भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: आजवर जितक्या केसेस मी पाहिल्यात त्यात ९०% केसेसमध्ये लोक पॅनिक झाल्याने जास्त अडकले गेलेत. मग ते इमोशनल ब्लॅकमेल असो की फायनान्शियल फ्रॉड असो. जसे भारतात ७०% साप बिनविषारी आहेत. मात्र केवळ "साप चावला" हे पाहून त्याचा परिणाम मेंदू व हृदयावर निष्कारण ताण आल्याने जितके मृत्यू झालेत तितके विषारी साप चावल्याने झाले नाहीत.तसेच हे सायबर सापळ्याबद्दल आहे.समोरचा हॅकर तुम्हाला इमोशनली अडकवत जातो अन तुम्ही सहज अडकत जाता. तुमचे वीक पॉईंट काय आहेत त्याचा अभ्यास हॅकर गुन्हेगारांनी करूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला असतो. उदा. तुमच्या मुलाला ट्राफिक पोलिसांनी पकडलं आहे. असं कॉल वर सांगितलं की वडील लगेच पॅनिक होतात अन समोरचा माणूस तुमच्या मदतीला आलाय असं भासवून तुम्हालाच उलट जाळ्यात ओढलं जाते आणि तुम्ही एक तर तुमची आजवर कमावलेली इज्जत एका क्षणात घालवून बसता किंवा कमावलेला पैसा.समोरच्याने काहीही सांगू द्या की, त्या क्रॉसचेक करण्याचे इतर उपाय का विसरता ? समजा "तुमचे नको त्या अवस्थेतले फोटो माझ्याकडे आहेत. ते सोशल वर व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर अमुक अमुक पैसे ताबडतोब द्या" गंमत म्हणजे हे पैसे / रक्कम दोन चार लाख वगैरे फार मोठी कधीच नसते. तर पाच दहा हजार रुपये सुरुवातीला घेतले जातात अन आठ पंधरा दिवसांनी दुसऱ्याच कॉल वरून सेम धमकी आणि पुन्हा दहा हजार पाण्यात ! असं करत करत लाख दोन लाखच काय पण दहा दहा लाख लुटले जातात. त्या गुन्हेगारांना कोंबडी मारून खाण्यापेक्षा रोज एक अंडे खाण्यात इंटरेस्ट असतो).
तुम्हाला पहिल्यांदा कॉल येतो अन तुम्ही हादरता. आपली इज्जत जाणार असं वाटत. पण डोकं शांत ठेवलं तर कळेल की असं काही घडत नाही. नाहीतर सोशल मीडियावर तुमच्या परिचितांचे किंवा असेच कुणाचे वाईट फोटो व्हायरल झालेले पाहिलेत का कधी ? नाही न ? मग तुमचे व्हायरल होण्याची भीती का ? या भीतीला एनकॅश करत असतात ते गुन्हेगार. अशावेळी "जा तुला काय करायच ते कर, मी सायबर सेल कडे कम्प्लेंट द्यायला जातोय या नंबरची" सांगा. मग पहा !! समोरचा गायब होतो.
समजा तो म्हणाला, "तुमच्या घरच्यांना पाठवेन फोटो" तर म्हणायच,”जा बिनधास्त पाठव"
त्याच्या धमकीची हवा निघून जाते. मात्र अशावेळी आधी घरच्यांना विश्वासात घेऊन हे सगळं कानावर घालायचे म्हणजे ती मंडळी पण शॉक घेणार नाहीत अन पॅनिक होणार नाहीत. अशा कोणत्याही प्रसंगी कॉल आल्यावर सर्वात आधी एक लक्षात ठेवायच की,काही झालं तरी पॅनिक व्हायच नाही. डोकं शांत ठेवायच. आणि त्या गोष्टीचा विचार करायचा मग आपोआप त्यातला फोलपणा सापडतो. उदा. मेसेज फ्रॉड मध्ये,थकबाकी भरा नाहीतर रात्री वीज कट करणार असं मेसेज वाचल्यावर अनेकजण घाबरले. अन समोरच्यानं दिलेल्या लिंक ला क्लिक करून स्वतःचे खात्यातले पैसे घालवून बसले. तेच जर तो मेसेज नीट वाचला असता तर त्यात ग्रामर मिस्टेक लक्षात अली असती अन तुम्हाला कळलं असत की तो मेसेज फ्रॉड आहे. आणि दुसरं म्हणजे वीज कर्मचाऱ्यांना दिवसा काम उरकायला वेळ मिळत नाही अन ओव्हर टाइम करून रात्री नऊ ला ते कशाला येतील तुमच्या घरी ? इतका साधा विचार जरी केला तरी अनेकांचे पैसे वाचले असते. मात्र नाही घडलं ते. त्यामुळेच कोट्यवधी रुपये त्या मेसेजच्या सापळ्यात अडकल्याने गेलेत.असे काही कॉल किंवा मेसेज आले तर पॅनिक न होता विचार करा शांतपणे.त्यासाठी वाटल्यास सायबर तज्ज्ञाची मदत घ्यावी. वरचेवर आता विविध प्रकारचे नवनवीन असे सायबर सापळे वाढत जाणार. वीज कनेक्शन चा मेसेज द्वारे लुटून झाल्यावर नंतर बीएसएनएल च्या नावाने तोच फ्रॉड नव्याने आला. तो झाल्यावर नंतर बँक के वाय सी अपडेट चा फ्रॉड आला. असेच अजून वेगळे सापळे लावले जातील. त्यामुळे पॅनिक होऊ नका. सावध राहा. जसे ऍक्सीडेन्ट वाढलेत म्हणून आपण गाडी चालवायच सोडलं का ? नाही न ? मात्र आपण आता काळजीपूर्वक गाडी चालवतो. सेम तसेच या फ्रॉडबद्दल वागा. काळजी घ्या आणि इज्जत व पैसे वाचवा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे, पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.