Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

38.1

Home / विदर्भ / भंडारा / *मोगरा फुलला*...

विदर्भ    |    भंडारा

*मोगरा फुलला*

*मोगरा  फुलला*

*मोगरा  फुलला*

 

राजू बोरकर

लाखांदुर

७५०७०२५४६७

                       ऐकतेयस ना .त्या टी पाॉईंटवरील आपली पहिली नजर भेट, आठवतेय का तुला ? संध्याकाळी मी मित्रांसोबत पानठेल्यावर बसला असायचो. तू शेजारच्याच भाजीदुकानात थांबायचीस. तुझ्या गळ्यात तेव्हा चांदीचा गोफ होता . त्यावर बोटं घालून अर्धगळ्यापर्यंत ते बोटं फिरवायचीस. खुप दिवस आपले डोळेच डोळ्यांशी बोलत राहिलेत! आपल्या शब्दांनी फारसा पुढाकार घेतल नव्हता तेव्हा! कदाचित अनोळखी हृदयाल कसा द्यायचा आपला परिचय असा पेच पडला असावा,आपल्या शब्दांना . हे रोजचंच  झालयं . तुझे डोळे माझ्या डोळ्यांना शोधायला लागले. आपल्या डोळ्यांना आताशा एकमेकांशी बोलण्याची सवय झाली होती. कधी कधी तुझे डोळे माझ्या डोळ्यांना भलतेच लाजायचे. लाजून तुझे डोळे भूईवर टेकायचे. क्षणभर माझ्या डोळ्यांना अपराधी वाटायचं. पण क्षणभरात तुझे डोळे माझ्या डोळ्यांशी बोलायचे, मग माझे डोळे गोड हसायचे .

        खरेच ते मंतरलेले दिवस होते. होय ना ! एक दिवस मित्र घरी आला ती सकाळची वेळ होती. आहेस तसा चल म्हणाला .मी चौकशीत न अडकता  तयारी केली. त्याच्याच बाईकवर निघालो . १५/१६ किमीचं अंतर कापलं. आणि तुझं गाव आलं . तुझं घर आलं. मी त्याच्या  मागे चालु लागलो . त्याने दारावर टकटक वाजवलं आणि तु दार उघडलं . आपले डोळे एकमेकांशी बोलले. ते काहीसे भांबावले होते. कारण हे सारं तुझ्या माझ्या दृष्टीने अनपेक्षित घडलं होतं . तू त्या गोंधळलेल्या स्थितीत म्हणाली होतीस , 'या ना आत या' आम्ही आत आलो. तुझी बैठकरुम अगदी तुझ्या सारखीच सजलेली होती. त्या खोलीतील तुझा वावर ठळकपणे जाणवत होता. तुझ्या ऑफिसच्या काही फाईल्स टेबलावर ठेवल्या होत्या . तुझ्या काखेतील बॅग खुंटीवर शांत विसावली होती. तुझ्या गळ्यातील गोफ टेबलावर फाईल्सच्या बाजूला जणू खुरमुंडी घालून दुमडुन असल्यासारखा वाटत होता. 'थांबा येते मी' म्हणून तू आत गेलीस . पण खोलीच्या प्रत्येक कप्यात तू उभी असल्याचा भास होता. आणि तू क्षणभरातच पाण्याचे ग्लास आणलेस.एक  ग्लास माझ्याकडे सरकवत म्हणालीस," घ्या सर " काय बोलावं मल काही कळांलं नव्हतं तेव्हा! मी ' थॅक यु ' एवढंच बोललो होतो. नजर भेटीच्या नंतर आपल्या शब्दांची ही  पहिल्यांदाच भेट झाली  होती, मित्रांने तुल LIC विषयी सांगितलं आणि त्यानं तेव्हा आपण कुणाकडे आणि का चाललोत हे  सांगितलं नव्हतं. आणि मी ही  विचारण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो . त्याने थेट गाडी तुझ्या अंगणात थांबवली.अचानक पुढे बघून आशचर्याचा धक्का बसणं अपेक्षितच होतं पण ह्या भेटीनं  डोळ्यांच्या भाषेला शब्दांचीही सोबत मिळाली. आपण बोलते झालो.

 टी पाॅईंटवरची ती प्रत्येक संध्याकाळ मला साद घालायची. तिथेच तुझं दर्शन व्हायचं. तुझ्या दर्शनाचा तो विलक्षण आनंद होता. डोळ्यांची भाषा आता शब्दांत व्यक्त होउ लागलीय. मला वाटायला  लागलं होतं हे  प्रेम आहे! कदाचित तुलाही तसचं वाटलं असावं! मी समाजशास्त्र किंवा मानवशास्त्र अभ्यासक नव्हतो. तरीही तुझ्या प्रत्येक हालचालींचा अंदाज बांधायचो. कदाचित तुही बांधायचिस अंदाज! आपण डोळ्यापासून शब्दांपर्यंत आणि शब्दांपासुन हृदयापर्यंत कधी पोहचलो ते समजलंही नाही.......तुझी प्रत्येक भेट मला एखाद्या समारंभासारखी वाटली. आपण एखाद्या समारंभात गेलो की कसे आनंदित होतो.! तुझी प्रत्येक भेट आनंदाचा सोहळा होता जणू! हा सोहळा कधी संपुच नये. असं सारखं वाटायचं.

       आपल्या प्राक्तनाला रेषा असल्या तरी त्यावर आपल्याला हवे ते  शब्द त्यावर कोरता येत नाहीत. म्हणून प्राक्तन नशीब हे बेभरवशाचे असतात. ते आपले असले तरीही! छे!मी दैववादात अडकतोय का? पण कळत नकळत असंच कहिसं म्हटलं जातं होय ना? म्हणून तर तू शेवटी नशिबावर येउन ठेपलीयस. तेव्हा तू म्हणाली होतीस , "आपल्या नशीबात एक होणं नाही." तुझ्या एकाच वाक्याने आयुष्य बदललं. आपले सोबत घालविलेले चार पाच वर्ष एका क्षणात 'वजा' झालेत. तू तुझ्या ठिकाणी आणि मी माझ्या ठिकाणी फक्त बाकी राहिलोत आपण ! जातांना तू मोगऱ्याचं कलम दिलंस . म्हणालीस तुम्हाला मोगरा आवडतो. माझी आठवण म्हणून ठेवा. मी ते कलम घेतलं.  मन जडावलं होतं. मनाला बांध घातला . पण डोळ्यांना भरती आली. त्या भरतीने पापण्यांचे  किनारे ओले चिंब झाले. आणि अनवरत वाहू लागले. का कुणास ठाऊक तुझी नजर झुकली होती. हा आपल्या शेवटच्या भेटीचा निरोप समारंभ होता. मला मोगऱ्याचं कलम देऊहा निरोप समारंभ अविस्मरणीय केलास तू! समारंभात आनंद असतो असं म्हटलं होतं मी. पण हा निरोप समारंभ होता. तू आणि मी आता वेगळे होणार होतो. तुझ्यामाझ्यातील प्रेमाचा प्रवाह संपला होता. प्रवाह संपला तरी प्रवास कायम राहीला. तुझा तुझ्या किनाऱ्याने! माझा माझ्या किनाऱ्याने! तू दिलेलं तेमोगऱ्याचं कलम मी तळहाताच्यां फोडा सारखं जपलं . जगवलय .आता ही ते जगवतेय. रोज त्यावर पाणी घालतेय. तुझी जागा हिने घेतलीय. तेव्हा ते खरं  जीवन वाटलं होतं. आता हे खरं जीवन वाटतं. ही खूप प्रेम करतेय माझ्यावर. कधी पाय दुखण्याची तक्रार केली की चोळत बसते ही पाय माझा. एक प्रहर उलटून गेलेला असतो. मला अचानक जाग येते. बघतो तर काय? ही पाय चोळत चेपत  बसलेली असते. हीचे डोळे तारवटलेले असतात. झोपेमुळे ते लाल पिवळे झालेले असतात. झोपेचा पेंग हिच्या डोळ्यांवर रेंगाळलेला असतो. मी हिला  विचारतो ," झोपली नाहीस का अजून? ,'  ही आळसावत एक जांभई देते नि मलाच प्रतीप्रश्न करते, ' बरं वाटतं का आता ? "होय " ही तिच्या लांब केसातून हात फिरवते.पेंगाळलेल्या डोळ्यांना हलकेच चोळले. आणि मंद हसते. रात्रीची निरव शांतता असते . ती क्षणभर विस्कळीत होते. शांत पाण्यात एखाद दगड टाकावा आणि त्यावर असंख्य तरंग उठावेत तसं ते हलकसं  हसणं घुमत राहतं काळ्याशार अंधारात . आणि मनाच्या कप्यातही ! क्षणभर अशा अपरात्री ही का हसलीय हेच मला कळत नाही. मी क्षण दोन क्षण तर्क बांधुन बघतो. हिच्या हसण्याचं कारण शोधत असतो. आणि त्याची उकल होण्यापूर्वीच हिचा प्रश्न येतो. ही विचारते मला , 'ती असती तर? ," कधी कधी ही भलतेच अडचणीचे प्रश्न विचारते. आताही हिनं असाच प्रश्न विचारला  त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच हिचा दुसरा प्रश्न आला .  खूप प्रेम आहे ना तिच्यावर तुमचं! ह्या प्रश्ननानं माझ्या मनाचा थरकाप उडाला.  पण  उत्तर दिलंच पाहिजे. मी सांगतो हिला  ' ती माझा भूतकाळ आहे . तू माझा वर्तमान आणि भविष्यकाळ आहेस. तिच्या विषयी आदर आहे. आणि तुझ्याविषयी अफाट प्रेम आहे. 'हं " प्रतिक्रिया म्हणून तिचं असं उत्तर येतं रात्रीनं आता पूर्वेच्या दिशेला कुस बदललेली असते. मुख्य रस्त्यावरून एखाद जड वाहन गेल्याचा कर्कश आवाज येतो. काही आगाऊ कोंबड्यांनी  बाग दिलेली असते. झोपललेले रस्ते आता धावायला  लागणार त्याची एक झलक त्या जड वाहणाने दिलेली असते. मी हिला सांगतो, 'झोप आता'. 'तुम्ही पण झोपा आता. बरं वाटतंय ना? 'होय'

 मी असं उत्तर देतो. आणि पांघरून ओढून घेतो. ही देखील अंथरुणात पडते. माझी प्रश्नोत्तरात झोपच उडालेली असते.अंथरुणात मी स्वत:ला दुमडून घेतो. तुझ्या आठवणींशी माझं बोलणं सुरुच असतं  कधीतरी मी तुझं लॅमिनेशन केलेलं ते पत्र वाचत असतो. छाताडावर ठेऊन खूप वेळा तुझ्यासोबत घालविलेल्या क्षणांचा परतावा येतो. ते सारं ही बघत असते . तुझ्या आठवणींशी हिनं कधी सवती मत्सर केला नाही. ही माझ्या भावना जपत आलिय. नवऱ्याला इतकी मुभा देणारी किमान मी तरी अशी बायको  बघितली नाही. ही खरेच खूप समंजस आहे. प्रचंड मोठ्या मनाची आहे. ग्रेट आहे!.....

  तुझ्या आठवणींशी बोलता बोलता मी निद्रेच्या कुशीत कधी विसावलो ते कळलेच नाही. जवळपास नऊ वाजून गेले. सुर्याची कोवळी किरणं खिडकीतून थेट अंगावर पडली. मी उठलो बघतो तर काय! ही कधीचीच जागी झालेली होती. तुझ्या कलमावर पाणी घातलं होतं. काही फुलं तोडून स्वच्छ पाण्यात धुवून एका चाळणीत ठेवली होती .ही त्याचा गजरा करेल . आणि मी तिच्या वेणीत तो माळणार होतो.  सारं कसं बदलंलय बघ! कधी तरी हा मोगऱ्याचा गजरा मी तुझ्या वेणीत माळायचो.....कधितरी ये ना भेटायला. एक मैत्रीण म्हणून! बघ,तुझा मोगरा कसा फुललाय . कुंडीत, हिच्या वेणीत, माझ्या मनात, आणि तुझ्या आठवणींतही........

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

भंडारातील बातम्या

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली भंडारा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन...

झाडीपट्टी रंगभूमीवरील आक्षेप आणि समर्थन

______________________________राजू बोरकर७५०७०२५४६७++++++++++ भंडारा , चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी...

आता मगरीच्या पाठीवर स्वार व्हा ...

भारतीय वार्ता :राजू बोरकर अगदी काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेचे काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे...