Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.62

Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / दैनिक "वृत्तपत्र सम्राट"...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

दैनिक "वृत्तपत्र सम्राट" गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी २०२३ *विशेष संपादकीय* ✍️ *लढवय्या योद्धा

दैनिक

*

 

    'आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'वृत्तरत्न सम्राट'चे संपादक *बबन कांबळे* यांचे अकाली निधन', हे वास्तव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणे अशक्य वाटत असले तरी ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.  निसर्गापुढे कुणाचे काहीही चालत नाही.  जसा जन्म असतो तसा मृत्यूही अटळ असतो, हे अंतिम सत्य आहे.  त्यामुळेच दैनिक 'वृत्तरत्न सम्राट'चे संपादक *बबन कांबळे*यांचे अकाली निधन या सत्यावर विश्वास ठेवावा लागतो.  संपादक बबन कांबळे यांच्या निधनाची वार्ता बुधवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली आणि सर्वजण निराश झाले.  काय बोलावे हेच कळेनासे झाले असल्याने हीच स्थिती 'हा मजकूर' लिहिताना झाली आहे.  त्यामुळे ही जागा 'कोरी' ठेवावी आणि आदरांजली अर्पण करावी अशी भावना दाटून आली होती.  पण दैनिक 'वृत्तरत्न सम्राट'ची जागा कोरी वा मोकळी सोडणे खुद्द बबन कांबळे यांनाच आवडले नसते.  कारण 'सम्राट'च्या इंच न इंच जागेचा वापर व्हायला हवा असा त्याचा कटाक्ष असायचा.  आंबेडकरी समाजाने जी जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे या जबाबदारीचे त्यांना कायम भान असल्याने 'सम्राट'च्या सर्वच पानांतील जागेचा वापर हा समाजाच्या भल्यासाठी व्हायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा.  कारण संपादक बबन कांबळे यांनी 'सम्राट' अक्षरशः रक्ताचे पाणी करून, दिवसभर एक करून मेहनत घेतली.  नको नको ते कष्ट उपसले.  कशाचीही तमा बाळगली नाही.  काहीही झाले तरी 'सम्राट' वाढला पाहिजे.  टिकला पाहिजे.  पुढे गेला पाहिजे असे प्रयत्न सुरू होते.  त्या सर्व परिश्रमाचे फळ म्हणून दोन दशकांपूर्वी वृत्तररत्न 'सम्राट'चे रोपटे ठाण्यात जे लावले होते त्याचे रूपांतर डेरेदार वृक्षात झाले आणि त्याची पालेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात खोलवर रुजली.  हे करीत असताना आंबेडकरी समाजाने सर्व ते पाठबळ दिल्यानेच हे शक्य झाले असले तरीही 'सम्राट'चा डोलारा सांभाळणे हे वाटते तितके सोपे नव्हते.  त्यातून ज्याला एक खांबी तंबू म्हटले जाते तसा प्रकार 'सम्राट'चा.होता.  त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.  आणि बबन कांबळे यांच्या प्रकृतीवर जाणवू लागला.  यातून काही व्याधींनी शरीरात केव्हा घर केले.  यातून काही व्याधींनी शरीरात केव्हा घर केले हेही कळले नाही.  त्यात प्रकृतीची हेळसांड होत गेली.  तरीही त्याची तमा न ठेवता 'सम्राट'चा व्याप सांभाळत पुढील वाटचाल कायम ठेवली होती.  कारण महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली समतेची लढाई जिद्दीने पुढे नेण्याचे प्रयत्न 'सम्राट'चा त्यामागे पर्यायाने बबन कांबळे यांचा होता.  त्यातून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी सतत सज्ज राहावे लागायचे.  हे सर्व एकाच वेळी एकाच व्यक्तीकडून होत होते.  कारण 'सम्राट'चे हे केवळ वृत्तपत्रच राहिले नव्हते तर त्याचे रूपांतर चळवळीचे झाले होते.  ही चळवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समतावादी व शोषण विरहित अशा समाज निर्मितीची होती.  अशा समतावादी चळवळीत असंख्य जणांचा सहभाग हवा असतो.  त्यात जसे रस्त्यावरची लढाई लढणारे असतात तसेच प्रबोधनाची, जागृतीची मोहीम राबविणारेही असतात.  अशी मोहीम बबन कांबळे व 'सम्राट'ने राज्यात राबविली.  त्यातून ज्याला सांस्कृतिक क्रांती म्हटली जाते अशा सांस्कृतिक क्रांतीचे नेतृत्व बबन कांबळे यांनी केले.  त्यातूनच ज्याला आंबेडकरी पत्रकारिता वा मीडिया म्हटले जाते त्याला उभे करण्याचे, आकार देण्याचे काम बबन कांबळे यांनी केले.  हा इतिहास कोणालाही विसरता येणार नाही.  त्यामुळेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रखर निष्ठा असलेल्या बबन कांबळे यांनी त्यासाठी कशाचीही तडजोड केली नाही.  त्यातून ज्यांनी ज्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा केली, गद्दारी केली अशांना बबन कांबळे यांनी आपल्या धारदार लेखणीने वठणीवर आणण्याचे ऐतिहासिक असे काम केले.  बबन कांबळे यांची लेखणी जशी धारदार होती तशीच वाणीही होती.  हजारोंच्या सभा त्यांनी गाजविल्या आणि असंख्य लोकांना प्रोत्साहित केले.  कारण काहीही झाले तरी चळवळ पुढे गेली पाहिजे, हाच त्यांचा एकमेव ध्यास होता.  त्यामुळे ज्याला खऱ्या अर्थाने समर्पित जीवन जगणे म्हटले जाते तसे समर्पण बबन कांबळे यांचे असल्याने प्रकृतीची साथ आहे किंवा नाही याचाही विचार त्यांनी कधीही केला नाही.  कारण आंबेडकरी समाज पुढे जावा, चळवळ गतिमान व्हावी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समतावादी भारताचे स्वप्न पाहिले होते ते साकारले जावे असे प्रयत्न बबन कांबळे यांचे असल्याने त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न कायम ठेवणे हीच बबन कांबळे यांना आदरांजली ठरेल.

▪️▪️▪️

ताज्या बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...