Home / यवतमाळ-जिल्हा / बंदुकीचा धाक दाखवून...

यवतमाळ-जिल्हा

बंदुकीचा धाक दाखवून शेती बळकावणार्‍यांवर भूमाफियांवर कठोर कारवाई करा : ॲड.क्रांती राऊत.

बंदुकीचा धाक दाखवून शेती बळकावणार्‍यांवर भूमाफियांवर कठोर कारवाई करा : ॲड.क्रांती राऊत.
ads images

यवतमाळ : शहरात मोठ्या प्रमाणात भूमाफीयांनी बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणावरील जमिनी बळकावून शासनाने अधिग्रहीत केलेल्या जमिनींचा मोबदला बळकावून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भूमिफीयाविरुध्द कारवाईसाठी आज विदर्भ अन्याय निवारण समितीची  ॲड.क्रांती राऊत यांच्या वतिने पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

विदर्भ अन्याय निवारण समितीच्या व पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी केलेल्या आव्‍हानावरुन यवतमाळ तालुक्यातील लोणी (घाटाणा) येथील विधवा शेतकरी शोभा दादाराव चव्हाण यांची शेतीसुद्धा भूमाफिया बंटी जयस्वाल यांनी बळकावल्याचा आरोप पत्रकार परिषदेत शोभा चव्हाण यांनी केला.शोभा चव्हाण यांचे पती दादाराव चव्हाण यांनी चाळीस हजार रुपयांमध्ये २००४ साली बंटी जयस्वाल याचा भाऊ शाम उर्फ  विनोद द्वारकाप्रसाद जैस्वाल यांच्याकडे ४९ हजार रुपये मध्ये गहाण केली होती. ४०,००० पैकी ११ हजार रुपये दादाराव चव्हाण यांनी जयस्वाल यांना नेऊन दिले.  यानंतर दादाराव चव्हाण व शोभा चव्हाण हे दोघेही दोन लाख रुपये देण्यासाठी गेले.

यानंतर आमच्याकडे यायचे असल्यास 24 लाख रुपये आणल्याशिवाय आमच्याकडे यायचे नाही अन्यथा बंदुकीने जीवे मारून ठार करू अशी धमकी बंटी जयस्वाल याने दिली.मात्र पैसे दिल्यानंतरही संबंधित पटवाऱ्यावर दबाव आणून त्यांनी परस्पर शेत फेरफार करून त्यांच्या नावे करून घेतली.याच विवंचनेतून दादाराव चव्हाण यांनी आत्महत्या केली.


लोणी शेत शिवारात पाच एकर जमीन संदर्भात शोभा चव्हाण यांनी

जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन सावकारी कायद्याअंतर्गत शेती बळकावत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्यानंतर शोभा चव्हाण विरुद्ध शाम जयस्वाल यांच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी शोभा दादाराव चव्हाण यांची शेती परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत शेती परत केली गेली नाही अशी माहिती शोभा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेत ॲड.क्रांती राऊत बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचे असल्यास शेतकऱ्यांच्या शेती वाचवा कारण आत्महत्येमागील प्रमुख कारण अवैद्य सावकारी असून याविरोधात प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त करावे अशी मागणी पत्रकार परिषदेतून क्रांती राऊत यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना 

सर्विस सेंटर फॉर अवेअरनेसचे प्राध्यापक प्रदीप राऊत यांनी सुमित बाजोरिया यांनी बस स्थानक ते पांढरकवडा बायपास पर्यंत केलेल्या काँक्रेटीकरणाच्या  बांधकामा संदर्भात माहिती घेण्यासाठी बसस्थानक चौकात गेले असता त्यांच्यासोबत धक्काबुक्की करून मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याची यावेळी प्रा.प्रदीप राऊत यांनी सांगितले यासह त्यांनी अनेक शासकीय कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून याची चौकशी व्हावी अशीही मागणी पत्रकार परिषदेतून प्राध्यापक प्रदीप राऊत यांनी केले तसेच क्रांती राऊत यांनी सुमित बाजोरिया वर अनेक गुन्हे दाखल असताना यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सुमित बाजोरीया  यांनी शासनाच्या पैशावर मोठ्या प्रमाणात डल्ला मारला असून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या तिजोरीत  करणाऱ्या सुमित बाजोरीयावर कठोर कारवाई करावी तसेच त्याचे साथीदार यांच्यावरही कठोर कारवाई करावी.सुमित बाजोरिया व बंटी जयस्वाल यांचेकडील वैद्य व अवैद्य शस्त्र जप्त करून गंभीर गुन्हे दाखल करावे व यांना विविध गुन्ह्यात सहभागी असताना यांना न्यायालयाने जमानत देऊ नये अन्यथा सुमित बाजोरिया व बंटी जयस्वाल यांना जमानत दिल्यास फिर्यादी वर फिर्यादीच्या जीवित्वास धोका निर्माण होऊ शकतो असे यावेळी पत्रकार परिषदेत क्रांती राऊत यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला लालजी राऊत प्राध्यापक प्रदीप राऊत पीडित महिला शोभा चव्हाण आदी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...