Home / विदर्भ / भंडारा / आता मगरीच्या पाठीवर...

विदर्भ    |    भंडारा

आता मगरीच्या पाठीवर स्वार व्हा ...

आता मगरीच्या पाठीवर स्वार व्हा ...

भारतीय वार्ता :

राजू बोरकर

 

        अगदी काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेचे काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. आणि वॅटस अप आणि फेसबुकवर आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाली अशी चर्चा सर्व महाराष्ट्रात पसरली.  जो तो जणू  दुखवटाच पार पाडतो आहे, असं चित्र निर्माण झालं. काॅंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला तर आंबेडकरी चळवळीची हानी झालीय? म्हणजे नेमकं काय झालंय, ते मला अद्याप तरी समजलेलं नाही. चंद्रकांत हांडोरेनी समाजासाठी काय केलं ?  आपण नकळत काॅंग्रेसला आंबेडकरी चळवळ मानतो की काय?  हांडोरेंच्या विजयाचे अनेक गणितं मांडले गेलेत . तरीही ते बिघडलेत, चुकलेत. त्याचं दुःख काॅंग्रेसला वाटायला हवं होतं.ते त्यांना वाटलं नाही. पुढे कधीही वागणार नाही.

               आता आताच पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे यांना अचानक आपल्यावर अन्याय झाल्याची जाणीव झाली. ते म्हणतात गेल्या दीड दशकापासून काॅंग्रेस  आघाडी मध्ये  मित्र पक्ष म्हणून आम्ही आहोत. परंतू काॅंग्रेस पक्षाने सन्मानपूर्वक स्थान दिले नाही. आपले राजकीय मित्रत्व जपले नाही. आघाडीचा धर्म पाळला नाही.  सातत्याने उपेक्षा केली. त्यामुळे आता काॅंग्रेस सोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याची घोषणा केली.  पुढे ते म्हणतात. यापुढे विश्वास घात करणाऱ्या पक्षासोबत आघाडी न करता आगामी काळातील सर्व निवडणुका या स्वबळावर लढविल्या जातील. इतर राजकीय पक्षांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा देखील विचार केला जाईल, असं म्हणतात.

                नामांतराच्या लढ्यात सिंहासारखी डरकाळी फोडणारा हा सैनिक आंबेडकरी जनतेच्या गळ्यातील ताईत बनला होता.  त्यावेळी मला समाजकारण ,राजकारण  वगैरेंचं नुकतंच भान यायला लागलं होतं.  प्रा. कवाडेंचं भाषण  झालं तेव्हा पाचपन्नास किमी वरुन बौद्ध समाज उसळला होता.  त्यांचं भाषण ऐकून समाजासाठी हे विकु की ते विकु असं मला त्यावेळी वाटतं होतं. साहेब अगदी आवेशात बोलले होते, मला शरद पवारांनी म्हटलं होतं तुम्हाला काय हवे?  मी म्हणालो लाथ मारतो जोगेंद्र कवाडे त्या खुर्चीला . कवाडेंचा हा त्यावेळचा जोश हळूहळू कमी झाला. त्यांना खुर्चिचे स्वप्न पडू लागले. बाबासाहेबांनी सांगितलं, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे.  हे सर्वज्ञात असल्याने त्यांच्या बदलत्या  विचारांचं अनेकांनी स्वागत केलं. हा माणूस खुर्चीत बसून काही करेल  असं अनेकांना वाटलं . पुढे पुढे तर कवाडे साहेब खुर्ची च्या इतक्या प्रेमात पडले की , त्यांनी तत्वांना गुंडाळून ठेवलं. मंदिरात जाऊन पुजा करणारे सर्व उमेदवार निवडून येत नाही.  तरीही त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ मारूती च्या देवळात फोडला. आम्ही तेव्हा ही शांत राहीलो.  कारण तो राजकीय डाव असावा असं आमचं मत झालं. पण कवाडेंनी तत्वांशी घेतलेला घटस्फोट मनाला खटकत होता. तरीही आम्ही माफ केलं. अगदी मनावर दगड ठेवून माफ केलं! आता कवाडेंनाच काय इतर रिपब्लिकन नेत्यांना आंबेडकरी जनतेनं माफ केलं . आणि आता ही उदारताच महागात पडलीय. आंबेडकरी जनतेचं भय नेत्यांना राहिलं नाही. म्हणूनच कवाडेंनी काॅंग्रेस मधुन बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यापुढे विश्वास घात करणाऱ्या पक्षासोबत आघाडी न करता आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील . इतर राजकीय पक्षांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचार देखील केला जाईल, अशी भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली. प्रश्न असा पडतो की काॅंग्रेसनंतर सत्तेपर्यंत पोहोचवणारे पक्ष कोणते?  राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप, शिवसेना ( ठाकरे) , शिवसेना.( शिंदे ) ? बरे यापैकी कुणाबरोबर ही आंबेडकरी तत्त्वांची बैठक नाही. बाबासाहेबांची तत्वे गुंडाळून केवळ स्वतःचा विकास साधुन घेण्यासाठी, आपलं राजकीय पुनर्वसन  करून घेण्यासाठी कवाडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. कवाडेंचीच बाजू त्यांच्या मुलाने स्पष्ट केली. शिंदे आणि फडणवीस स्थीर सरकार देईल या प्रा. कवाडेंच्या मताशी जयदीप कवाडेंनी सहमती दर्शवली.  प्रा. कवाडेंचा वारसा जयदीप कडे येणार हे निश्चित झाले.

             वामन मेश्रामने राजकारणात प्रवेशतांना सावध पावले टाकायला सुरुवात केली. त्यांनी परिवर्तनासाठी शरद पवारांना बळकटी मिळणं गरजेचं आहे असं म्हटलं.

                          प्रकाश आंबेडकर वेट अँड वाच च्या भुमिकेत असले तरी शिवसेना (ठाकरेगट)  आणि वंचित बहुजन आघाडी युती पर्याय ठेवला आहे. ठाकरेंसाठी प्रकाश आंबेडकरांचं दार सताड उघडे आहे. नव्या समिकरणासाठी रिपब्लिकन नेते गुडघ्याला बाशिंग बांधून सजुन सवरून तयार आहेत. प्रश्न असा आहे की यांच्या त्यांच्या दावणीला बांधतांना आंबेडकरी समाजाला काय वाटतं हा विचार कुणालाही महत्वाचा वाटला नाही. आंबेडकरी समाज केवळ मतदार आहे असं मला वाटत नाही. हा समाज चळवळ आहे असं मी मानत आलोय. अन्याय, अत्याचार , संप ,मोर्चे आणि उपोषण ही आंबेडकरी चळवळीची प्रभावी हत्यारं आहेत. आणि ही हत्यारं हा समाज नेहमी वापरत आलाय.पण रिपब्लिकन नेत्यांच्या घुमजाव धोरणाने ही हत्यारं बोथट होऊ लागली. रिपब्लिकन नेते चळवळ संपवायला निघालेत असं वाटायला लागलं आहे.

                 रिपब्लिकन नेते आणि आंबेडकरी समाजात भाजप विषयी कमालीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप चे शत्रू ते आपले मित्र असं साधं गणित बनवलं गेलं आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी सेना फोडली तेव्हा सोशल मीडियावर सर्वांत जास्त दुःख आंबेडकरी समाजाला झाल्याचं लक्षात आलं.  अनेक आंबेडकरवादी ठाकरेंची पाठराखण करीत होते. आणि शिंदेंना गद्दार म्हणत होते.

 

         खरेतर शिवसेना ही आपली चळवळ नाही. त्यामुळे ती फोडल्याचं दुःख आंबेडकरी समाजाला होण्याचं कारण काय? पण रिपब्लिकन नेत्यांनी आंबेडकरी जनतेच्या मनात जे भरलं आहे ते शिवसेना फुटीच्या निमित्ताने बाहेर आले. आता अनेक प्रयोग करण्यात तरबेज असलेले आंबेडकर आणि कदाचित इतरही रिपब्लिकन नेते उद्धव ठाकरेंना मदत करतील . पण गर्वसे कहो हम हिंदू है असं म्हणत शिवसेनेने धार्मिक दहशत पसरविली होती. संपूर्ण महाराष्ट्रात बाळ ठाकरेंनी धार्मिक आणि जातीवादी दंगली घडविल्यात  . हेच बाळ ठाकरे नामांतराला विरोध करतांना म्हणाले होते, घरात नाही पिठ कशाला हवे विद्यापीठ. आणि आज त्याच बाळ ठाकरेंच्या पोराची शिंदे भाजपने फजिती केली तर आंबेडकरी समाजाला अती दु:ख झालेलं दिसतंय. हीच आपली चळवळ आहे का? रिपब्लिकन नेत्यांचा सत्ता मिळविणं हाच अंतिम उद्देश असेल तर भाजप का चालत नाही?    आणि भाजप आंबेडकरी समाज विरोधी आहे असं उत्तर असेल तर धार्मिक, जातीय दंगली करून घरात नाही पिठ कशाला हवे विद्यापीठ म्हणनाऱ्यांच्या पोराची शिवसेना बौद्ध प्रेमी कशी?  हा सवाल आहे. आणि रिपब्लिकन नेत्यांकडून त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर अभिप्रेत आहे.  घरात नाही पिठ कशाला हवे विद्यापीठ म्हणनाऱ्यांच्या पोराला आता पिठ मळू द्या आणि पोळ्या लाटू द्या. भाकरी करू द्या. त्यांच्या मदतीला कोणत्याही आंबेडकरवाद्यानी  धावू नये, असं मला प्रांजळ वाटतं . भाजप क्रमांक एकचा शत्रू होता. तेव्हा काॅंग्रेस मित्र पक्ष होता. पण त्याच मित्राने अनेकदा दगाबाजी केली.  शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहे. मग बौद्धांनी मैत्रीचा हात मागतांना  सत्तेत सहभागी करण्याचं रिपब्लिकन नेत्यांचं स्वप्न  सेना पुर्ण करेल का? हा सवाल आंबेडकरी समाजासाठी अनुत्तरीत राहता कामा नये. शिवाय सेनेने काॅंग्रेससारखीच  गद्दारी केली तर रिपब्लिकन नेत्यांची काय भूमिका असेल.  त्याचं विश्लेषण आंबेडकरी समाजाला अभिप्रेत आहे.

                  शिवसेना फुटीचं दुःख किंवा आनंद व्यक्त करणं हे आपलं काम नाही. आपले शेकडो तुकडे झालेत त्यांना जोडजंतर करून  फाटलं तिथं ठिगळ घालून एक करणं ही काळाची गरज आहे. शत्रूची फोडाफोडी आपल्या सामाजिक राजकीय ऐक्यासाठी ही संधी आहे. ते गटातटात विखुरले गेलेत म्हणून आपल्या सर्व नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. भाजप, सेना, ठाकरे आणि  शिंदे  एकमेकांसाठी कट्टर शत्रू होउन  एकमेकांचे तोंड न बघण्याची शपथ घेत असतील  म्हणजे ३६ चा आकडा होत असेल तर रिपब्लिकन नेत्यांनी समाज हितासाठी एकमेकांचे तोंड बघुन म्हणजे  ६३ चा आकडा बनुन आंबेडकरी समाजात नवचैतन्य भरले पाहिजे.

           राजकारण हे एक प्रकारे समुद्र असून सेना, भाजप, काॅंग्रेस  , राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि इतर हे त्यातील मगर आहेत. आपण एकाच समुद्रात राहून मगरीशी वैर कशाला म्हणत मगरींशी मैत्री केली. पण शेवटी मगरच ते! गिळंकृत करणारच. काॅंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस चा अनुभव आपल्या स्मृतीत जमा आहे. म्हणून आपल्या नेत्यांनी अशा मगरींशी मैत्री करायचं सोडून आता मगरीच्या पाठीवरच स्वार व्हायला शिकलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन विचार होणं हे सामाजिक,  राजकीय दृष्ट्या हितावह होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेसमधिल कार्यकर्त्यांनी आणि थोक चिल्लर नेत्यांनी आपलं सामाजिक, राजकीय ऐक्य दाखवून द्यावं  . हीच समाजाची गरज आहे.

 

राजू बोरकर

लाखांदूर

जिल्हा भंडारा

७५०७०२५४६७

+++++++++++

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

भंडारातील बातम्या

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली भंडारा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन...

*मोगरा फुलला*

*मोगरा फुलला* राजू बोरकरलाखांदुर७५०७०२५४६७ ऐकतेयस ना .त्या टी पाॉईंटवरील आपली...

झाडीपट्टी रंगभूमीवरील आक्षेप आणि समर्थन

______________________________राजू बोरकर७५०७०२५४६७++++++++++ भंडारा , चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी...