Home / विदर्भ / *चालकाने ट्रॅव्हल्समध्येच...

विदर्भ

*चालकाने ट्रॅव्हल्समध्येच केला महिलेचा विनयभंग!* *मोप गावाजवळील घटना चालकाविरुद्ध गुन्हा* *विश्वास ठेवावा तरी कोणावर?* खासगी प्रवासी वाहनात ओळखीच्या चालकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याने विश्वास ठेवावा तरी को

*चालकाने ट्रॅव्हल्समध्येच केला महिलेचा विनयभंग!*    *मोप गावाजवळील घटना  चालकाविरुद्ध गुन्हा*    *विश्वास ठेवावा तरी कोणावर?*  खासगी प्रवासी वाहनात ओळखीच्या चालकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याने विश्वास ठेवावा तरी को

*चालकाने ट्रॅव्हल्समध्येच केला महिलेचा विनयभंग!*

 

*मोप गावाजवळील घटना  चालकाविरुद्ध गुन्हा*

 

विश्वास ठेवावा तरी कोणावर

खासगी प्रवासी वाहनात ओळखीच्या चालकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याने विश्वास ठेवावा तरी कोणावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम* : रिसोड वाशिम ते पुणे, पिंपरी- चिंचवड या खासगी प्रवासी वाहनाने (ट्रॅव्हल) पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या महिलेचा चालकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १२ मार्च रोजी मोप गावानजीक घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करीत प्रकरण रिसोड पोलिस स्टेशनकडे सोमवारी वर्ग केले. आसिफ शेख बागा शेख (रा. व्याड, ता. रिसोड) असे चालकाचे नाव आहे.

   पीडित महिलेने मेहकर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, ती लोणार तालुक्यातील असून, माहेर रिसोड तालुक्यातील आहे. पीडिता ही पतीसह पिंपरी-चिंचवड येथे राहते. १२ मार्च रोजी पीडितेने हिंदवी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने पुणे येथील जाण्यासाठी तिकीट बुकिंग केले आणि चिखली (ता. रिसोड फाट्यावरून ती सायंकाळी ७ वाजता दीड वर्षाच्या मुलासह ट्रॅव्हल्समध्ये बसली. चालक हा ओळखीच्या निघाल्याने पीडितेच्या भावाने चालकाशी संवाद साधून बहिणीला व्यवस्थित सांभाळून ने, असे सांगितले होते.

    चिखली फाट्यावर या गाडीत केवळ चालक व वाहकच उपस्थित होते. रिसोड येथून आणखी एक प्रवासी गाडीत बसला आणि पुढील प्रवासासाठी गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, अंदाजे ७.४५ वाजताच्या सुमारास चालकाने मोप गावाच्या अलीकडे गाडी थांबविली आणि पीडित महिलेच्या सीटवर जाऊन बसला यावेळी त्याने पीडितेशी लगट करीत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

    पीडितेने तीव्र विरोध केल्यानंतर चालकाने स्टेअरिंग हाती घेत गाड़ी चालविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पीडित महिलेला हा प्रकार मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला सांगितल्याने त्या प्रवाशाने धीर दिला. वेणी व मेहकर येथे असलेल्या नातेवाइकांशी मोबाईलवरून संपर्क साधून हकीकत सांगितल्यानंतर, सुलतानपूर येथे उतरण्याचा सल्ला नातेवाइकांनी पीडितेला दिला. गाड़ी सुलतानपूरला थांबताच पीडिता खाली उतरली आणि नातेवाइकांनी चालकाला जाब विचारला. शाब्दिक चकमक सुरू असतानाच, चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडितेने मेहकर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपराधाचे घटनास्थळ रिसोड पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने मेहकर पोलिसांनी उपरोक्त प्रकरण रिसोड पोलिस स्टेशनकडे वर्ग केले.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...