Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / एका दिवसाचा सरपंच..!...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

एका दिवसाचा सरपंच..! आंबोली ग्राम पंचायतीचा ' नायक ' उपक्रम.

एका दिवसाचा सरपंच..! आंबोली ग्राम पंचायतीचा  ' नायक ' उपक्रम.
ads images

महाराष्ट्रातील नवे तर देशातला पहिला उपक्रम असावा ।। या उपक्रमासाठी विद्यार्थिनीची पसंती .

 चंद्रपूर(जिल्हा प्रतिनिधी) चिमूर : 'एक दिवसाचा सरपंच 'हा ग्राम पंचायत आंबोली च्या वतीने राबविण्यात येणारा उपक्रम दि. ४ / ०१ / २०२२मंगळवार ला आयोजित करण्यात आला . आंबोली ग्रामपंचायतीच्या नवानेयुक्त सुशिक्षीत पदाधिकारी व सदस्याने ५ महीण्या पूर्वी असा ठराव पारित करीत व ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चा कुठलाही भंग न करता सर्व अटी व नियमाच्या अधिन राहूण आज या उपक्रमाची अमलबाजवणी केली . 
 
1)एका दिवसाच्या सरपंच, उपसरपंच यांना कोणतेही अधिकृत अधिकार बहाल केले जाणार नाहीत कृपया याची अर्जरानांनी नोंद घ्यावी .
२ )युवकांना व युवतीना ग्रामपंचायत म्हणजे काय ? ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याचे प्रत्यक्ष अनुभव मिळावे हा उद्देश .
3)उपक्रम एकाच दिवसा साठी असेल.
4)सदर उपक्रम ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधीन राहूनच करण्यात येईल.
५ )वय वर्ष १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणी या उपक्रमात भाग घेऊ शकतात . 

अशा प्रकारे जाहीर नोटीस लावून गावातून या निवडीसाठीसाठी अर्ज मागविण्यात आले . त्यामधे सर्व अर्ज सावित्रीच्या लेकीचे प्राप्त झाले. यांची निवड ईश्वर चिठ्ठीने करण्यात आली. यामधे सरपंच - पौर्णिमा बाबाजी वांढरे(BA ),   उपसरपंच- आनंदा बाबाजी निखाडे(BA), सदस्य - अश्विनी जांभूळे(BA), सूचिता नागोसे(BA), शीतल जांभुळे(BA), करिश्मा वाकडे(MA),भाग्यश्री बोभाटे(BA), नितीन टापरे(BA),साजिद गायकवाड(BA)

निवडून आलेल्या सर्वांचा स्वागत करूण सरपंच व उपसरपंच यांना पदावर विराजमान करण्यात आले .यानंतर एक दिवासाचा सरपंच उपसरपंच व इतर सदस्यां ना गावभर फिरवून गावातील समस्या जाणून घेण्यास ग्रामपचायतीच्या सर्व पदाधिकारी कर्मचारी यांनी मदत केली .
प्रत्येक शाळा , विद्यालय , महाविद्यालय येथील समस्या जानुन घेतल्या .

सर्व गावभर फिरुण ज्या समस्या मिळाल्या त्याचे निराकरण कशा प्रकारे करता येईल याची चर्चा सभेच्या रुपाने पार पाडण्यात आली . एक दिवसाचा सरपंच या उपक्रमामधे परिसरातील सर्व विद्यार्थांनी सहभाग दर्शवून आपले मनोबल वाढवावे व प्रशासकीय अनुभव घ्यावे ही विनंती करीत व माॅ सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करीत एक दिवसाचा सरपंच हा उपक्रम योग्य रितीने पार पाडण्यात आला .

 या उपक्रमाची परिसरातील ग्राम पंचायतीने नोंद घेवून नवनावेन उपक्रम आपल्या गावासाठी कसे आखता येईल याची योजना बनवावी असा संदेश ग्रामपंचायत आंबोली च्या वतीने देण्यात आला . या उपक्रमाची पारेसरात खुपच चर्चा चालू आहे .

 'या उपक्रमाचा उद्देश आंबोली गावातील युवक-युवतींना ग्राम पंचायत कळावी.1 दिवसात ग्राम पंचायत कळणे शक्य नाही हे आम्हाला पण कळत परंतु निदान त्यांना ग्राम पंचायत चा कारभार कसा असतो.सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक यांचे अधिकार,कर्तव्य कळावेत जेणेकरून भविष्यात ते गावचे कारभारी झाल्यास त्यांना निदान ग्राम पंचायत ची प्राथमिक माहिती असावी यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरेल : - सरपंच सौ.शालीनी ताई दाहतरे
             

महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनीयम 1958 च्या कलम 45 च्या ग्रामसुचितील विषय क्रमांक 15/16/18 नुसार युवकांचे कल्याण या विषयानुसंगाने हा उपक्रम पार पडला आहे. गावातील युवकांच्या नवीन संकल्पना गावाच्या उपयोगी याव्यात,त्यांचे शिक्षण गावाच्या उपयोगी यावे म्हणून हा उपक्रम - उपसरंपच वैभव ठाकरे ग्राम पंचायत आंबोली .

सोशित वंचित पिडीत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना समाजाचे प्रश्न , राजकारणाचे धडे , प्रशाषणाचे समाजा प्रती कार्य , आपले अधिकार , हक्क कळावे व मनातील भिती कमी होवून सर्व क्षेत्रातला व प्रशासकिय अनुभव मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

चिमूरतील बातम्या

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...