Home / विदर्भ / नागपूर / मायबाप आदर्श असावे...

विदर्भ    |    नागपूर

मायबाप आदर्श असावेत?

मायबाप आदर्श असावेत?

भारतीय वार्ता 

 

       अलिकडे आपण पाहतो की मुलं मायबापाची सेवा करीत नाहीत. त्या मायबापांना त्यांची मुलं चक्कं वृद्धाश्रमात पाठवतात. शिवाय आजच्या काळात त्यांचं बोलणंही ऐकून घेत नाहीत. कोणी याला कुसंस्कार असं नाव दिलेलं आहे. लोकांचं म्हणणं असं की जे मायबाप मुलांवर संस्कार करीत नाहीत,  कुसंस्कार करतात. त्यांची मुलं अशी वात्रट निघतात. जी मायबापाची सेवा करीत नाहीत. मायबापाला वृद्धाश्रमात पाठवतात.

         वरील स्वरुपाचं मुलांचं वागणं पाहिलं की आपल्याला त्यात मुलांचा वात्रटपणा दिसतो  ती परिस्थिती पाहून दयाही येते आणि विचारही येतो की मुलं अशी का वागत असावीत. परंतू त्यावेळी मुलांचं चूकत असेल का? त्याचं उत्तर नाही असच आहे.

         महत्वाचं म्हणजे मायबाप मुलांवर कुसंस्कार करीत नाहीत. त्यांना कधीच आपली मुलं कुसंस्कारी बनावी असं वाटत नाही. तरीही मुलं कुसंस्कारी बनतात.  असं चित्र पाहायला मिळत असतं आज. याबाबत एक उदाहरण देतो. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. ती बातमी म्हणजे एका मुलीनं तिच्या आईच्या चेह-यावर सोल्युशन टाकलं. त्यात आई गंभीर जखमी झाली. मुलगी लोकांना चकमा देवून पळाली. पोलीस स्टेशनला तक्रार झाली. पोलीस शोधात आहेत. आज पेपरला बातमी येते की मुलानं बापाची हत्या केली. कधी येते पेपरला  येते की आईची हत्या. ह्या गोष्टी मायबापानं केलेल्या कुसंस्काराच्या आहेत की संस्काराच्या. ह्यावर प्रश्नचिन्हं उभं ठाकतं. जी आई आपल्याला जन्म देते. त्या आईवर सोल्युशन टाकणं हा अपराधच. परंतू का टाकलं? या प्रश्नांची शहानिशा केल्यास असं दिसून येतं या प्रकरणावरून की आईचं चुकलं.

         हेच प्रकरण नाही तर अशी बरीच प्रकरणं आहेत, त्या प्रकरणावरुन दिसतं की मुलगी लहान असते, तेव्हा आई किंवा बापाचं भांडण होते. मग आई किंवा बाप दुसरी चूल मांडते. कधी यापैकी एकजण पळून जातो. त्यात मुलांचा दोष नसतो. शिक्षण आणि यात ब-याच गोष्टीचं नुकसान होतं. त्यातील ते मूल कधी बापाकडे तर कधी आईकडे राहात असते. ती मुलगी जेव्हा तरुण होते. तिला सारं काही समजू लागतं,  त्यावेळी ती आपल्या आई आणि वडीलानं एकत्र राहावं. म्हणून दोघांनाही समजवू लागते. परंतू त्यावेळी ना आई समजत समजत, ना बाप समजत. हे जेव्हा घडते, मग तेच मूल आईच्या अंगावर सोल्युशन टाकते. यात मुलीचा अपराध नसतो. कधीकधी मालमत्तेसाठी होत असलेली आबाळ पाहून मुलगा बापाची हत्या करतो. यातही संस्कार चुकतो. खरं तर मायबाप जर आदर्श वागत असतील तर त्यांची मुलं ही देखील आदर्श वागू शकतात. ही सत्य बाब आहे. परंतू जिथं मायबाप सत्य वागत नसतील तर मुलं देखील त्यांचच अनुकरण करीत वागत असतात.

          काही मुलांना आपले मायबाप सोबत राहात असलेले पाहायचे असतात. परंतू त्याच्या मनाला फाटा देवून व त्यांची इच्छा विचारात न घेता मायबाप वेगवेगळे राहात असतात. त्यात मुलांचा दोष कोणताच नसतो. परंतू मुलांना नाईलाजास्तव विनाकारण ते लहान असल्यानं मायबापाच्या विलगीकरणाचा त्रास झेलावा लागतो. शोषावा लागतो. याचाच परिणाम होतो मुलांवर व मुलेही बदल्याच्या भावनेने वागत असतात त्यांचेशी. ती जेव्हा मोठी होतात व त्यांना जेव्हा समजदारी येते, तेव्हा तीच मुले आपल्या मायबापाच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करीत असतात व एकत्रीकरण न झाल्यास तीच मुले मग कोणी सोल्युशन टाकतं.  कुणी हत्या करतं. कुणी ॲसीड फेकतं.

         जर मायबापांना विलगीकरणाने राहायचे असेल भविष्यकाळात तर त्यांनी मुलं का पैदा करावीत. करुच नये मुलं पैदा. जेणेकरुन त्यांच्या मनावर असा सोल्युशन फेकण्यासारखा परिणाम होणार नाही. हं, संसार फुलत असतांना होतेच भणभण. कधी किरकोळच भांडणही. त्याचा हा अर्थ नाही की त्या मायबापांनी एकमेकांपासून विभक्त राहावं. सोबत राहू नये. ज्याचा परिणाम मुलांवर होईल. तसं जर करायचं असेल तर मुलं न पैदा केलेली बरी.

          मायबाप.......मायबापांनी आदर्श राहायला हवं. त्यांनी व्याभीचारी पद्धतीनं वागू नये. परंतू आजचे मायबाप मुलांवर कुसंस्कार वा संस्कार होत आहेत की नाही होत आहेत याचा विचारच करीत नाहीत. ते अगदी मुलं लहान असतांना व्याभीचारी पद्धतीनं वागत असतात. तो व्याभीचारपणा मुलं पाहात असतात. त्यांच्यावर परिणाम होत असतो वात्रटपणाचा.

          खरं तर मायबापानं आदर्श असावं. व्याभीचारी नसावं. संस्कारी असावं. कुसंस्कारी नसावं. सुकृत्य करावे. दुष्कर्म करु नये. चांगलं वागावं. अयोग्य वागू नये. ते जर चांगले वागतील. आपल्या आचरणातून चांगूलपणा दाखवतील. तेव्हाच त्यांची भावी पिढी आदर्श,  संस्कारी, सुयोग्य, सुविचारी बनेल यात शंका नाही. जेणेकरुन त्यातून मायबाप आदर्श तर त्यांची मुलंही आदर्श हे तत्व वाढीस लागेल.

 

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...