Home / विदर्भ / नागपूर / *लग्न मंडपाचेही नियम...

विदर्भ    |    नागपूर

*लग्न मंडपाचेही नियम असावेत*

*लग्न मंडपाचेही नियम असावेत*

*लग्न मंडपाचेही नियम असावेत*

 

✍️अंकुश शिंगाडे

    नागपूर

 

      विवाह.दरवर्षी विवाहाची धूम असते. लोकं या विवाहाला लाखो रुपये खर्च करतात. त्या पैशाचा हिशोबच नसतो. त्यातच या विवाहात जो खर्च होत असतो, त्याचं मोजमाप केलं जात नाही.

        अलिकडे विवाह करणे अगदी सोपे झाले आहे. अत्याधुनिक साधनांचा शोध लागल्यानं आता विवाहसोहळा अडचणीचा वाटत नाही. तसंच लोकं आज विवाहावर खर्च करताना काहीच तारतम्य बाळगत नाही.

           हुंडा.....   हुंडापद्धती आज कालबाह्य ठरत चाललेला आहे. कारण अलिकडे भ्रृणहत्या झालेल्या आहेत. त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत की मुलींची संख्या अतिशय कमी झालेली आहे. हुंडापद्धती व मुलींना दर्जा कमी असल्यानं लोकांनी आपल्या पत्नीच्या गर्भातील भ्रृणलिंग तपासले. तेव्हा ते भ्रृण मुलींचे आढळल्यानं प्रत्येक पालकांनी ते गर्भ मारले. त्यामुळंच आपोआपच मुलींची संख्या कमी झाली. तसं पाहता हुंडापद्धती प्रबळ असल्यानं काही मुलींनी वयात येताच आपल्या वडीलांना उगाचच त्रास होवू नये म्हणून दुस-या मन पसंत असलेल्या मुलांसोबत पळ काढला. त्यामुळंच आज विवाहाला मुली सापडणं कठीण होवून बसलंय. अशावेळी आज मुलीला भाव आलाय. तसंच समीकरणही असमान आहे. ते समीकरण असमान स्वरुपाचं असल्यानं मुली कमी झाल्या.

          आज ब-याच मुली अशाच निघून गेल्या आहेत. कोणत्याही मुली केव्हा अशा निघून जातील याची काही शाश्वती नाही. काही तर विवाहाच्या मंडपातूनच अशा आपल्या मनपसंत मुलांसोबत निघून जातात विवाहाला लागणारा खर्च वाचावा म्हणून. तसं पाहता त्या तसं करुन आपल्या वडीलांचा विवाहाचा खर्च वाचवीत असतात.

         आज काही मुली अशा स्वरुपात निघून जातात. परंतू काही निघून जात नाहीत. त्या तसं राहण्याला आपल्या आईवडीलांची इभ्रत समजतात. त्या निघून जात नाहीत. त्यामुळंच त्यांचा विवाह करणे आईवडीलांना भाग पडते व ते कसंही का होईना, आपल्या मुलीला टाकून देत नाहीत. त्यांचा विवाह करतात नव्हे तर करावाच लागतो.

          विवाह करतांना काही लोकं खुप श्रीमंत असतात. ते विवाहात पोत्यानं पैसा ओततात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होत नाही. ते विवाह करतांना मंडप, डेकोरेशन, जेवणखावण, आंधन, दागदागिने यात अतोनात पैसा खर्च करीत असतात. तर काही विवाह करणारी मंडळी ही गरीब स्वरुपाची असतात. या मंडळीत काही काही एवढे गरीब असतात की ते साधा विवाहासाठी सभागृह देखील करु शकत नाहीत. ते आपल्याच घरी दारासमोर थोड्याशा जागेत मंडप उभारतात. ज्यात संबंध रस्ताच बंद केला जातो. तो रस्ता, जो रहदारीसाठी एकच रस्ता असतो व तिथंच मंडप उभारला गेल्यानं रहदारीमध्ये एकप्रकारे समस्याच उत्पन्न होत असते.

          रस्त्यावरील मंडप, त्यातच होत असलेली वाहनांची गर्दी. त्या गर्दीला चिरुन जाणारी पायदळी मंडळी या सर्वांनाच अशा विवाह मंडपामुळं अडचणी निर्माण होत असतात. असा विवाह मंडप ज्या गल्लीत असला, ती मंडळी संपूर्ण रस्ताच बंद करुन टाकतात. त्यामुळं कोणालाच तेथून जाता येता येत नाही. अगदी पायदळी चालणा-या माणसालाही. शिवाय त्यांना काही बोलतो म्हटल्यास 'रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय?' अशी उत्तरं मिळतात.

        विवाहसोहळ्याला अलीकडे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ते पाहता आज विवाह सोहळ्याचेही जबरन नियम असावेत असू म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसे त्यातील नियम पुढीलप्रमाणे सांगता येतील.

         १) विवाह मंडप टाकतांना कोणी कोणाचा बाप काढणार नाही. यासाठी अशा अपमानीत होणा-या व्यक्तीला तक्रार करता यावी.

           २) विवाह करतांना ज्यांनी संपूर्ण रस्ता बंद केला, त्यावर उचीत कारवाई व्हावी.

            ३) घरासमोर विवाह मंडप टाकतांना पुरेशी जाण्यायेण्यासाठी जागा असावी. कमीतकमी पायदळी चालता तरी यावे. संपूर्ण रस्ताभर मंडप टाकता येवू नये.

           ५) पुरेशी नोंदणी कक्षातून परवानगी असावी. परवानगी अशी की ते किती चौरस फूट मंडप टाकणार? जायला जागा सोडली की नाही? त्याची पाहणी व्हावी.

           ६) नोंदणी कक्षात याचीही नोंद असावी की वधूवर किती वयाचे आहेत. त्यांच्या विवाहाला चार साक्षीदाराची परवानगी आहे की नाही.

           ७) प्रत्येक विवाहात विवाह होण्याआधी नोंदणी कक्षातून रितसर परवानगी घेणे आवश्यक ठेवावे. मग तो प्रेमविवाह असो, वा सहमतीचा विवाह असो.

            ८) नोंदणी याचीही असावी की तो विवाह होतांना अंदाजे ती मंडळी किती खर्च करणार? पर्यायानं सांगायचं म्हणजे खर्चाचं मोजमाप असावं.

            ९) प्रत्येक विवाह करतांना विवाह शुल्क भरावे. तसं विवाह शुल्क भरणं सक्तीचं करावं.

            १०) महत्वाचं म्हणजे विवाहाला लावणार असलेला पैसा कुठून तडजोड करणार याचं विवरण पत्र असावं. जसे कर्ज काढले काय की नोकरीतून गोळा केला की कुणी उसने दिले. याचं विवरणपत्र भरणं बंधनकारक असावं. याचा फायदा असा की त्यातून उभययंती दांपत्यांनी तो पैसा कुठून गोळा केला ते माहीत होईल.

           ११) खर्च करण्याची मर्यादा असावी. अंदाजे रक्कम जाहीर करावी. त्यापेक्षा जास्त रक्कम विवाह सोहळ्यासाठी खर्च केल्यास त्यावर टक्केवारीनुसार इन्कमटॅक्स असावं.

            १२) खर्चाचंही विवरण असावं. कशासाठी किती खर्च होणार याचा तपशील असावा. ते सर्व एका विवरणपत्रात भरुन घ्यावं.

             १३) आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही. याचं शपथपत्र असावं. मग रस्त्यावरुन काढलेली वरातीची मिरवणूक का असेना. कित्येक वेळेस वरातीच्या मिरवणूकीने फोडलेल्या फटाक्याने कित्येकांची घरं जळालेली आहेत. तसेच कित्येक वेळी वरातीच्या मिरवणूकीने किरकोळ अपघात झालेले आहेत. तसेच कित्येक वेळेस वरातीच्या गर्दीतून निघता न आल्यानं ऑफिसला जायला वेळ झालेला आहे.

          १४) विवाहाचं आवेदनपत्र बंधनकारक करावं व त्यात आवर्जून वर वधूच्या वयाची अट नमुद असावी. जेणेकरुन कोणीही अकाली किंवा बालवयात कोणाचाच विवाह करणार नाही. विवाहाची नोंदणी विवाहपूर्व करतांना विवाह वयाचंही बंधन पाहावं.

           वरील सर्व गोष्टी या सक्तीच्या असाव्यात आज विवाह साजरे करतांना. कारण आता पुर्वीचा काळ गेला. त्या काळात लोकं वरात पायी वा बैलगाडीनं काढत असत. परंतू आता.......आता मात्र वरात भरधाव गाड्यांनी निघते. पुर्वी विवाहात जास्त पैसा खर्च केल्या जात नव्हता. पैसा जपूनच वापरला जायचा. आता मात्र पैशाची उधळपट्टी चालत आहे. पैशाला आज किंमतच उरलेली नाही. काही काही मंडळी तर,विवाह करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढतात. हवशे नवशे गवसे पाहूणे बोलावतात. आज गरीब माणसंही खोटी शान दाखवतात नव्हे तर दाखवावीच लागते. यावर उपाय म्हणून वरील नियम बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विवाह करतांना गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण होणार नाही. गरीब आणि तेवढेच श्रीमंतही आपला खिसा पाहूनच विवाह करतील. विवाह नितीनियमानं होतील. शिवाय वरील नियमांतर्गत विवाहात फसवेगीरी होणार नाही.

 

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...