Home / विदर्भ / अकोला / *थॅलेसिमिया रुग्णांना...

विदर्भ    |    अकोला

*थॅलेसिमिया रुग्णांना मोफत नॅट टेस्टड रक्त द्या - उमेश इंगळे* अंदाजे १७० मुलांना हवे आहे शुद्ध रक्त

*थॅलेसिमिया रुग्णांना मोफत नॅट टेस्टड रक्त द्या - उमेश इंगळे*    अंदाजे १७० मुलांना हवे आहे शुद्ध रक्त

*थॅलेसिमिया रुग्णांना मोफत नॅट टेस्टड रक्त द्या - उमेश इंगळे

 

अंदाजे १७० मुलांना हवे आहे शुद्ध रक्त

 

✍️उमेश इंगळे

  अकोला

 

 

अकोला:- थॅलेसिमिया रुग्णांना मोफत नॅट टेस्टड रक्त द्या अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

एकाच्या रक्तदानातून अनेकांचा जीव वाचू शकतो याच सेवाभावी गुत्तेतून रक्तदान होत असल्याने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान पडले आहे मात्र अलीकडे हेच रक्तदान चिमुकल्यासाठी जीवघेणे ठरत आहे थॅलेसेमियाग्रस्त मुलांना प्रत्येक पंधरा दिवसांनी नवीन रक्त द्यावे लागते शुद्ध रक्त न मिळाल्याने विविध आजाराला सामोरे जावे लागते थॅलेसेमिया रुग्णांना दर १५ ते २० दिवसांनी रक्ताची गरज असते या रुग्णांना मोफत रक्त देण्याचा नियम आहे परंतु हे रक्त नॅट टेस्टड नसल्याने दूषित रक्त संक्रमणातून गंभीर आजार होण्याचा धोका असतो नागपुरात मागील वर्षी 12 थॅलेसिमियांच्या रुग्णांना दूषित रक्तातून एचआयव्ही ,हॅपॅटायटिस बी,आणि सि ,आजार झाल्याची नोंद आहे यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे

अकोल्यात अंदाजे १७० थॅलेसिमियाग्रस्त रुग्ण आहेत  खाजगी रक्तपेढीत नॅट तपासणीसाठी सवलतीच्या दराचा विचार करता १५०० रुपये एका वेळेच्या तपासणीचा खर्च येतो महिन्यात दोनदा रक्तची गरज पडल्यास ३००० हजार रुपये आणायचे कुठून हा प्रश्न गरिबांना पडतो पैसे नसल्याने ८० टक्के रुग्णांना सरकारी रुग्णालयाचा आधार असतो  अशावेळी सरकारी रुग्णालयात उपलब्ध असलेले होल ब्लड किंवा रक्त घटक हेच पर्याय आहेत नॅटयुक्त तपासणी होत नसल्याने त्यांना मिळणारे रक्त कितपत शुद्ध आहे याची खात्री नसते यामुळे या मुलांना शुद्ध अर्थात नॅटयुक्त रक्त उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,ॲड रोशन तायडे, आकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...