Home / यवतमाळ-जिल्हा / नेर / ठाकरे सरकारला घरचा...

यवतमाळ-जिल्हा    |    नेर

ठाकरे सरकारला घरचा आहेर..! विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर.

ठाकरे सरकारला घरचा आहेर..! विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले निवेदन..!

यवतमाळ (प्रतिनिधी):  यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर, या प्रकरामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचं बोललं जात आहे.

पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग पिक हातातून गेले असून, शेतकरी संकटात आहे. या नुकसानामुळे कर्जाचा बोजा आणखीच वाढणार आहे. करोना काळात शेतकर्‍यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सोसावे लागले. कर्ज, उसनवारी करून शेतकर्‍यांनी पेरणी केली. सुरुवातीला पीक-पाणी चांगले होते. मात्र, पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन नेर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, दीपक आडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविले आहे.

तर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकऱ्यां न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या हाती मागण्यांचे फलक व झेंडे देखील होते. नुकसानीची माहिती शासनाला देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो, नेज़र तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शासनाला देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो आहोत. सततच्या पावासाने कृषी व्यवसाय डबघाईला आलेला आहे. शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे. त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपल्या हक्काच्या सरकारला माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. शेतीचं नुकसान झालेलं आहे, परंतु किती प्रमाणात झालं? काय झालं? याचा डाटा इथे तयार नाही. म्हणून आम्ही शिवसैनिकांच्या माध्यामातून प्रत्येक गावात शेतकऱ्यांचं नाव, त्यांचा सर्वे नंबर, क्षेत्रफळ, शेतातील पीक आणि झालेलं नुकसान याबाबतची माहिती आम्ही इथे जमा केली आहे. ही सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी नेर तहसीलला आलो आहोत. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकेल. या निवेदनाचा मुख्यमंत्री विचार करतील आणि तालुक्याला भरघोस मदत करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.” असं शिवसेना तालुका प्रमुख मनोज नहल्ले यांनी सांगितलं आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

नेर तील बातम्या

सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार-पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : ग्रामीण भागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये...

*प्रशासक नियुक्तीसाठी विद्यापीठाकडे शर्थीचे प्रयत्न करू* _ वसंत घुईखेडकर

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर प्रतिनिधी :गणेश खडसे दाते महाविद्यालयातील प्राध्यापकांवरील अन्याय दूर करण्यासाठी...