Home / विदर्भ / प्रा.कवाडे सरांचा ऐतिहासिक...

विदर्भ

प्रा.कवाडे सरांचा ऐतिहासिक संघर्ष घराघरापर्यंत पोहचविन्यासाठी संघर्षदूत तयार करणार चरणदास इंगोले यांची घोषणा

प्रा.कवाडे सरांचा ऐतिहासिक  संघर्ष घराघरापर्यंत    पोहचविन्यासाठी संघर्षदूत  तयार करणार    चरणदास इंगोले यांची घोषणा

प्रा.कवाडे सरांचा ऐतिहासिक  संघर्ष घराघरापर्यंत

 

पोहचविन्यासाठी संघर्षदूत  तयार करणार

 

चरणदास इंगोले यांची घोषणा

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-डॉ.बाबासाहेबांच्या महान अशा क्रांतीरुपी विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेबांच्या पश्चात मराठवाडा विद्यापीठास डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी  भूतो न भविष्यती अशा प्रकारचा जगप्रसिद्ध लॉंगमार्च काढून त्याद्वारे  लढ्याचे रणशिंग फुंकून संपूर्ण देशभर नामांतराचा संघर्ष उभारून जगाच्या पाठीवर आंबेडकरी आंदोलनाची ओळख निर्माण करणाऱ्या महासंघर्षनायक  प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा समाजाला प्रेरक ठरणारा संघर्षमय   इतिहास प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठीचा संकल्प करत त्यासाठी  पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा संघर्षदूत निर्माण करणार असल्याची घोषणा  लॉन्गमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त नागपूर आयोजित  सत्कार कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी बोलताना केलीआहे.

जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष, माजी खा, प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचा 1एप्रिल हा जन्मदिवस देशभरातील भीमसैनिकांद्वारे "*संघर्ष दिन*" म्हणून साजरा करण्यात येत असतो .त्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2023 शनिवार रोजी नागपूर येथे  पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,रमाई महिला ब्रिगेड, युवा आघाडी ,राष्ट्रीय मजदूर सेना, नागपूर महानगर  शाखेच्या वतीने संयुक्त रित्या सिताबर्डी स्थित पक्षाच्या  केंद्रीय कार्यालयामध्ये सायंकाळी 6 वाजता.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते भाई जयदीप कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत साध्या पद्धतीने मोठ्या संख्येने भीमसैनिकांच्या उपस्थितीत भीमसैनिकांचे सरसेनापती महासंघर्षनायक प्रा . कवाडे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून *संघर्ष दिन*  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सायं, 6 वाजता.प्रा जोगेंद्र कवाडे सरांचे पक्षाच्या केंद्रीयकार्यालय स्थळी आगमन होताच ढोल ताशा सह रमाई महिला ब्रिगेडच्या नागपूर प्रदेश अध्यक्षा  सुचिताताई कोटांगळे यांच्यासह  महिला कार्यकर्त्यांद्वारे  कवाडे सरांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून  जोरदार स्वागत करण्यात आले. तर  उपस्थित भीमसैनिकांच्या  स्वागताचा स्वीकार करण्यापूर्वी सर्वप्रथम प्रा.कवाडे सर यांनी कार्यालयातील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस गुलाब पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने कवाडे सरांनी केक कापून उपस्थित भीमसैनिकाचा आनंद द्विगुणीत केला तेव्हा भीमसैनिकांनी प्रचंड असा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांचा जयघोष करत तर सर  कवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है! प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा विजय असो !अशा जोरदार घोषणा देऊन आनंदनगर सीताबर्डी परी परिसर दणाणून टाकला.

या नेत्रदीपक परंतु साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते भाई जयदीप कवाडे  शुभेच्छा देताना म्हणाले की आंबेडकरी चळवळीच्या क्षितिजावर प्रा जोगेंद्र कवाडे सरांनी केलेल्या संघर्षाला तोड नाही.त्यांचा संघर्ष म्हणजे समाजाला प्रेरणा व संघर्षाची दिशा देणारा  महान असा अवलोकिक संघर्ष असल्याने देशभरात मोठ्या आदराने भीमसैनिकांद्वारा 1 एप्रिल जन्मदिवस हा संघर्षदिन  म्हणून साजरा केल्या जात असतो असे सांगितले.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चरणदास इंगोले म्हणाले की प्रा.कवाडे सरांनी काढलेल्या जागतिक कीर्तीच्या लॉंगमार्च च्या रूपाने उभारल्या  गेलेल्या नामांतर लढ्यापासून तर आज पर्यंत केलेल्या संघर्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन व आंबेडकरी चळवळीला जी संघर्षाची  स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत राहिली तीच प्रेरणा यापुढेही समाजाला व युवा पिढीतील आंबेडकरी चळवळीतील नवतरुणांना मिळावी यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 100 संघर्षदूत तयार करण्यात येणार असल्याचा संकल्प करण्यात येत आहे. प्रत्येक गाव ते घराघरापर्यंत महासंघर्ष नायक प्रा.जोगेंद्र कवाडे सरांचा अनन्य साधारण असा त्याग व  संघर्षदायी इतिहास  पोहोचविण्याचा प्रयत्न पीपल्स रिपब्लिकन पक्षाद्वारा या नवनिर्मित संघर्षदूता द्वारे केल्या जाणार असल्याचे चरणदास इंगोले यांनी संघर्षदुताची घोषणा करताना सांगितले .

याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महासचिव नांदेड मनपा चे माजी नगरसेवक बापूसाहेब गजभारे, वनी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष प्रा पुरुषोत्तम पाटील, नागपूर शहराध्यक्ष कैलास बोंबले, रमाई महिला ब्रिगेड च्या मार्गदर्शिका प्राध्यापक रंजनाताई कवाडे , प्रतिमा जयदीप कवाडे, नागपूर जिल्हाध्यक्ष  नरेंद्र डोंगरे, रमाई महिला ब्रिगेडच्या नागपूर प्रदेशाध्यक्ष सुचिताताई कोटांगळे , राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते विजय पाटील,   विलास पंचभाई अमरावती ,हरीश  दुर्योधन चंद्रपूर, प्रा मुनिश्वर बोरकर, गडचिरोली, विजय रामटेके भंडारा, महेंद्र नागदिवे गोंदिया ,मेघराज डोंगरे वर्धा, प्रा.मनोहर लांडगे प्रकाश  जींदे वर्धा ,सुरेश मेश्राम ,बाबाराव दुपारे,  यवतमाळ.नागसेन क्षीरसागर, शेषराव अंभोरे अकोला, विनोद भरणे नांदेड ,कार्यालयीन सचिव भीमराव कळमकर,   बाळूमामा कोसमकर, दिलीप  पाटील, प्रकाश मेश्राम, भगवान भोजवानी अरुण साखरकर मुरली बोराडकर, प्रणय  हाडके रवींद्र बानमारे, प्रकाश लांजेवार, महिला आघाडीच्या नेत्या  सविताताई नारनवरे, बेबीताई मनवर, प्रतिभा मानवटकर बेबीताई बोरकर यमुनाताई लांजेवार मायाताई शेंडे, इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...