Home / विदर्भ / अमरावती / कापसाच्या 9,800 रुपये दराबाबतची...

विदर्भ    |    अमरावती

कापसाच्या 9,800 रुपये दराबाबतची अचलपूर बाजार समितीची पावती व 9,900 रुपये दराबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कापसाच्या 9,800 रुपये दराबाबतची अचलपूर बाजार समितीची पावती व 9,900 रुपये दराबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) अमरावती :अलीकडे सोशल मीडियाचे प्रस्थ व वापर वाढत असताना त्यावर फिरणाऱ्या विविध 'मॅसेजेस'च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले आहे. शेतीविषयक माहिती, तंत्रज्ञान, उत्पादने, यासह अन्य शेतीविषयक माहितीचे 'मॅसेजेस' व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टेलिग्रामवर फिरत असतात. यातील काही 'मॅसेजेस' चुकीचे, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे व शेतमाल बाजार प्रभावित करणारे ठरतात. याचा प्रत्यय या तीन महिन्यात दोनदा आला आहे. सध्या देशांतर्गत कापूस बाजारातील तेजी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा देणारी असली तरी अचलपूर (जिल्हा अमरावती) कृषी उत्पन्न बाजार समितीची 'ती काटापट्टी' शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडविणारी व कापूस बाजार अभ्यासकांना बुचकाळ्यात टाकणारी ठरली.

दिशाभूल करणारी 'ती काटापट्टी'
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची कापसाची 'ती' काटापट्टी शुक्रवार (दिनांक 29 ऑक्टोबर)पासून व्हाट्सअ‍ॅप व फेसबुकवर फिरत आहे. देशातील कापसाचे दर प्रति क्विंटल 7,400 रुपये ते 8,700 रुपये रुपयांच्या दरम्यान असताना श्री पंकज राजेंद्र  उमाळे, रा. वासनी (बु.), ता. अचलपूर, जिल्हा अमरावती या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या त्या काटापट्टीवर कापसाचा दर प्रति क्विंटल 9,800 रुपये नमूद असल्याने त्या काटापट्टीने विचार करायला भाग पाडले. त्या काटापट्टीचा पावती क्रमांक 1998 असून, त्यावर 29-10-2021 ही तारी, 'कमल जिनिंग कं' असे खरेदीदाराचे नाव, एमएच-21/3715 हा वाहन क्रमांक, 28 क्विंटल 50 किलो भरलेल्या कापूस गाडीचे वजन, 11 क्विंटल 55 किलो रिकाम्या गाडीचे वजन, 16 क्विंटल 95 किलो नक्की कापसाचे वजन, अजित-9 ही कापसाची जात व 9,800 रुपये प्रति क्विंटल दर नमूद आहे. या काटापट्टीवर मापारी व खरेदीदाराची स्वाक्षरी (कोंबडा) तसेच अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा गोल शिक्का (सील) आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व चर्चा
मागील काही वर्षात कापसाला मिळालेला भाव, शासकीय कापूस खरेदीचा तिढा, चुकारे मिळण्यास दिरंगाई या बाबी लक्षात घेता, चालू कापूस खरेदी हंगामातील तेजी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. कापसाचे दर प्रति क्विंटल 8,700 रुपये व 9,100 रुपयांवर पोहोचल्याने ते 10,000 रुपये प्रति क्विंटलवर जाईल आणि प्रतीक्षा केली तर आपल्याला थोडेफार अधिक पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच त्या काटापट्टीतील प्रति क्विंटल 9,800 रुपये दराने भर टाकली. अनेकांनी कापसाचे दर वाढतील, या आशेने कापूस विकण्याची घाई न करण्याचा करू निर्णय घेतला असेल. या काटापट्टीने शेतकऱ्यांमध्ये कापूस दराबाबत संभ्रमही निर्माण केला. त्या काटापट्टीतील दराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा हिंगणघाट (जिल्हा वर्धा) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मधुसुदन हरणे तसेच मी स्वतः अचलूपर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाकडे या दराबाबत चौकशी केली. या बाजार समितीत शुक्रवारी (दिनांक 29-10-2021) कापसाचे कमाल दर 7,900 रुपये प्रति क्विंटल असल्याचे त्यांनी सांगितले. हेच दर शनिवारी (दिनांक 30-10-2021) कायम होते. यात काहीही वाढ झाली नसल्याचे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने सांगितले.  
 
जिनिंग कंपनीबाबत घोळ
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली जात नाही, अशी माहिती श्री अशोक ठाकरे, रा. परतवाडा, जिल्हा अमरावती यांच्यासह शेतकऱ्यांनी दिली. शिवाय, अचलपूर येथे 'कमल जिनिंग कंपनी' नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. हा जिन तीन वर्षापासून बंद असल्याची तसेच जिनचे मालक मध्य प्रदेशात वास्तव्याला असल्याची माहिती अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अजय टवलारकर व सचिव पवन सालवे यांनी दिली.आपण त्या जिनिंगमध्ये अथवा बाजार समितीमध्ये कापूस विकलाच नाही, असेही पंकज उमाळे व त्यांचा भाऊ सतीश उमाळे यांनी सांगितले.

पोलिसात तक्रार
ही काटापट्टी खोटी असून, याबाबत आपण अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर व सचिव पवन सालवे यांनी दिली. सौदापट्टी व काटापट्टी पावती बुक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडे असते. यातील 1998 क्रमांकाच्या काटापट्टीचा गैरवापर करण्यात आला. ही पावती असलेले बुक या बाजार समितीच्या कोणत्या कर्मचाऱ्याकडे होते? ते त्या कर्मचाऱ्याकडून आणखी कुणाकडे गेले? हा खोडसाळपणा कुणी व का केला? त्या पावतीवर माहिती नमूद करून व त्याचा फोटो काढून पहिल्यांदा सोशल मीडियावर कुणी पोस्ट व व्हायरल केला? हे सर्व करण्यामागचा त्यांचा उद्देश काय? याचा शोध घेणे गरजेचे आहे. वास्तवात, हा केवळ खोडसाळपणा असल्याने तसेच या प्रकारात पैशाची अफरातफर झाली नसल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करतीलच, याबाबत शंका आहे.

व्हायरल व्हिडीओ
कापूस बाजारात तेजी असल्याने जिनिंग-प्रेसिंग मालकांची माणसं कापूस खरेदीसाठी गावोगाव फिरून कापूस खरेदी करीत आहेत. या संदर्भात एक व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर व्हायरल झाला आहे. खरेदी करणारी व्यक्ती शेतकऱ्याच्या घरी जाऊन कापसाचा सौदा करीत आहे. व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने आधी कापूस 9,100 रुपये प्रति क्विंटल दराने मागितला. शेतकऱ्याने नकार देताच त्याने तोच कापूस चक्क 9,900 रुपये प्रति क्विंटल दराने मागितला. मात्र, शेतकऱ्याने या दरात कापूस विकण्यास नकार दिला. हा व्हिडीओ देखील अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील त्या काटापट्टीप्रमाणे बनावट वाटत असून, शेतकऱ्यांना कापूस उशिरा विकण्यास भाग पाडणारा ठरू शकतो.

खरेदी शुभारंभ व चढे दर
कापूस खरेदीच्या चढ्या दराच्या पावत्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही पावत्यांबाबत प्रत्यक्ष चौकशी केली असता तो चढा दर केवळ कापूस खरेदी शुभारंभाप्रसंगीचा असल्याचेही निदर्शनास आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट (जिल्हा अकोला)ची गुरुवार (दि. 28-10-2021)ची सौदापट्टी पाहण्यात आली. या सौदापट्टीत कापसाचा दर प्रति क्विंटल 9,100 रुपये नमूद केला आहे. हा बैलगाडीभर कापूस साई जिनिंग कंपनीने स्वप्निल विनोद अढाऊ, रा. चंडिकापूर, जिल्हा अकोला यांच्याकडून खरेदी केला. साई जिनिंगने हा कापूस त्यांच्या कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी चढ्या दराने खरेदी केला. त्या दिवशी आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8,200 रुपये ते 8,600 रुपये प्रति क्विंटल कापसाचे दर होते. चढ्या दराने विकला जाणाऱ्या कापसाचा दर्जा (पांढरा शुभ्र रंग, 30 एमएम पेक्षा अधिक स्टेपल लेंथ, प्रमाणबद्ध ओलावा) चांगला असतो. याच दर्जाचा कापूस बाजारात विकायला आलेल्या प्रत्येक कापसाचा असतो, असे नाही. मात्र, शेतकरी या बाबी ग्राह्य धरत नाही. चढ्या दराच्या सौदापट्टी पावत्या या 5 ते 15 क्विंटल कापूस खरेदीच्या असतात. व्हायरल होणाऱ्या याही पावत्या शेतकऱ्यांना कापूस उशिरा विकण्यास बाध्य करू शकतात.

सोयाबीनची चढ्या दराची पावती
ऑगस्ट-2021 मध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला होता. याच काळात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक लिलाव पट्टी सोशल मीडियावर बघावयास मिळाली. या लिलाव पट्टीत सोयाबीनचा प्रति क्विंटल दर हा 11,100 रुपये नमूद होता. मात्र, त्या व्यापाऱ्याने या दराने शेतकऱ्याकडून केवळ 72 किलो सोयाबीन खरेदी केले होते. त्यावेळी वाशिम बाजारपेठेत सोयाबीनचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होते.

खोडसाळपणाचा परिणाम
शेतमालाच्या चढ्या दराबाबत सोशल मीडियावर केला जाणारा हा खोडसाळपणा दिवसभरात राज्यभर पसरतो. शेतकरी तर्क न लावता त्यावर विश्वास ठेवतात. दिशाभूल टाळण्यासाठी विश्वास ठेवण्यापूर्वी त्या माहिती अथवा पोस्ट बाबत खातरजमा करणे आवश्यक आहे. हा खोडसाळपणा शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल घरी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतो. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. सध्या कापसाचा बाजार तेजीत असला तरी वायदा बाजारातील रुईच्या गाठींचे सौदे लक्षात घेता आगामी काळात कापसाचे दर उतरण्याची शक्यता आहे. त्यातच यावर्षी कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सध्याचे कापसाचे दर मनाला पटत नसले तरी शेतकऱ्यांनी घरातील कापूस टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरले. कापूस विकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी घरातील कापसाचा दर्जा लक्षात घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...