Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *आमिषापोटी पत्रकारांना...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*आमिषापोटी पत्रकारांना दिल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी* *रत्नागिरी येथील रिफायनरीच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी पत्रकारांनाही केले 'मॅनेज'*

*आमिषापोटी पत्रकारांना दिल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी*    *रत्नागिरी येथील रिफायनरीच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी पत्रकारांनाही केले 'मॅनेज'*

भारतीय वार्ता :

 

स्प्राऊट्स Exclusive

 

रत्नागिरी येथील विनाशकारी रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेमध्ये प्रक्षोभ आहे. या प्रक्षोभाला वाचा फुटू नये. म्हणून प्रसारमाध्यमांनाच 'मॅनेज' करण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक पत्रकारांना तर थेट जमिनीच आमिषापोटी दिलेल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.

 

'टीव्ही ९ मराठी'चे स्थानिक पत्रकार मनोज लेले, 'मुंबई आजतक'चे राकेश गुडेकर आणि 'साम'चे अमोल कलये यांना पंढरीनाथ आंबेकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अमिषापोटी दिल्या आहेत. यासंबंधीचा सातबारा उताराच 'स्प्राऊट्स'च्या एसआयटीच्या हाती आलेला आहे.

 

या सातबारात स्वतः प्रमुख आरोपी आंबेकरसुद्धा जमीन मालक असल्याचे दिसून येत आहे. आंबेकर हाच अशी जमिनी गिफ्ट देण्याचे प्रकार करायचा. या पत्रकारांना विविध कामांसाठी लागणारी प्रकल्पातील कंत्राटेसुद्धा मिळणार आहेत.

 

याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला, नोकरी किंवा नुकसानभरपाई तर मिळेलच. स्मार्ट सिटीत घरसुद्धा हातात येणार आहे. हे सर्व फायदे समोर ठेवत रत्नागिरी परिसरातील बहुतांशी दैनिके, टीव्ही आणि सोशल मीडियाचे पत्रकार यांना आंबेकरने आपल्या बाजूने वळवले आहे. परिणामी सध्या वारिसे यांच्यासारखा एखाद दुसरा पत्रकार याला अपवाद ठरत होता.  

 

पंढरीनाथ आंबेकर हा भूमाफिया आहे. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार यांना दहशत दाखवण्याचे काम हा आंबेकर करीत असे. याच आंबेकर याने पत्रकार शशिकांत वारिसे याची अंगावर अवजड जीप घालून हत्या केली. सध्या हा प्रमुख आरोपी अटकेत आहे.

 

केवळ स्थानिकच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत रिफायनरीसंदर्भात बातम्या येवू नये, याची काळजी रिफायनरीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर करत असतात. त्यासाठी या काही प्रमुख प्रसारमाध्यमांच्या मालक व संपादकांना 'पाकिटे' देण्याचे काम नागवेकर करीत असतात. जे पत्रकार ही आमिषे, धमक्या यांना भीक घालत नाहीत. त्यांना अगदी जीवे मारण्यातही येते, ही सर्व कामगिरी आरोपी पंढरीनाथ आंबेकर करीत असे. आरोपी आंबेकर हा नागवेकर यांचा उजवा हात मानला जात आहे. त्यामुळे वारिसे यांच्या हत्या प्रकरणात निगवेकर यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

 

भीतीपोटी पत्रकारांनी नातेवाईकांच्या नावावर घेतल्या जमिनी 'स्प्राऊट्स' च्या हाती आलेल्या कागदपत्रांमध्ये वरील पत्रकारांना आंबेकरने जमिनी दिल्याचे आढळून येते. काही पत्रकारांनी मात्र स्वतःच्या नावावर जमिनी न घेता नातेवाईकांच्या नावांवर जमिनी घेतल्याचे दिसून आले आहे. नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून आंबेकर हा जमीन माफिया म्हणून समोर आला. त्याने गुजरात, राजस्थान, दिल्लीमधील लोकांनासुद्धा 'स्थानिक शेतकरी' दाखवून बेकायदेशीरपणे जमिनी विकलेल्या आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, मात्र ही चौकशी 'मॅनेज' होण्याची शक्यता अधिक आहे. 

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...