नव्हती.  त्यामुळे तेथील मुलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला होता.  तेथील वाणी अन्नधान्य उधारीवर देत नव्हता.  बळवंतराव काळजीत होते.  त्यावेळेला ही गोष्ट रमाईच्या कानावर आल्यावर रमाईने विचारले, 'काय झाले आहे?'. त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट सांगितल्यावर क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या बळवंतराव वराळेकडे दिल्या आणि म्हणाल्या, 'मास्तर या बांगड्या घ्या आणि त्या गहाण ठेवून मुलांसाठी धान्य आणा.'  अशा या थोर त्यागी, वात्सल्यमूर्ती रमाईच्या उदारपणाला काय म्हणावे?

    अपार कष्ट करून रमाई चंदनाप्रमाणे झिजून गेल्या होत्या.  सततची उपासमार, दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि वरून काबाडकष्ट त्यामुळे त्यांच्या हाडाची काडे झाली होती.  वरून साहेबांची काळजी.  त्यांना कोणी मारतील काय, त्यांचे काही बरेवाईट होणार तर नाही ना, या काळजीमुळे त्यांना टीबी झाला होता.  त्यातच २७ मे १९३५ ला बाबासाहेबांची प्रिय रामू बाबासाहेबांना आणि समाजाची माता रमाई सर्वांना सोडून गेली आणि सर्व समाज पोरका झाला.  बाबासाहेब अत्यंत दुःखी अंत:करणाने म्हणाले, "रामू तू माझ्यासाठी किती त्रास, किती यातना सहन केल्या, पण मी मात्र तुला कसलेही सुख देऊ शकलो नाही." असे म्हणून बाबासाहेब रडू लागले.  त्यांचा अंत्यविधी केल्यानंतर बाबासाहेबांनी आठवडाभर स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले.  सात कोटी अस्पृश्यांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचा आधार निघून गेला.  बाबासाहेबांची प्रचंड काळजी वाहणारी, तसेच आपल्या डोळ्यात प्राण आणून आयुष्यभर आपल्या पतीची वाट पाहणारी, सहचारिणी निघून गेली.  ती आपल्या पतीच्या यशस्वी जीवनाचा आनंद न घेताच काळाच्या पडद्याआड निघून गेली.

    बाबासाहेबांचे रामूवर अफाट प्रेम होते.  तिने संसारासाठी केलेला त्याग बाबासाहेबांना सतत आठवत होता.  म्हणून त्यांनी "थॉटस् ऑन पाकिस्तान" हा जगप्रसिद्ध इंग्रजी ग्रंथ त्यांनी आपल्या लाडक्या रामूला अर्पण केला.  त्यामध्ये ते म्हणतात, "ह्रदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याची पवित्रता याशिवाय आमच्या वाटेला आलेल्या हालअपेष्टा भोगण्याची तिची सिद्धता व निर्विकार सहनशीलता याबद्दल व मला तिचे वाटणारे कौतुकाचे प्रतीक म्हणून प्रिय रामू हिच्या स्मृतीस अर्पण!  कठीण प्रसंगातूनही मार्ग कसे काढले पाहिजेत.  स्वाभिमानी, निर्मळ, सोज्वळ आणि वात्सल्यरुपी जीवन कसे जगले पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाई.  त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.  त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या सर्व भारतीय बांधवांना आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

*माता रमाईच्या सम्यक स्मृतींना विनम्र अभिवादन!????????????

    लेखक : डी. एस. सावंत

      मो. ९९६९०८३२७३

{दैनिक "सम्राट" मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी २०२३}

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...