Home / यवतमाळ-जिल्हा /  यवतमाळ येथील धनगर बांधवांनी...

यवतमाळ-जिल्हा

 यवतमाळ येथील धनगर बांधवांनी केली मेंढपाळ बांधवा सोबत दिवाळी साजरी 

 यवतमाळ येथील धनगर बांधवांनी केली मेंढपाळ बांधवा सोबत दिवाळी साजरी 
ads images

 दरवर्षी प्रमाणे यंदाही धनगर समाजाची ५ नोव्हेंबर २०२१ ला बेड्यावर जाऊन दिवाळी साजरी 

यवतमाळ: यवतमाळ शहरातील व जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मेंढपाळ बांधवांच्या बेड्यावर जाऊन दिवाळी साजरी केली. मेंढपाळ समाजाच्या जीवनात अठराविश्व् दारीद्र्य गरीबी पाचविला पुंजलेली असते, राणोमाळ भटकंती करुन मेंढ्यांच्या पोटाला चारा मिळण्यासाठी त्यांना रानावनात जीवन जगावे लागते रानावनात फिरतांना ना सन ना वार असतात अशा वेळी त्यांच्या जीवनात सुखाचे दोन गोड घास मिळावे व त्यांच्या जीवनात थोडा आनंद मिळावा म्हणून यवतमाळ शहरा जवळ मादनी गावासमोर एका शेतात  बेड्यावर यवतमाळातील  धनगर बांधवांनी दहा कुटुंबाला फराळाचे साहीत्य व  बेड्यावरील सर्व माणसे लहान मुले यांना नवीन कपड्याचे वाटप करून दिवाळी साजरी केली.

जित्राबाचे पोटासाठी दिवाळी दसरा असो किंवा ऊन वारा पाऊस असो सतत राणावनात भटकंती करणारे मेंढपाळ बांधव सणासुदीचे दिवशी घरापासुन दुर असतात.त्यांचे नशिबी दिपावलीचे गोडधोड नसते कि सग्यासोयऱ्या सोबतचा आनंद नसतो म्हणुन त्यांचेही जिवनात दिपावलीच्या आनंदा करीता दिपावलीचा एक दिवस त्यांचे सोबत घालुन त्यांचे समवेत घालवणे करीता दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यवतमाळ, सर्वशाखीय धनगर समाज संघटना यवतमाळ ,अहिल्या महिला बिसी मंडळ यवतमाळ च्या पदाधिकारी व सभासदांनी काल शुक्रवार दि.5 नोव्हेंबर 2021 रोजी कळंब तालुक्यातील मेंढला गावाजवळील बेड्यावर सहकुटुंब सहपरिवार जाऊन दिपावली साजरी करण्यात आली.याप्रसंगी मेंढपाळ बांधवासोबत सर्वांनी एकत्रपणे फराळ करुन बेड्यावरील सर्व कुटुंबियांना दिपावली निमित्ताने नविन कपडे देण्यात आले .त्यांचे सोबत वाद्यावर नृत्ये करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

 तसेच यावेळी योगायोगाने श्री....नरेंद्र.....गवारकर यांचा वाढदिवस असल्याने मेंढपाळ बांधवासोबत साजरा करण्यात आला.

यावेळी मेंढला ग्रामपंचायतीचे सतत दोन पंचवार्षीक व सध्याही सरपंच असलेले मेंढपाळ बांधव श्री कृष्णाभाऊ अहिरे सह गावातील मेंढपाळ बांधव हजर होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाडणे करीता श्री समाधान कांबळे यांनी प्रचंड मेहनत घेतली.

याप्रसंगी ऊपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमास समाजांतील खालील मान्यवर उपस्थित होते.मल्हारश्री पांडुरंगदादा खांदवे,कृष्णराव कांबळे सर,योगेश ढोले साहेब,रमेश गवारकर,अविनाश जानकर,रमेश जारंडे,विठ्ठलराव बुच्चे,पुरुषोत्तम बोबडे,मधुकरराव चिव्हाणे,नरेंद्र गवारकर,गजाननराव मसाळे,डाँ राजीवजी मुंदाने सर,राहुल मासाळ,अरुण बुरांडे,राजेंद्र महल्ले,विनोद शिंदे सर,ओमप्रकाश जांभुळे,रमेश उघडे, मारोतराव पचकटे,अनंता कोरडे,संदिप खांदवे,सुनील बोदे,अनील पारखे,समाधान कांबळे,कृष्णराव अहिरे,सरपंच,मेंढला,मंगेश गाडगे,अवीनाश पारखे,बिपीन उघडे,किरण बोभाटे,रविंद्र गंडे,विलास अवघड, विनीत मसाळे,आराध्य मुंदाने,राम अवघड,विद्यानंद गाडगे,रोहन गोडे,शिवा निळ,संतोष देवकते,शुभम मदने, सुरज कुनगर,संकेत दन्नर,यश मासाळ,लोकेश देवकते,दर्शन देवकते,संकेत देवकते,वासुदेव थोरात,योगेश एडके,नितीन एडके,चेतन देवकते,अनिकेत दन्नर,प्रवीण खांदवे,रामनाथ खांदवे अमोल खांदवे,घनश्याम जाधव ,चेतन सुधाकर देवकते,नितीन एडके,अनीकेत दन्नर,रोशन देवकते,कुणाल कोळकर.सौ लताताई खांदवे,सौ संगीता जानकर,सौ वर्षा पडवे,सौ अर्पणा बुच्चे,सौ सुनीता जारंडे,सौ सुजाता चिव्हाणे,सौ कल्याणी बोबडे,सौ नंदा बुरांडे,सौ वंदना मसाळे,सौ मीनाक्षी कोरडे,सौ वर्षा गवारकर,सौ योगीता महिलेला,श्रीमती अनीता माहुलकर,श्रीमती शारदा धनवर,कु.हर्षदा बुच्चे,कु.नैना गाडगे,कु.अनुजा धनवर,मनस्वी उघडे,श्री माहुलकर,इत्यादी
 मोठ्या संखेने समाज बांधव उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...