Home / विदर्भ / अमरावती / धडकली पँथर, नीट राहा...

विदर्भ    |    अमरावती

धडकली पँथर, नीट राहा अन्यथा पुन्हा पँथर धर्तीवर उत्तर देऊ जातीयवाद्यांना पँथर इशारा..!

धडकली पँथर, नीट राहा अन्यथा पुन्हा पँथर धर्तीवर उत्तर देऊ जातीयवाद्यांना पँथर इशारा..!

अमरावती दानापूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. आज पीडितांची भेट घेतली, जून महिन्यात झालेल्या अट्रोसिटी ऍक्ट मधील आरोपी अद्याप अटक नाहीत, बौद्ध मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी अटक नाहीत, 4 महिन्यांपासून शेतीला जाणारा रस्ता अडवलेला आहे, तो ही तहसीलदार उघडून देत नाही. ठाणेदार, डीवायएसपी दखल घेत नाही, तहसीलदार दखल घेत नाहीत म्हणून अखेर हे गावच नको. जिथे जातीयेतून सामाजिक अत्याचार होत आहे तिथे राहायचे नको म्हणत आधी गावात उपोषण केलं. गावात 15 दिवस उपोषण सुरू होत, काँग्रेसचा माजी आमदार त्यांना भेट देतो आणि उपोषण हटवा अन्यथा ते लोक तुमच्या गंजी पेटवतील म्हणतो. काही तासात बौद्ध मातंगांच्या सोयाबीन गंजी पेटण्यात आली त्यामुळे अखेर हा समूह हतबल होऊन गाव सोडून तलावावर राहायला गेला. पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्तीने या समूहाने आंदोलन मागे घेतले आहे. आता तो घरी आहे. 

आज ऑल इंडिया पँथर सेनेनी भेट दिली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनुसूचित जाती जमातीला सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा नवा लढा आम्हाला लढावं लागेल. सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत, गृहमंत्री अमरावतीत असतात तेंव्हा ही घटना घडते. तरी सुद्धा न्याय मिळत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांना दलितांना भेटायला लाज वाटते का? 
सुनियोजित कट करून येते खैरलांजी घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. खैरलांजी घडल्यावरच सरकारला जाग येणार आहे का? स्थानिक आमदार भाजपचा आहे तो ही भेटायला आला नाही.  आरएसएस चा एक केडर कार्यकर्ता येते सामाजिक तेढ निर्माण करून जातीय दंगली घडडवण्याचे षडयंत्र करत आहे. आता आम्ही खैरलांजी होऊ देणार नाहीत. आता समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर परिणाम वाईट होतील पँथर धर्तीवर उत्तर दिले जाईल. 
किती दुर्दैव आहे, एका आर्यन खानला वाचवण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार मैदानात उतरली आहे. 100 बौद्ध मातंग गाव सोडून जातीयतेला कंटाळून जातात तेंव्हा तो साधी बातमी होत नाही? राज्य सरकारला मुद्दा वाटत नाही? 
ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे की तात्काळ सर्व आरोपींना अटक करा, बौद्धांना मातंगांना शेतात जाण्यास वाट रस्ता द्या, गंजी जाळल्या आहेत त्यांना मोबदला द्या, गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी शांतता बैठक घ्या, पीडितांना संरक्षण द्या, काँग्रेसच्या माजी आमदाराला सहआरोपी करा, आरएसएसच्या संशयित कार्यकर्त्याची चौकशी करून त्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करा! या समूहाला सामाजिक स्वतंत्र बहाल करा. 8 तासात जर आरोपी अटक झाले नाहीत तर अमरावतीमध्ये मोर्चा काढू, तात्काळ मुख्यमंत्र्यानी मंत्रिमंडळ बैठक बोलवून महाराष्ट्रातील दलित अत्याचारावर आळा घालण्यासाठी भूमिका घ्यावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा आम्ही देत आहोत.

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...