Home / विदर्भ / घरकुला साठी सर्व पक्षीय...

विदर्भ

घरकुला साठी सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे नेतृत्वात आंदोलन संपन्न.

घरकुला साठी सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर    जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे नेतृत्वात आंदोलन संपन्न.

घरकुला साठी सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर

 

जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे नेतृत्वात आंदोलन संपन्न.

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर

 

*कारंजा (लाड* ):स्थानीक कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे घर मिळावे शासनाची घरकुल योजना आणि तिच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन गावातील बेघराना हक्काच्या घरासाठी आज पंचायत समितीच्या समोर आंदोलन करण्यात करण्यात आले .या आंदोलनात गाव खेड्यातील गरजू लाभार्थ्यासह स्थानिक ग्राम पंचायत सरपंचांनी हजेरी लाऊन या प्रश्र्नची गरज लक्षात घेता घरकुल आणि त्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून केली.त्यात घरकुलाचे टार्गेट वाढून देणे,घरकुल बाधण्यासाठी

लागणाऱ्या जागेला नियमाकुल करत असताना घालून दिलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात,शहरी भागासाठी घरकुल बांधकामा साठी २लाख ५० हजार अनुदान   आणि ग्रामीण भागातील घरकुलासाठी १लाख ३८ हजार ही विषमता मिटऊन ग्रामीण भागातील अनुदान २लाख ५० हजार करण्यात यावे . आदीं मागण्याचे निवेदन पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे मार्फत मुख्य मंत्री आणि पंतप्रधान याना देण्यात आले.यावेळी घरकुल लाभार्थी यादीत असलेल्या आणि बेघर लोकांनी स्वहस्त लिखित पत्र पंतप्रधान याना पाठऊन आपला रोष व्यक्त केला .आंदोलनात राष्ट्र वादी काँग्रेस चे नेते दत्तराज डहाके ,  आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर युवा नेते देवदत्त डहाके,समाज कल्याण सभापती अशोकराव डोगरदिवे,जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तूरक,जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोने,पंचायत समिती सभापती प्रदीप देशमुख, माजी प स सभापती सविता रोकडे, पंचायत समिती सदस्य देवानंद देवळे,मयूर मस्के,धम्माभाऊ गवई,सौ.अल्काताई अंबरकर,सौ वर्षाताई गवई,सौ.मोनालिताई तायडे, उमर्डा बाजार ग्रामपंचायत सरपंच राज चौधरी पिंपळगाव बु. ग्रामपंचायत सदस्य सुरेश बहुटे, यांचेसह ग्रामीण भागातील घरकुल मागणी करणारे शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

बॉक्स.

आम्ही हे गरिबाच्या हक्काचे घर केव्हा मिळणार हा प्रश्न देशातील  राज्यातील शासनकर्ते याना जागविण्यासाठी प्राथमिक आंदोलन करीत असून आमच्या हा रास्त मागणीला न्याय मिळावा म्हणून करीत आहोत या मागणीला सरकारने लवकर न्याय द्यावा अन्यथा पुढील आंदोलन हे व्यापक स्वरूपात करून शासनाला घरकुलाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडू.

जी. प.सदस्य चंद्रशेखर डोईफोडे.

बॉक्स

गावातील गरीब बेघर आणि गरजू माणसाची लढाई आता रस्त्यावर आली आहे हे शासन कुंभकर्णी झोपेत आहे त्यामुळे या निद्रिस्त शासनाला जागविण्यासाठी आता आम्ही लढा उभा करू आणि गरिबांना घर मिळे पर्यंत आपला लढा कायम ठेऊन या लढ्यात आपण शेवटच्या माणसाला न्याय मिळऊन देण्यासाठी सर्व शक्तिनिशी या आंदोलनात उतरू.

दत्ताभाऊ डहाके

नेते राष्ट्रवादी काँग्रेस.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...