स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: सध्या विविध सोशल प्लॅटफॉर्म वरून "गेम" खेळण्यासाठी आकर्षक अशा जाहिराती केल्या जातात. रिल्स समोर येतात. वाईट हेच की,अशा ऑनलाईन गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातीत अनेक फेमस नटनट्या काम करत आहेत. हे घातक आहे.
घरबसल्या ऑनलाईन गेम खेळून पैसे कमवा ! असं आकर्षण दाखवून या सापळ्यात ओढलं जाते.सुरुवातीला हजार पाचशे रुपये टाकल्यावर लगेच दीडपट किंवा दुप्पट पैसे कंपनीकडून दिलेही जातात. आणि तुमचा विश्वास मिळवला जातो. नंतर तुमचीही इच्छा (हाव) वाढते अन ते पाहून कम्पनी तुमहाला म्हणते की पाच दहा हजार लावून पहा. जास्त रिटर्न्स मिळतील. तुम्ही तसे टाकून पहाता. आणि खरेच तेही जास्त टक्के दराने रिटर्न मिळतात. हे पाहून तुम्ही जास्त मोहात पडता आणि पन्नास हजार / लाखाच्या घरात पैसे गुंतवता. आणि तिथेच घोळ होतो. ती कम्पनी पैसे परत देत नाही. आणि तुमच्या लक्षात येते की आपल्याला त्या कंपनीचे धड ऑफिस पण माहित नाही. ना त्यांचा कॉन्टॅक्ट नम्बर आहे.
आणि कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते. घरबसल्या अशा पद्धतीने कमवायची (वाईट) इच्छा तुम्हाला कोणत्या थराला नेते. थोडेथोडके नव्हे तर चाळीस लाख रुपये एकजण घालवून बसलाय. घरदार शेती सगळं विकलं या गेम च्या नादात !
आता तुम्ही म्हणाल की, आम्ही नाही असल्या मोहात पडत. तर मंडळी नसाल पडत तर चांगलेच आहे. पण कधीकधी आयुष्यात मोठी आर्थिक अडचण आली की त्यावेळी ती गरज भागवण्यासाठी अशा ऑनलाईन गेम चा सहारा वाटू शकतो. अन त्या मोहात पडू शकता म्हणून मी सावध करतोय. अशा गेम मध्ये फसण्याची दोनच कारणे आहेत.
१) कमी कष्टात घरबसल्या जास्त पैसे मिळवण्याची हाव
२) ओढवलेली आर्थिक अडचण सोडवण्यासाठी अशा गेम चा सहारा वाटण्याची मानसिकता !
इमानदारीत केलेले कष्ट आणि त्यातून मिळालेले पैसेच तुम्हाला सुख शांती समाधान देतात. हे विसरू नका.यावर विचार करा आणि यावर मात करा,तुम्ही सुरक्षित रहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे, पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
*भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...